निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…! प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन
निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…! प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन लातूर दि. 31 : सध्या भारतात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकरने क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी क्षयरोगाचे उच्चाटनाचे नियोजन केलेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 4 लाख अतिजोखीम गटातील व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नोंदणी करण्यात आलेल्या सर्व अतिजोखीम गटातील व्यक्तींचे एक्सरे तपासणी, बेडका तपासणी करण्यात येणार आहे. सततचा खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, छातीत दुखणे, वजन घटणे, भुक मंदावणे, रात्री घाम येणे, ताप येणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मानेवर किंवा काखेत गाठी येणे, आवाजात बदल होणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. सद्यास्थितीत जिल्ह्यात 1 हजार 882 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 365 रुग्णांना पोषण आहार किट पुरविले आहेत. अद्याप 1 हजार 517 क्षयरुग्ण प्रतिक्षेत असून जिल्ह्यातिल उपचारावर असलेल्या क्षयरुग्णांना निक्षय मित्र बनून वैयक्तिक, संस्था, लोकप्रतिनिधी, उद्योजक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी व सीएसआ...