सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. २ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यात येत आहे. त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरिता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. (उदा: सन २०२४-२५ या वर्षाकरिता पात्रतेचा कालावधी १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ असा विचारात घेण्यात येईल.) इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी १५ मार्च २०२६ पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांच्याकडे दाखल करावेत. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहेरव्क्ष्ग अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, तसेच समाज कल्याण, सहायक आयुक्त, लातूर यांच्या कार्यालयाच्या socialjusticelatur.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. गायकवाड यांनी केले आहे. ******

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित