दीपावली सणानिमित्त 21 व 23 ऑक्टोबर रोजी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडी राहणार बंद

दीपावली सणानिमित्त 21 व 23 ऑक्टोबर रोजी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडी राहणार बंद लातूर, दि. 14 (जिमाका): दिपावली सणानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दीपावली सणानिमित्त मंगळवार, 21 ऑक्टोबर आणि गुरुवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी बंद राहील. तसेच सोमवार, 20 ऑक्टोबर आणि बुधवार, 22 ऑक्टोबर 2025 रोजी ओपीडी सुरु राहील. रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहणार आहे. शुक्रवार, 24 ऑक्टोबर, 2025 रोजी पासून बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास