लातूर जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक निर्णय! मोटार अपघात नुकसान भरपाईपोटी २ कोटी ९० लाख रुपये मंजूर
लातूर जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक निर्णय! मोटार अपघात नुकसान भरपाईपोटी २ कोटी ९० लाख रुपये मंजूर दिवंगत न्यायाधीश स्व. उद्धवजी पाटील यांच्या कायदेशीर वारसांना लातूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या हस्ते धनादेश सुपूर्द लातूर, दि. 16 : लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार अपघात नुकसान भरपाईच्या दाव्यात (MACP) ऐतिहासिक तडजोड झाली असून तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे टाटा ए.आय.जी. इन्शुरन्स कंपनीने मान्य केले आहे. लातूर जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील ही सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे दिवंगत न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अपघातातील मृत्यूनंतर नुकसानभरपाईचा दावा काही काळापूर्वी दिवंगत न्यायाधीश स्व. उद्धवजी पाटील यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांतर्फे नियमानुसार मोटार अपघात नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेत न अडकता पीडित कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई मिळावी] या उद्देशाने सर्व संबंधितांनी सामोपचार...