पदवीधर मतदार यादीत 6 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार

पदवीधर मतदार यादीत 6 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार लातूर, दि. 17 (जिमाका): भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार ०५-औरंगाबाद विभागाकरीता पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार मतदारयादीत नाव समावेश करण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. पदवीधर मतदारसंघाची मतदारयादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार केली जाते. त्यानुसार सर्व पदवीधारकांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ०५-औरंगाबाद विभागाकरीता नव्याने तयार होणाऱ्या मतदारयादीत नाव समावेश करण्यासाठी लातूर तालुका हद्दीत सर्वसाधारण रहिवासी असलेल्या सर्व पदवीधारकांनी लातूर तहसील कार्यालय येथे नियुक्त पथकाकडे ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास