Posts

Showing posts from March, 2026

लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने ५ एप्रिल रोजी किनगाव येथे मोफत मेंदूविकार तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन

लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने ५ एप्रिल रोजी किनगाव येथे मोफत मेंदूविकार तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन लातूर, दि. ३१: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून मेंदूविकार असणाऱ्या बालकांसाठी मोफत तपासणी व औषधी वाटप करण्याची विशेष योजना जिल्हा परिषदेच्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीतून सन २०२५-२०२६ या वर्षात हाती घेण्यात आली आहे. या योजनेतंर्गत आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगजनांच्या मेंदूविकार आजारावर उपचार करण्यासाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ मेंदूविकार तज्ज्ञांमार्फत लाभार्थ्यांची मोफत तपासणी व उपचार करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तरी अहमदपूर, उदगीर व चाकूर परिसरातील मेंदूविकार असणाऱ्या लाभार्थ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी य...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा 31 मार्च रोजी लातूर जिल्हा दौरा

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा 31 मार्च रोजी लातूर जिल्हा दौरा लातूर दि. 30 : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार, दिनांक 31 मार्च, 2026 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सभापती प्रा. शिंदे यांचे सकाळी 10.45 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी 10.55 वाजता लातूर विमानतळ येथून शासकीय विश्रामगृह लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह लातूर येथे आगमन होईल व लातूर शहर जिल्हा भाजपच्यावतीने आयोजित स्वागत व सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून विष्णूदास मंगल कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, अंबेजोगाई रोड, लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.40 वाजता विष्णूदास मंगल कार्यालय येथे आगमन होईल व लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनगर समाजाच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा तसेच नूतन राज्यसभा सदस्य रामराव वडकुते व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परिक्षेत यश मिळविलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सभापती प्...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 31 मार्च रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 31 मार्च रोजी बंद राहणार लातूर, दि. 30 : श्री महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, 31 मार्च, 2026 रोजी बंद राहील. तसेच बुधवार, 1 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. *****

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत लातूरमध्ये जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांचा शुभारंभ; १० एप्रिलपर्यंत अर्जांचे आवाहन

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत लातूरमध्ये जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांचा शुभारंभ; १० एप्रिलपर्यंत अर्जांचे आवाहन लातूर, दि. २९ : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, या योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यासाठी ॲथलेटिक्स, कुस्ती, लॉन टेनिस आणि शूटिंग (नेमबाजी) या चार खेळांच्या अनिवासी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या केंद्रांमध्ये प्रवेशासाठी पात्र खेळाडूंनी १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी ३१ डिसेंबर २०२६ रोजी २१ वर्षांखालील वय असलेले मुले व मुली पात्र असतील. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमती पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच, शासकीय मान्यताप्राप्त डॉक्टरने ...

लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार

लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार लातूर, दि. ३०: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) अभियान स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रशिक्षण पार पडणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान ३० ते ४० शेतकऱ्यांनी यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनद्वारे संचलित ही डिजिटल शेती शाळा एक प्रगत ऑनलाईन व्यासपीठ असून, याद्वारे तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन झूम (Zoom) आणि युट्युब (YouTube) च्या माध्यमातून दिले जाणार आहे. या उपक्रमात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, तसेच कृषी ताई व कृषी सखी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावनिहाय नियोजन करून एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकऱ्यांनी ए...

विशेष लेख : ई-प्रशासनाचा 'लातूर पॅटर्न': आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने प्रशासन गतिमान !

              महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये , राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘ १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा ’ कार्यक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वरूपात कार्यान्वित करण्यात आला. शासकीय कामकाज अधिक पारदर्शक , गतिमान , तंत्रज्ञानाधिष्ठित आणि प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकाभिमुख करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करत , राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान पटकाविले आहे. लातूर जिल्ह्याने तंत्रज्ञानाचा वापर केवळ कार्यालयीन कामकाजापुरता मर्यादित न ठेवता तो थेट जनसामान्यांना जलद सेवा देण्यासाठी केला. या विशेष कामगिरीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (२८ मार्च) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान करण्यात आला.     ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान

Image
  ·          १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी           लातूर , दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सन्मान करण्यात आला.               यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील प्रशासनिक कार्यालयांसाठी १५० दिवसांचा विशेष ई-प्रशासन कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये प्रशासन अधिक पारदर्शक , गतिमान , तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिकाभिमुख करण्याचा हा उपक्रमाचा मुख्य ...

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ·तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू लातूर, दि. २६ : ज्याप्रमाणे निवडणुकांचे आयोजन महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे जनगणना ही प्रक्रिया देखील देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यमापन करणाऱ्या या प्रक्रियेतूनच देशाच्या विकासाचा खरा रोडमॅप तयार होतो. त्यामुळे जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून, अचूक नियोजन करावे आणि कोणतीही दिरंगाई करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले. भारताची जनगणना २०२७ अंतर्गत तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रशिक्षण सत्राला जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले, मिलिंद पाटील, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 मार्च रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 मार्च रोजी बंद राहणार लातूर, दि. 24 (जिमाका) : श्रीराम नवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, 26 मार्च, 2026 रोजी बंद राहील. तसेच शुक्रवार, 27 मार्च, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. ****

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात “आरोग्य” सांभाळा...!

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात “आरोग्य” सांभाळा...! सध्या वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मार्च महिन्यापासुनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पाहत आहोत. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान ४५ अंश सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्याभागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सन बर्न, हिट क्रॅम्प्स (उष्णतेमुळे स्नायुंना गोळे येणे), हिट एग्जोर्शन (उष्णतेमुळे प्रचंड थकवा), हिट स्ट्रोक (उष्माघात) यांसारखे प्रामुख्याने उष्णताविकार असून साधारण एप्रिल, मे या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. उष्माघातासाठी अती जोखमीचे घटक  उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक  वृद्ध व्यक्ती व लहान मुले  गरोदर महिला  स्थूल व्यक्ती व पुरेशी झोप न झालेले व्यक्ती  मधुमेह, हदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक  घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रीत, घरदार नसलेले गरीब ...

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना • अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा लातूर, दि. २४ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. गॅस वितरणाबाबत पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही परिस्थितीत अवैध विक्री होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. लातूर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक आणि सेल्स ऑफिसर्सची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. गरजू आणि पत्र ग्राहकांनाच गॅसचा पुरवठा व्हावा, यासाठी एका गॅस कनेक्शनधारकाला २५ दिवसांच्या आत दुसरे सिलिंडर देण्यात येऊ नये. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना १०० टक्के घरपोच डिलिव्हरी देण्यात यावी. वितरकांनी 'फिफो' आणि ओट...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी लातूर, दि. २४ : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदांच्या भरतीसाठी सीडीएस परीक्षेची तयारी करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे सीडीएस कोर्स क्रमांक ६५ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी २८ एप्रिल २०२६ रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. या कोर्सचे आयोजन ४ मे २०२६ ते १३ मे २०२६ या कालावधीत नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येताना सैनिक कल्याण पुणे यांच्या संकेतस्थळावरून किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सीडीएस-६५ कोर्सचे प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची ...

लातूरमध्ये जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; १०० दिवसीय विशेष शोध मोहिमेचा सुरुवात

लातूरमध्ये जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; १०० दिवसीय विशेष शोध मोहिमेचा सुरुवात लातूर, दि. २४ : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 'क्षयमुक्ती'चा निर्धार करत या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यात १०० दिवसीय विशेष क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात महान शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. एस.एन. तांबारे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, यावर प्रकाश टाकला. जनजागृती रॅली आणि पथनाट्य मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून महात्मा गांधी चौकापर्यंत काढण्यात आली व पुन्हा त्याच ठिकाणी समारोप झाला. य्वेली बाभळगाव येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्षयरोग विषयावर प्रभावी पथनाट्य ...

‘जिल्हा युवा पुरस्कार 2025-26’ करिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

‘जिल्हा युवा पुरस्कार 2025-26’ करिता अर्ज सादर करण्याचे आवाहन · 10 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर दि. 23: राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने शासन निर्णय 12 नोव्हेंबर, 2013 अन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक, युवतींना व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. युवक, युवतीसाठी पुरस्काराचे स्वरुप गौरव पत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये 10 हजार व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये 50 हजार असे आहे. यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून जिल्हा युवा पुरस्कार 2025-26 वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2026 अशी आहे. यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावेत व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात क्रीडाधिकारी बाबासाहेब इंगोले यांच्याशी संपर्क साधावा, अस...

ातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर, दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 25 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिक्षण महर्षी वसंतराव काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शासकीय आय.टी.आय), औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात पुणे येथील स्वेस कॉर्प लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथील पिप्ती इंजिनिअरींग प्रा. लि., पुणे येथील प्रॉम्प्ट इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस प्रा.लि., सोलापूर येथील कोलब्रो ग्रुप प्रा. लि., लातूर येथील सनरिच ॲक्वा , चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा. लि., श्रीराम फायनान्स लिमिटेड, माहिष्मती सेक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि., फ्यिुजन फायनान्स लिमिटेड या आस्थापना सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय. सर्व ट्रेड, डिप्लोमा सर्व ट्रेड तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होणार आह...

जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त मद्यविक्री बंद

जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त मद्यविक्री बंद लातूर, दि.20: जिल्ह्यात 21 मार्च, 2026 रोजी एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार मुस्लिम बांधवातर्फे रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे. ****

देवणी येथे 4 मार्च रोजी महादेव यात्रेनिमित्त पशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्त पशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन लातूर, दि. 20 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी येथे गुरुवार, 2 एप्रिल 2026 रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पशुधन व कुक्कुट गटांची नोंदणी 2 एप्रिल रोजी प्रदर्शनस्थळी सकाळी 8.30 वाजता सुरु होईल व उद्घाटन ठिक 11 वाजता करण्यात येणार आहे. या पशु प्रदर्शनात देशी गोंवश (देवणी व लालकंधारी), संकरीत गोवंश, उस्मानाबादी शेळी, अश्व व कुकुट पक्षी मोठ्या संख्येने सहभागी होतात. सर्व पशुपालकांनी आपल्या जातीवंत पशुधनासह या भव्य पशु व पक्षी प्रदर्शनात सहभागी होवून यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवणी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. असे राहतील पशुधनाचे गट देवणी नर गट - 1) देवणी नर 1 वर्षाखालील वासरे गट 2) देवणी नर 1 वर्षावरील वासरे अदात गट 3) देवणी नर 2 दात वळू गट 4) देवणी नर 4 दात वळू गट देवणी मादी गट - 1) देवणी मादी 1 वर्षाखालील वासरे गट 2) देवणी मादी एक वर्षावरील वासरे गट 3) देवणी मादी गाभण कालवड गट 4) देवणी मादी गाभण ...

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार; मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार; मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लातूर, दि. २० : भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे कामे सुरू झाली असून, मतदारांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे. या अनुषंगाने १) Blurr Photo (धूसर किंवा अस्पष्ट छायाचित्र दुरुस्त करणे), २) DSE (Demographically Similar Entries - समान लोकसंख्याशास्त्रीय नोंदी तपासणी व दुरुस्ती), ३) SIR Mapping (मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी नकाशा संलग्नीकरण/मॅपिंग) आणि Book a Call (BLO सोबत कॉल बुकिंग) इत्यादी कामे तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. हे कामे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer - BLO) यांनी आपल्या नेमणुकीच्या क्षेत्रातील मतदारांना समक्ष भेटून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. २३५...

भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही

भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही लातूर: आज दिनांक 20.03.2026 रोजी भादा व औसा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याची माहिती स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत तात्काळ National Center for Seismology (NCS), नवी दिल्ली यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली. त्यांच्या तपासणीनुसार भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. - - जिल्हा प्रशासन लातूर ****

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत महिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत महिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी · ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा लातूर, दि. २० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी "एक गाव, एक कृषी अवजारे बँक" या तत्त्वावर महिला शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला स्वयंसहाय्यता गट, उमेद महिला गट किंवा महिला ग्राम संघ यांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा यंत्रसामग्रीवर होणारा खर्च कमी होईल आणि शेती उत्पादकता वाढेल. निवड झालेल्या महिला गटाला कमाल ४० लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला शेतकरी गटांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक महिला गटांनी https://dbt-ndksp-agribusiness.mahapocra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन ५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर...

मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार लातूर, दि. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये मालमत्ता नोंदणीला मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आर्थिक वर्ष संपुष्टात येत असल्याने व नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला लोकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीकडे अधिक कल असतो. यामुळे दस्तऐवज नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, इष्टांक पूर्ती, अभिनिर्णय, कमी पडलेले मुद्रांक शुल्क वसुली इत्यादी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी या सुट्टीच्या दिवशीही कार्यालये कार्यान्वित राहतील. याशिवाय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, लातूर क्रमांक १ हे कार्यालय नियमितपणे शनिवार व रविवार सुरू असते. त्यामुळे या कार्यालयाची साप्ताहिक सुट्टी सोमवार व मंगळवार असते. परंतु मार्च अखेरच्या कालावधीत मंगळवार हा दिवसही कार्यालय सुरू राहील. सर्व संबंधित नागरिकांनी या सुधारित वेळापत्रकाचा लाभ घ्यावा व आवश्यक दस्तऐवज नोंदणीसाठी वेळीच कार्यालयात भेट द्यावी, असे ...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 19 व 21 मार्च रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 19 व 21 मार्च रोजी बंद राहणार लातूर, दि. 18 : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, 19 मार्च 2026 (गुढीपाडवा) आणि शनिवार, 21 मार्च 2026 (रमजान ईद) रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच रविवार, 22 मार्च 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. ****

सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक-टंकलेखक (गट-क) पदभरती परीक्षेच्या तारखेत बदल; आता २३ मार्च रोजी होणार ऑनलाईन परीक्षा

सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक-टंकलेखक (गट-क) पदभरती परीक्षेच्या तारखेत बदल; आता २३ मार्च रोजी होणार ऑनलाईन परीक्षा लातूर, दि. १६ : सैनिक कल्याण विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांसाठी टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या तारखेपेक्षा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. पोलीस भरतीमुळे या परीक्षेची तारीख बदलण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

लातूर महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन लातूर (प्रतिनिधी): महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित 'लातूर जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५-२६' चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या सोहळ्यात ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध उपविभागातील खेळाडूंनी शिस्तबद्ध पथसंचलन (परेड) केले. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या पथकाचे नेतृत्व केले. यावेळी सर्व स्पर्धकांना क्रीडा नियमांचे पालन करण्याची शपथ देण्यात आली. उद्घाटनानंतर झालेल्या झुंबा डान्समध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या...

स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक निर्णय

स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक निर्णय मुंबई, दि. 16: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्वयंसेवी सेवेचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) सातत्याने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्वयंसेवी सेवेकरिता CME (Continuing Medical Education) क्रेडिट गुण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी स्पष्ट व पारदर्शक धोरण राबविण्यात येत आहे.  स्वयंसेवी सेवेसाठी सीएमई (CME) क्रेडिट गुण देण्याबाबत  सखोल विचार करून परिषदेकडून सध्या अंमलात असलेल्या प्रणालीची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त असलेल्या संघटना, संस्था, अध्यापन संस्था तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना ठराविक निकष व मार्गदर्शक तत्वांनुसार CME क्रेडिट गुण प्रदान करण्यात येत आहेत. ...

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे

Image
ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे • औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद लातूर, दि. १४ : ग्रंथ वाचनाने माणसाचे मस्तक समृद्ध होते आणि समृद्ध झालेले मस्तक कोणापुढेही सहज नतमस्तक होत नाही, हा महापुरुषांचा विचार आजच्या डिजिटल युगात रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार विक्रम काळे यांनी केले. औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित दोन दिवसीय लातूर जिल्हा ग्रंथोत्सव व ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगीराज माने, ग्रंथ मित्र राम मेकले, प्रभाकर कापसे, प्राचार्य एस. एम. जलसगरे, संजय सूर्यवंशी, प्रा. अंकुश नाडे, शिवलिंग औटी, रविअप्पा चट्टे आणि राजकुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा वर्गामध्ये वाचनाची ओढ निर्माण करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवासार...

*रेशीम शेती ही ग्रामीण समृद्धीची नवी चळवळ व्हावी-उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ* · नांदगाव येथे रेशीम शेतकरी व रीलर्स मेळावा उत्साहात संपन्न

सुधारित *रेशीम शेती ही ग्रामीण समृद्धीची नवी चळवळ व्हावी-उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ* · नांदगाव येथे रेशीम शेतकरी व रीलर्स मेळावा उत्साहात संपन्न लातूर, दि. 13 : शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावांची प्रगती व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच भूमिकेतून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 'रेशीम शेती क्लस्टर' उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी सांगितले. धारवाड केंद्रीय रेशीम मंडळाच्यावतीने लातूर तालुक्यातील नांदगाव येथील कौसल्या सिल्क रीलिंग (जयराम मठ) येथे आयोजित “आधुनिक तंत्रज्ञान, समृद्ध रेशीम उद्योग” या विषयावरील रेशीम शेतकरी व रीलर्स मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला लातूरचे रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, धारवाड केंद्रीय रेशीम मंडळाचे डॉ. विराज सोमकुंवर, 'पोखरा' योजनेचे तंत्र अधिकारी जयसिंग जगधने, सेवानिवृत्त अधिकारी नरसिंग बावगे, रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती शरद दरेकर, कौसल्या सिल्क रीलिंगचे संच...

गॅस सिलेंडरचा साठा आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 'ॲक्शन मोड'वर; जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात

Image
*गॅस सिलेंडरचा साठा आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 'ॲक्शन मोड'वर; जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात* लातूर, दि. १३ : इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या ९८९००८४१६८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गॅस पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील गॅस एजन्सींच्या साठा तपासणीसाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी १० विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके जिल्ह्यातील गॅस एजन्सीला, गॅस गोडावूनला 'सरप्राईज व्हिजिट' देऊन गॅस सिलेंडर साठ्याची तपासणी करतील. तसेच ...

लातूर जिल्ह्यात बांबू विकास आणि सामाजिक सुरक्षा प्रकल्पाची होतेय प्रभावी अंमलबजावणी; ६ लाखांहून अधिक रोपांची लागवड

Image
*लातूर जिल्ह्यात बांबू विकास आणि सामाजिक सुरक्षा प्रकल्पाची होतेय प्रभावी अंमलबजावणी; ६ लाखांहून अधिक रोपांची लागवड* लातूर, दि. १२ : राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यांना हवामान बदलाच्या संकटातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांबू आधारित कृषी-वनीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बांबू उद्योग धोरणही जाहीर केले आहे. हवामान बदलामुळे शेतीमध्ये निर्माण होणारी अनिश्चितता दूर करण्यासाठी बांबू हे एक प्रभावी पीक ठरत आहे. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी लातूर जिल्ह्यात ‘बांबू विकास आणि सामाजिक सुरक्षा’ प्रकल्प राबविला जात आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशन आणि गोदरेज ॲग्रोव्हेट यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३ पासून या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना केवळ बांबू लागवडीचे प्रशिक्षणच दिले जात नाही, तर त्यांच्या कौशल्य विकासावरही भर दिला जात आहे. लातूर जिल्ह्यात राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्याव...

शासकीय योजनांच्या लाभासाठी दिव्‍यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करावी · केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ मिळणार

शासकीय योजनांच्या लाभासाठी दिव्‍यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करावी · केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ मिळणार लातूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागातंर्गत दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात दिव्यांगाची हेळसांड होवू नये व घरबसल्यास योजनेचा लाभ घेणे सोईचे होईल, यादृष्टीकोनातून मुंबई दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्यावतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांनी केले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत दिव्यांग बांधवांना सक्षम बनविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ दिव्यांगांना सुलभ होण्याच्या दृष्टीने या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध योजना यात असून विविध विभागातील माहिती यात दर्शविण्यात आली आहे. एकाच छताखाली दिव्यांग बांधवांच्या विविध योजना यात समाविष्ट ...

क्रीडा ई-प्रमाण : घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रणालीवर अभिलेख उपलब्ध

क्रीडा ई-प्रमाण : घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रणालीवर अभिलेख उपलब्ध लातूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही, ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल. खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटाशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल, जो स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी (उदा. MPSC, पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील. आगामी पदभरतीसाठी 'क्रीडा ई-प्रमाणपत्र' बंधनकारक महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रम...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली; जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली; जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण · पेपरलेस पद्धतीने सादर होणार वेतन देयके लातूर, दि. ११ : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतन देयकासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नवीन सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये पेपरलेस पद्धतीने केवळ ऑनलाईन वेतन देयके दाखल करावी लागणार असून वेतन देयक प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व पारदर्शक होणार आहे. या प्रणालीच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत १० मार्च २०२६ रोजी दोन सत्रात जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाला लातूर जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे अधिनस्त असलेल्या आहरण व संवितरण अधिकारी, लेखा विषयक काम पाहणारे कर्मचारी यांना जुन्या सेवार्थ प्रणालीतून नवीन सेवार्थ प्रणालीत डाटा ट्रान्स्फर करण्या...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली; जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली; जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण · पेपरलेस पद्धतीने सादर होणार वेतन देयके लातूर, दि. ११ : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतन देयकासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नवीन सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये पेपरलेस पद्धतीने केवळ ऑनलाईन वेतन देयके दाखल करावी लागणार असून वेतन देयक प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व पारदर्शक होणार आहे. या प्रणालीच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत १० मार्च २०२६ रोजी दोन सत्रात जिल्ह्यातील सर्व आहारण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाला लातूर जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे अधिनस्त असलेल्या आहरण व संवितरण अधिकारी, लेखा विषयक काम पाहणारे कर्मचारी यांना जुन्या सेवार्थ प्रणालीतून नवीन सेवार्थ प्रणालीत डाटा ट्रान्स्फर करण्य...

‘जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी; लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

‘जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी; लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह लातूर, दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह)चे शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (तीन प्रती) सह उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास 12 मार्चपर्यंत अंतिम मुदत · शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पत्र विद्यार्थ्यांना करता येईल अर्ज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास 12 मार्चपर्यंत अंतिम मुदत · शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पत्र विद्यार्थ्यांना करता येईल अर्ज लातूर, दि. 10 (जिमाका) : सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी http://hams.mahait.org हे नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. परंतु, वसतिगृह क्षमतेअभावी तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीमुळे वसतिगृहात प्रवेश घेवू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी त्यांचे अर्ज विद्यार्थी लॉगीनला महा-आयटीकडून परत पाठविण्यात आलेले आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तसेच ज्यांचे अर्ज विद्यार्थी लॉगीनला परत आले आहेत. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे http://hams.mahait.org या पोर्टलवर 12 मार्च, 2026 पु...

लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आज नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण

लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आज नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण लातूर, दि. 9 : माहे एप्रिल २०२६ पासून सर्व वेतन देयके केवळ राज्य शासनाच्या नवीन सेवार्थ प्रणालीद्वारेच तयार करून ऑनलाइन पद्धतीने ई-हस्ताक्षरासह ई-देयक कोषागारात सादर करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या नवीन प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १० मार्च २०२६ रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला माळा, डीपीडीसी हॉल, लातूर येथे दोन सत्रांत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी ११.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सर्व उपकोषागार कार्यालय स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी, तर दुपारच्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.०० वाजेपर्यंत कोषागार कार्यालय लातूर मुख्यालय स्तरावरील अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल. या प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच वेतन देयक संबंधित लेखा विषयक कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः ...

लातूर जिल्ह्यात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

लातूर जिल्ह्यात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन लातूर, दि. ९ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात येत आहे. ही २०२६ या वर्षातील पहिली राष्ट्रीय लोकअदालत असून, देशभरातील न्यायालयांमध्ये एकाच दिवशी अशा लोकअदालतींचे आयोजन होत आहे. या लोकअदालतीत प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र विविध प्रकारची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, परकाम्य संलेख अधिनियम कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादरीत (चेक बाऊन्स) प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, कामगार/औद्योगिक न्यायालयातील प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तसेच बँक/वित्तीय संस्थांच्या वाद दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे. राष्ट्रीय लोकअदालत ही एक प्रभावी पर्यायी विवाद निराकरण पद्धत आहे. येथे पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळते आणि दोन्ही पक्षांच्या आपसी संमतीने तडजोड होऊ शकते. अशा तडजोडीमुळे पक्षक...

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत लातूर, दि. ०९ : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या केंद्रांमुळे राज्यातील तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी उच्च दर्जाचे निवासी प्रशिक्षण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स आणि कुस्ती या प्रत्येक खेळासाठी २० खेळाडू (एकूण ४०) यांची निवड करण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष किंवा dyd.syslatur@rediffmail.com (mailto:dyd.syslatur@rediffmail.com) या ई-मेलवर दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत सादर करावेत. पात्रता निकष : वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०२६ रोजी २५ व...