रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशनच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार -राज्यमंत्री संजय बनसोडे *डॉ.दिलीप लाखर,डॉ.सुरेश चांडक,डॉ. राजेंद्र शिवडे व डॉ.रमेश मलानी यांना जीवन गौरव पुरस्कार, तर डॉ.श्लोक लोलगे, डॉ.हेमंत पटेल व डॉ. दिपक पाटकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव लातूर, दि.29:- राज्यातील महाविकास आघाडीचे शासन सर्व घटकांना मदत करणारे शासन आहे. राज्यातील इंडियन रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशनच्या संदर्भातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी शासन व असोसिएशन मधील दुवा म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता...
Posts
Showing posts from February, 2020
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील सर्व शाळांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वर्षभर उपक्रम राबवावेत - शिक्षणाधिकारी वैशाली जामदार * मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हेच खरं शिक्षण * जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा लातूर, दि.27:- मातृभाषेतून मिळालेले शिक्षण हेच खरं शिक्षण असून महाराष्ट्रात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे सुरुवातीचं अक्षर मराठीतूनच म्हणत असतं. मातृभाषाच आपल्याला समृद्ध करत असते. मुलांनी लहान वयातच लिहायला वाचायला आणि आपल्या आई-वडिलांप्रमाणे मातृभाषेला ही जपायला हवं . शाळांनी फक्त मराठी भाषा दिनादिवशीच नाही तर वर्षभर असे मराठी भाषेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम राबवायला हवेत अशाही अपेक्षा अध्यक्षीय समारो...
- Get link
- X
- Other Apps
मराठी भाषेची अस्मिता संवर्धनाची जबाबदारी सर्वांनी जपायला हवी -प्राचार्य.डॉ. सिद्राम डोंगरजे *मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे कवयित्री शैलेजा कारंडे यांच्या हस्ते उद्घाटन *विविध सामाजीक, राजकीय,माय माऊली, रान, मैत्री व इतर वास्तववादी विषय व समस्यावरील कवितांचे सादरीकरण लातूर, दि 27:- आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी भाषेवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने आपली मराठी मातृभाषा लुप्त होऊ लागली आहे. तेव्हा मराठी मातृभाषेची अस्मिता संवर्धनाची जबाबदारी सर्वानी जपायला हवी, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी केले. विभागीय, जिल्हा माहिती कार्यालय,श्री. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्र...
- Get link
- X
- Other Apps
बसवेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन *प्रसार माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे लातूर, दि 26:- विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय लातूर व श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.20 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवियीत्री सौ. शैलजा कारंडे, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक श्री. यशवंत भंडारे यांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिद्राम डोंगरगे हे भूषवणार आहेत. तरी या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बसवेश्वर महाविद्यालयाच्या मराठ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयात नाफेडच्या वतीने तुर खरेदी केंद्र सुरु लातूर,दि.24:- हंगाम 2019-20 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तुर शेतमालाची खरेदी सुरु करण्यात आलेली आहे, लातूर जिल्हयातील लातूर,उदगीर, औसा,अहमदपूर,हालसी (निलंगा), चाकुर,रेणापूर, हालकी (शिरुर अनंतपाळ),लोणी व देवणी या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.त्याकरीता संबंधीत संस्थांना खरेदीचे आदेश देण्यात येत आहेत. तरी जिल्हयातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर तूर आणावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. ****
- Get link
- X
- Other Apps
“ दिव्यांग उपकरण चिन्हीकरण शिबीराचे नागपूर येथे आयोजन ” लातूर,दि.24:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपूर तथा महावीर इंटरनॅशनल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ते 7 मार्च 2020 रोजी एम.एल.ए. हॉस्टेल, नागपूर येथे दिव्यांग उपकरण चिन्हीकरणाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल,व्हीलचेअर, कैलीपर्स, कृत्रिम जयपूर पाय, जयपूर कृत्रिम हात, कुबडया, शुज,बेल्ट, कमी ऐकू येणाऱ्यांसाठी कानाचे मशिन या सर्व उपकरणांचा समावेश असणार आहे व ती सर्व उपकरणे लाभार्थ्यांना नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहेत. या शिबीरास जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्याकडे नावे नोंदवावित असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांनी प्रसिधदी पत्रकाव्दारे कळविले आहे. ****
- Get link
- X
- Other Apps
*महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019: *बाभळगाव व आष्टा येथील पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत *जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बाभळगाव व आष्टा येथून प्रारंभ लातूर, दि. 24 : जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बाभळगाव ता. लातूर व आष्टा ता. चाकूर या दोन गावातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून योजनेचा पथदर्शक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत बाभळगाव येथील 172 तर आष्टा गावातील 139 शेतकरी पात्र ठरलेले असून या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी संस्था व आपले सरकार केंद्रावर लावण्यात आलेल्या आहेत. तरी संबंधित पात्र शेतकऱ्या...
- Get link
- X
- Other Apps
राज्यात स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना करणार -सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख * राज्यात नवीन पाच बालनाट्य केंद्र सुरू करण्याची घोषणा; यातील एक बालनाट्य केंद्र लातुरात * ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणार * बाल कलाकार स्वयम् शिंदे व सिद्धी देशमुख यांच्या हस्ते राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन लातूर, दि.17:- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर राज्यातील कलावंतासाठी महाराष्ट्र राज्य स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असून याबाबत कलावंतांनी आपल्या सूचना द्याव्यात असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने आयोजित 17 वी राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अं...
- Get link
- X
- Other Apps
10 वी व 12 वी परीक्षेसंदर्भात विभागीय मंडळ हेल्प लाईन लातूर,दि.17:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, शिवाजीनगर ,पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी/ मार्च -2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ, स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इयत्ता 12 वी साठी 02382-251733 या हेल्पलाईनवर सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर व पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन विभागीय सचिव,यांनी केले आहे. लातूर- 1.दानाई एम. एस. -9422015152, 2. जाधव ए.एम.-9421379911, उस्मानाबाद- 3. कदम व्हि.के. -9423721756, 4. पांचाळ एस.एम.-9421361543, नांदेड- 5. कच्छवे बी.एम.- 9371261500, 6. कारखेडे बी.एम.- 9860912898,8669128735. ...
- Get link
- X
- Other Apps
जीडीसी अँड ए व सी एच एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन लातूर, दि.17:- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचेकडून शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. अँड ए बोर्ड ), परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक 22,23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील प्रमाणे महत्वाच्या सुचना दिलेल्या आहेत. परीक्षार्थींना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधीमध्ये www.mahasahakar.maharashtra.gov.in व www.sahakaryaukta.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Link उपलब्ध् करुन देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 15 फेब्रुवारी ते 16 मार्च 2020 असा आहे. ऑनलाईन अर्जभरण्यामध्ये काही अडचणी उद्भवल्यास परीक्षार्थीनी हेल्पलाईन क्रमांक 022-40293000 (Option-4) येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे. ...