नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता लातूर, दि. ३० : नववर्षानिमित्त राज्यातील एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२ व एफएल-४ व नमुना ई अनुज्ञप्त्यांच्या आस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्यास राज्य शासनाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (१) (सी) व कलम १४३(२)(एच१)(iv) अन्वये मंजुरी दिली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफएल-२) आणि बंद बाटलीतून बिअर विक्री (एफएलबीआर-२) आस्थापना सुरु ठेवण्यास ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. परवाना कक्ष (एफएल-३) आणि क्लब अनुज्ञप्ती (एफएल-४) यांच्या कालावधीत ३१ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रासाठी रात्री १.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. तसेच सीएल-३ अनुज्ञप्तीसाठी महापालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत