नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारास १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुभा
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारास १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुभा
लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर प्रचाराबाबत सुधारित सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या निवडणुकीचा जाहीर प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता जाहीर प्रचार बंद होईल. त्यानंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी, प्रसारणदेखील बंद होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment