माजी सैनिकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

माजी सैनिकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. 07 (जिमाका): पुणे येथील ज्ञानदीप समाज विकास संस्था यांच्या संचलनाखालील पुणे येथील करिअर डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे माजी सैनिकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. माजी सैनिकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्यास त्यांना फोनद्वारे समुपदेशन करून प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती करिअर डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी दिली आहे. तरी 35 ते 40 वयोगटातील इच्छुक माजी सैनिकांनी आपले डिस्चार्ज बुक आणि ओळखपत्र घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत