छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात;
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात; • मार्च ते मे २०२६ दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०२ : ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर विशेष एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश एकाच दिवसात नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. शिबिरांमध्ये उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवांमध्ये सातबारा अभिलेखातील चुका दुरुस्त करणे व डिजिटल सातबारा व आठ-अ उतारे तात्काळ पु...