लातूर जिल्ह्यात ३ व ८ मार्च रोजी मद्यविक्री बंद

लातूर जिल्ह्यात ३ व ८ मार्च रोजी मद्यविक्री बंद लातूर, दि. ०२: जिल्ह्यात धुलीवंदन व रंगपंचमीनिमित्त ३ मार्च, २०२६ आणि ८ मार्च, २०२६ रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. ३ मार्च २०२६ धुलीवंदननिमित्त सायंकाळी ६ वाजेपर्यंत उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपुर तालुका व निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, तगरखेडा व शेळगी या गावातील मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच ८ मार्च २०२६ रोजी रंगपचंमीनिमित्त लातूर, औसा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, चाकूर व निलंगा तालुक्यातील (निलंगा तालुकयात औराद शहाजनी, तगरखेडा, शेळगी ही गावे वगळून) मद्यविक्री सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हे आदेश सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती यांना लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारंकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक केशव राऊत यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन