लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण

लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण लातूर, दि. २ : माहे एप्रिल २०२६ पासून सर्व वेतन देयके केवळ राज्य शासनाच्या नवीन सेवार्थ प्रणालीद्वारेच तयार करून ऑनलाइन पद्धतीने ई-हस्ताक्षरासह ई-देयक कोषागारात सादर करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या नवीन प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १० मार्च २०२६ रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला माळा, डीपीडीसी हॉल, लातूर येथे दोन सत्रांत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी ११.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सर्व उपकोषागार कार्यालय स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी, तर दुपारच्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.०० वाजेपर्यंत कोषागार कार्यालय लातूर मुख्यालय स्तरावरील अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल. या प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच वेतन देयक संबंधित लेखा विषयक कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रशिक्षण पुन्हा होणार नसल्याने कोणत्याही परिस्थितीत अनुपस्थित राहू नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला भा. पाटील यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन