Posts

Showing posts from February, 2026

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
    कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील- न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर   ·          विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी ·          विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग   लातूर, दि. २७ : सर्वसामान्य नागरिक, वंचित घटकांना त्यांच्या हक्क, अधिकारांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन करणे, त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासोबतच आता शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था पुढाकार घेत आहे. याचाच एक भाग म्हणून महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे, हा मूळ उद्देश असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी सांगितले. तसेच लातूर येथे आयोजित महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबाब...

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर! मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर! मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, दि. २७ : ज्यांच्यावर आपल्या मातृभाषेचा खोल प्रभाव आहे, असे लोक यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपली मुले व नातवंडे यांना मातृभाषेतील शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांनी केले. तसेच दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करून आपल्या मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा. सुरेंद्र पाटील, ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामीण कृषी शब्दांचे अभ्यासक प्रा. द. मा. माने, ज्येष्ठ साहित्यिक-कवयित्री तथा बालकथाकार श्रीमती वृषाली पाटील, ज्येष्ठ कथाकार जी. जी. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटक...

स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत लातूर, दि. २६ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन २०२५-२६ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ३८ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेतर्गत अर्ज करण्‍याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास प...

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा लातूर, दि. २६ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्‍यात येते. सन २०२५-२६ साठी रिक्त असलेल्‍या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १० मार्च, २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्‍पन्‍न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्‍त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या तथा तालुक्याच्या ठिकाणी आहे,...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे २ मार्च रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे २ मार्च रोजी आयोजन लातूर, दि. २६ (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मार्च महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ***

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले • सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा लातूर, दि. २६ : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ गाव खेड्यांतील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त...

राज्य शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू

राज्य शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू लातूर, दि. २४ : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती व संस्थांचा सन्मान विविध पुरस्कार देऊन केला जातो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार माननीय राज्यपाल यांच्या शुभहस्ते प्रदान केले जातात. यापूर्वी या पुरस्कारांसाठी ऑफलाईन पद्धतीने चार प्रतींमध्ये प्रस्ताव सादर करावे लागत होते. यामुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. ...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २४ : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. आठवले यांचे २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आगमन होईल. अहमदपूर येथील काळेगाव रोडवरील कमला नेहरू शाळेजवळील भाऊसाहेब वाघंबर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता अहमदपूर येथील विद्युत कॉलनीतील बाबासाहेब कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ५.३० वाजता उदगीर येथील राजनगर मधील देविदास कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ६ वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ६.३० वाजता उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. रात्री ७.५० वाजता लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले हे २६ फेब्रुवारी २०२६...

विशेष लेख :- न्याय आपल्या दारी: मोफत कायदेशीर मदतीची संकल्पना आणि महत्त्व

विशेष लेख *न्याय आपल्या दारी: मोफत कायदेशीर मदतीची संकल्पना आणि महत्त्व* भारतीय लोकशाहीमध्ये कायद्याचे शासन या सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचा मूलभूत आशय असा की राज्यातील सर्व व्यक्ती, संस्था आणि शासनसत्ता ही कायद्याला आधीन असते आणि कोणालाही कायद्यापेक्षा वरचे स्थान नसते. यासाठी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समानता म्हणजेच कायद्यापुढीलच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक पातळीवर ही सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होय. याचसोबत न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे तत्व ही लोकशाही व्यवस्थेचा मूलधार मानला गेला आहे राज्यघटनेच्या संदर्भात कायद्याची शासन समानता आणि न्यायप्रवेशनाचा हक्क हे तिन्ही परस्पर पूरक आणि अविभाज्य तत्वे मानले जातात परंतु केवळ कायद्याचे राज्य घोषित करणे पुरेसे नसून या कायद्याखाली सर्व नागरिकांना समसमान वागणूक मिळणे अत्यावश्यक आहे. जर कायद्या पुढील समानता प्रत्यक्ष व्यवहारात साध्य करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेशनाची सुलभ उपलब्धता असणे अनिवार्य ठरते कारण न्यायप्रणालीपर्यंत पोहोचण्याची आर्थिक सामाजिक आणि संरचनात्मक अडचण राहिली ...

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले • वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन लातूर, दि. २३ : जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडून दूरध्वनीद्वारे जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेतली. रेणापूर, अहमदपूरसह इतरही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे पालकमंत...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

Image
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #दिलखुलास कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त’ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. दि. २५ व २६ फेब्रुवारी २०२६ सकाळी : ७.२५ वाजता ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल. #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर

जय महाराष्ट्र कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

Image
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त’ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत मंगळवार दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर व महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. प्रसारित होणार आहे. #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर

गुन्हेगारांची गय नको; अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ विक्री रोखा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
सुधारित पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा ! गुन्हेगारांची गय नको; अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ विक्री रोखा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना अंमली पदार्थांची विक्री आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार लातूर, दि. 20 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. सराईत गुन्हेगार, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कठोर कार्यवाही करावी. शहरातील ट्युशन एरियासह शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या, दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ...