Posts

Showing posts from 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात पडताळणी समितीची विशेष मोहीम

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात पडताळणी समितीची विशेष मोहीम लातूर, दि. २३ (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांनी दिलेल्या सूचनांनुसार लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात १२ वी विज्ञान शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणी समितीकडे ऑनलाईन अर्ज जमा केलेले नाहीत, त्यांनी आपले अर्ज तात्काळ ऑनलाईन भरून समितीकडे जमा करावेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी कळविण्यात आल्या आहेत, अशा अर्जदार व पालकांनी मूळ कागदपत्रांसह २८, २९ व ३० सप्टेंबर २०२६ आणि ०५ व ०६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी. दिलेल्या वेळेत त्रुटींची पूर्तता क...

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद • शेतकऱ्यांना थेट मदत देण्यासाठी गतीने पावले उचलण्यास सुरुवात • संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार लातूर, दि. २३ (विमाका) : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून, राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दौऱ्याला लातूर येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा...

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर !

Image
  पिकांचे सरसकट नुकसान ; मदतही सरसकट देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना थेट मदत देण्यासाठी गतीने पावले उचलण्यास सुरुवात संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही ; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार   लातूर, दि. २३ (विमाका) : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून , येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून , राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल , अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दौऱ्याला लातूर येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोस...

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस दुष्काळाच पहिली अधिसूचना लवकरच लातूर, दि. 23 (जिमाका) :   शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशयगांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचीमाहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणेउभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्रीफडणवीस यांचे आज (ता.23) सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशीसंवाद साधला. दुष्काळाच्या संबंधाने करावयाच्या आवश्यक त्या उपयोजनांबाबत शासनस्तरावरयोग्य कार्यवाही सुरू आहे. तसेच दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत.सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन करत आहे. सोबतचपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठीआवश्यक तेवढा ‍निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबीं...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन लातूर, दि.23 (विमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर येथील विमानतळावर आगमन झाले. लातूर, धाराशिव जिल्ह्यातील पीक परिस्थितीची आज ते पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आगमन झाले. याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांचे निवेदने स्वीकारली.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २२ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांचे सकाळी ९.५० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी १०.५५ वाजता ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. तसेच, सकाळी ११.३५ वाजता औसा तालुक्यातील खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. **

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सकाळी ९.५० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी १०.५५ वाजता ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. तसेच, सकाळी ११.३५ वाजता औसा तालुक्यातील खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याकडे प्रयाण करतील. **

दिवाळी २०२६ निमित्त लातूर जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दिवाळी २०२६ निमित्त लातूर जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. २१ : दिवाळी २०२६ सणानिमित्त जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री दुकाने सुरू करण्यासाठी परवान्याकरिता २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ‘एक्सप्लोसिव्ह रूल्स २००८’ मधील नियम ८४ नुसार सुरक्षा अटींच्या अधीन राहून तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकारी यांना असून यानुसार अर्जांची छाननी, स्थळ पाहणी आणि विविध परवानग्यांची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. अर्जदारांनी २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सेतू सुविधामधून प्राप्त विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड अथवा विजेचे बिल यांसारखा रहिवास पुरावा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला, जागेच्या मालकीचा पुरावा किंवा भाडेपट्टा, तसेच जागा भाडेतत्त्वावर असल्यास जागामालकाचे संमतीपत्र, प्रस्तावित दुकानाच्या जागेचा नकाशा व लेआउट प्लॅन या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तहसीलदार व पोलीस विभागाकडून प्रत्यक्ष स्थळ ...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. २१ : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आला आहे. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या या योगदानाला अधिकृत ओळख मिळावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळणार असून, कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीची मालकी हा निकष न ठेवता शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधुमक्षिकापालन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन यांसह विविध शेती व शेतीपूरक कामांमध्ये सहभागी महिलांचा...

'महाविस्तार एआय' ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर - सूर्यकांत लोखंडे ▪बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा 'लोकसंवाद' उपक्रम

Image
'महाविस्तार एआय' ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर - सूर्यकांत लोखंडे ▪बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा 'लोकसंवाद' उपक्रम लातूर, दि. २१ : राज्याच्या कृषि विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'महाविस्तार एआय' ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकर्यांना शेतीविषयी अचूक माहिती आणि मदत एकाच क्लिकवर मिळणार असल्याचे कृषि विभागाचे सूर्यकांत लोखंडे यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत औसा तालुक्यातील बोरफळ येथील चौकातला राजा गणेश मंडळाच्या सहकार्याने लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे डॉ. ऋषिकेश खारोळकर, कौशल्य विकास अधिकारी गिरीश महामुनी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, विभागीय माहिती कार्यालयातील सहायक अधीक्षक अशोक माळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला, पीक प्रमाणित कार्यपद्धती, हवामानाचा अचूक अंदाज, खत मात्रा गणक, कीड - रोग ओळख व यावर उपाय, पिकांचे बाजारभाव, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, गोदाम उपलब्...

'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत मुरुड येथे मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या 'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत #लातूर तालुक्यातील #मुरुड येथील महाराज गणेश मंडळ येथे नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा, उद्योग क्षेत्रातील संधी आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी खादी ग्रामोद्योग व उद्योग विभागांतर्गत मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि सवलतींची माहिती दिली. तसेच, मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ठोंबरे, आरोग्य मित्र धनंजय नवगिरे आणि गोविंद सुरवसे यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ​#गणेशोत्सव  ​#लोकसंवाद२०२६

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानाला लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (गौर) येथून प्रारंभ

Image
 *माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम* लातूर, दि. १७ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथून या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमात कृषि विभाग, जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश संजय चामे, उपाध्यक्ष ग्यानदेव गोपाळ चामे, सचिव रमण ज्ञानोबा चामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. यामाध्यमातून मळणी यंत्रे, तेल घाणे यासारख्या शेतीशी नि...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत · पात्र विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत लातूर, दि. १६: अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्जांच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज महाआयटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. सन २०१७ पासून सुरू असलेल्या या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आणि अटी-शर्ती शासनाच्या स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे. शासकीय निर्णयातील सर्व अटी व शर्तींच्या अनुषंगाने, ज्या पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ मध...

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालय लिपीक पदासाठी भरती

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालय लिपीक पदासाठी भरती लातूर दि. १६ (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक यांनी  लातूर मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथे एका माजी सैनिक लिपीक पदावर तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवार हा माजी सैनिक असावा. माजी सैनिक लिपिकास प्राधान्य). उम्मेदवारांचे  वय हे माजी सैनिकासाठी ५८ वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी आणि संगणकीय ज्ञान एमएससीआयटी (MSCIT) उत्तीर्ण असावे. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन व मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान (लिहिणे व वाचणे) असणे गरजेचे आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व शारीरिकदृष्ट्या सक्षम उम्मेदवारांची मेस्कोच्या नियमाप्रमाणे व मेस्कोच्या गरजेनुसार कार्य करण्याची तयारी असावी.    तरी या पदासाठी पात्र व इच्छूक माजी सैनिकांनी आपला अर्ज व सर्व मुळ कागदपत्रासह सोमवार, २१ सप्टेंबर,२०२६ रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागद पत्र जमा करुन नाव नोंदणी करावी , असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी आवाहन केले आहे. ...

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयमयोजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत 

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयमयोजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन २०२६-२७ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  भोजन, निवास व निर्वाह भत्ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ३८ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.या योजनेतर्गत अर्ज करण्याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र अ...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्यात येते. सन २०२६-२७ साठी रिक्त असलेल्या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र,  तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांन...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (म...

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतचे लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी आयोजन

  ·          प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा लातूर, दि. १४ (जिमाका): राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , उपजिल्हाधिकारी , अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित प्रलंबित असलेले विविध महसुली दावे व अपीले सामंजस्याने व कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लातूर जिल्ह्यात येत्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या सामाजिक न्याय व शेतकरी कल्याणाच्या मूळ विचारांना स्मरून हे अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. महसुली दाव्यांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर निकाल विरोधात लागलेले पक्षकार वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात , ज्यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या धर्तीवर म...

भरती परीक्षा सुधारणांसाठी अभिप्राय, सूचना जिल्हास्तरीय विशेष कक्षात १८ सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार

लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी कामाच्या अनुषंगाने ही समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आस्थापना शाखा येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. याठिकाणी नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात. समितीच्या छत्रपती संभाजीनगर येथील भेटी दरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे समिती संवाद साधणार आहे. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक...

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद • सूचना, अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कक्ष लातूर, दि. १२ (विमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी टास्क फोर्सचा संवाद दौरा होणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्र...

लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल

Image
लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल लातूर, दि. ११ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ व जलद व्हावे, या उद्देशाने लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकांद्वारे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत, म्हणजेच १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकूण २१ विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १४२ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती या अभियानाच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, लातूर तालुक्यात ६ शिबिरांच्या माध्यमातून सर्वाधिक ११८ अर्ज प्राप्त झा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; लातूर जिल्ह्यातील ८,७३९ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; लातूर जिल्ह्यातील ८,७३९ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध लातूर, दि. ११ : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील एकूण ८१२ गावांमधील ८,७३९ शेतकरी सभासदांचा विशिष्ट क्रमांकासह समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २,०२८ सभासद असून उर्वरित ६,७११ सभासद राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे आहेत. ही यादी प्रमाणीकरणासाठी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेद्वारे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरीत झालेल्या, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित/फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात असून, यासाठी शासनाने म...

१५ सप्टेंबरपर्यंत जिल्हास्तरावर पाठवावेत • लातूर समाज कल्याण सहायक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन

१५ सप्टेंबरपर्यंत जिल्हास्तरावर पाठवावेत • लातूर समाज कल्याण सहायक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन लातूर, दि. ११: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावरील पात्र अर्ज जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविण्याकरिता जुने महाडीबीटी पोर्टल ११ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या लॉगिनमध्ये प्रलंबित असलेले केवळ पात्र शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ तपासून जिल्हास्तरावर वर्ग करावेत, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. १५ सप्टेंबर २०२६ ही जुन्या पोर्टलवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची अंतिम संधी असून या विहित मुदतीनंतर जुने पोर्टल कायमचे बंद करण्यात येणार आहे आणि त्याऐवजी 'MahaDBT 2.0' हे नवीन अद्ययावत पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित केले जाईल. मुदत संपल्यानंतर जुन्या प्रणालीवरील कोणताही प्रलंबित अर्ज स्वीकारला जाणार नाही व त्याची केंद्रहिश्श्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाणार नसल्याने, तांत्रिक अडचणी निर्माण होऊ...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी सणानिमित्त दोन दिवस बंद

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी सणानिमित्त दोन दिवस बंद लातूर, दि. ११ : येत्या सोमवारी, १४ सप्टेंबर, २०२६ रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने तसेच शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात जेष्ठा गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. तसेच सलग सुट्टी जोडून आलेली असल्यामुळे रविवार, १३ सप्टेंबर व गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६ रोजी बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेत सुरु राहील. बाह्यरुग्ण विभाग दोन दिवस बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. ****

पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर लातूर, दि. ११ : अहमदपूर येथील लांजी परिसरातील खरीप पीक परिस्थितीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांकडून पिकांबाबत माहिती घेतली. अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके यांच्यासह संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यादरम्यान सहकार मंत्री श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कृषी विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनाकडून अहमदपूर तालुक्यातील पीक परिस्थितीची माहिती घेतली. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये, राज्य सरकार संपूर्ण संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच चाकूर तालुक्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ***

मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात विशेष शिबीरांचे आयोजन • १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर आयोजन

मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात विशेष शिबीरांचे आयोजन • १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर आयोजन लातूर, दि. १० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ ते ३० सप्टेंबर, २०२६ या कालावधीत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण व्हावी, यासाठी लातूर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर, २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विशेष नोंदणी शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबीरांच्या वेळी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी आपापल्या केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, माहितीतील दुरुस्ती तसेच नावे वगळण्याचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण...

लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी ! 12 व 13 सप्टेंबरला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन

लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी ! 12 व 13 सप्टेंबरला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन लातूर, दि. 9 (जिमाका) : स्थानिक उद्योजक व उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्यावतीने लातूर येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 व 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उत्पादक, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व थेट विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनात कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी, विविध हस्तक...

लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियान

लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियान लातूर, दि. १० (जिमाका): राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून येत्या १४ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणाऱ्या या उत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यात 'श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. हे आरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी लातूरचे धर्मादाय सह आयुक्त विद्याधर शे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त (धर्मादाय रुग्णालय) श्रीमती एस. जे. निंबाळकर यांनी उपस्थित विश्वस्त, प्रशासक व आरोग्य सेवकांना मार्गदर्शन करत सर्व धर्मादाय रुग्णालयांनी गणेश मंडळांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे स्प...

कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिरांना लातूर जिल्ह्यात सुरुवात; आज दुसऱ्या दिवशी १४ ठिकाणी शिबिरांचे आयोजन

कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिरांना लातूर जिल्ह्यात सुरुवात; आज दुसऱ्या दिवशी १४ ठिकाणी शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०९ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा प्रारंभ आज, १० सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील लातूर मंडळ आणि गातेगाव मंडळातील मुरुड अकोला येथे झाला असून, याच दिवशी औसा तालुक्यातील औसा मंडळ, रेणापूर तालुक्यातील रेणापूर मंडळ, तसेच निलंगा तालुक्यातील निलंगा, हलगरा व कासार सिरसी या तीन मंडळांमध्ये शिबिरे झाली. ११ सप्टेंबर रोजी १४ ठिकाणी विशेष शिबिरे ११ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर तालुक्यातील मुरुड मंडळातील एकुर्गा, चिंचोली ब. मंडळातील पिंप्री अंबा, हरंगुळ बु. मंडळातील टाकळी आणि तांदुळजा मंडळातील भोसा येथे शिबीरे होतील. तसेच औसा तालुक्यातील किल्ला...

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचा मराठा आरक्षणविषयक प्रतिनिधींशी संवाद

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचा मराठा आरक्षणविषयक प्रतिनिधींशी संवाद • कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासाठी आयोजित शिबिरांबाबत दिली माहिती लातूर, दि. १० : जिल्ह्यात जात प्रमाण पत्राच्या वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत महसूल मंडळस्तरीय शिबिरे आयोजित केली आहेत. या अनुषंगाने माहिती देण्यासाठी, तसेच कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याकरिता येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील मराठा आरक्षणविषयक आंदोलनकर्ते, प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींकडून माहिती, सूचना जाणून घेतल्या. कुणबी नोंदी आढळलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता यावा, यासाठी मंडळ स्तरावर १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आह...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील विविध प्रलंबित कामांना गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील विविध प्रलंबित कामांना गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना ▪रुग्णालयाशी संबंधित कामांचा आढावा आणि पाहणी लातूर, दि. १० : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. रुग्णालयातील सेवा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्द्यांचा आढावा घेवून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाविद्यालयाच्या परिषद दालनात झालेल्या या बैठकीला लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. उदय माेहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टेकाळे, भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नसीम पटेल, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. नरवडे आणि अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह संबंधित इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ...

कुणबी प्रमाणपत्रासाठी लातूर जिल्ह्यात आजपासून महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन

कुणबी प्रमाणपत्रासाठी लातूर जिल्ह्यात आजपासून महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०९ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले असून, अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात १० सप्टेंबर २०२६ रोजी लातूर तालुक्यातील लातूर मंडळ आणि गातेगाव मंडळातील मुरुड अकोला येथे होणार आहे. याच दिवशी औसा तालुक्यातील औसा मंडळात, रेणापूर तालुक्यातील रेणापूर मंडळात, तसेच निलंगा तालुक्यातील निलंगा, हलगरा व कासार सिरसी या तीन मंडळांमध्ये शिबीरे आयोजित केली जातील. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर तालुक्यातील मुरुड मंडळातील एकुर्गा, चिंचोली ब. मंडळातील पिंप्री अंबा, हरंगुळ बु. मंडळातील टाकळी आणि तांदुळजा म...

लातूर जिल्ह्यात ४३ गावात झळकल्या कुणबी नोंदी; १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष कुणबी जात प्रमाणपत्र वाटप शिबिरे

लातूर जिल्ह्यात ४३ गावात झळकल्या कुणबी नोंदी; १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष कुणबी जात प्रमाणपत्र वाटप शिबिरे लातूर, दि. ०९ : जिल्ह्यात कुणबी नोंदींचा शोध घेणे, प्रमाणपत्रे वितरित करणे, वंशावळी जुळवणे आणि मराठा आरक्षणाशी संबंधित प्रशासकीय कामकाज गतीने पार पाडले जात आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २९ लाख ४३ हजार ६९० नोंदींची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान ४३ गावांमध्ये एकूण १,०३२ कुणबी नोंदी आढळून आल्या असून या सर्व नोंदी नागरिकांच्या माहितीसाठी संबंधित ४३ ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केल्या आहेत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही अपलोड करण्यात आल्या असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. *कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाची अद्ययावत स्थिती* शोधलेल्या नोंदींच्या आधारे आणि नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे एकूण २ हजार ९२४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ८७० अर्जांची छाननी पूर्ण ...

स्थानिक जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 'थाई मागुर' माशाचे संवर्धन आणि विक्री न करण्याचे आवाहन

स्थानिक जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 'थाई मागुर' माशाचे संवर्धन आणि विक्री न करण्याचे आवाहन लातूर, दि. ०९ : विदेशी मागुर हा मासा भक्षक स्वरूपाचा असून तो भारतातील स्थानिक जैवविविधता, मत्स्यसंपदा आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत घातक असल्याने नागरिकांनी, शेततळीधारकांनी व मत्स्य व्यावसायिकांनी या माशाचे संवर्धन, विक्री, साठवणूक आणि वाहतूक करू नये, असे आवाहन लातूर मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालयाने केले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने २२ जानेवारी २०१९ च्या आदेशानुसार या माशावर पूर्णतः बंदी घातलेली असून केंद्र सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागानेही याच्या वापरावर बंदी लागू केली आहे. या आदेशानुसार थाई मागुरचे मत्स्यबीज संचयन करणे, संवर्धन करणे, उत्पादन घेणे, अवैध वाहतूक करणे किंवा आहारात वापर करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या माशाला वाढवण्यासाठी कुजलेले मांस आणि टाकाऊ पदार्थ वापरले जात असल्याने पाण्याच्या प्रदूषणासह परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते, तसेच हा मासा अजैविक कचरा खात असल्याने त्याच्या शरीरात पारा, शिसे आणि आर्सेनिक यांसारखे घातक जड...

श्री गणेश उत्सवासाठी मिरवणूक वाहनांची तपासणी अनिवार्य; लातूरमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजनेतून सुविधा

श्री गणेश उत्सवासाठी मिरवणूक वाहनांची तपासणी अनिवार्य; लातूरमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजनेतून सुविधा लातूर, दि. ०९ (जिमाका) : येत्या १४ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लातूर शहरात श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान श्री गणेश स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश लातूर पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, गणेश मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी आणि तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी याकरिता प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय 'एक खिडकी योजना' कार्यान्वित करण्यात आली आहे. याच ठिकाणी श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. याकरिता संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित अर्ज करावा. या अर्जासोबत वाहनाची सर्व वैध कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्ज सादर केल्यानंतर वाहन तपासणीच्या वेळी संबंधित पोलीस ठाण्यात किंवा लातूर प्रादेशिक परिवहन ...

मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

Image
जात पडताळणीची १६ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली शासनाच्या सकारात्मक कार्यवाहीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती ; ५७ लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध छत्रपती संभाजीनगर, दि. ९ (विमाका) : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जात पडताळणीसाठी प्राप्त २१ हजार ५१ अर्जांपैकी १६ हजार ११० प्रकरणांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. शासनाची कार्यवाही पारदर्शक असून, मराठा समाजाला कायदेशीर व टिकणारे आरक्षण देण्याची शासनाची सकारात्मक भूमिका असल्याची माहिती मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर मराठवाड्यात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभ...