“दिव्यांग उपकरण चिन्हीकरण शिबीराचे नागपूर येथे आयोजन”
लातूर,दि.24:-
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व भगवान
महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपूर तथा महावीर इंटरनॅशनल, नागपूर यांच्या
संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ते 7 मार्च 2020 रोजी एम.एल.ए. हॉस्टेल, नागपूर येथे
दिव्यांग उपकरण चिन्हीकरणाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या
शिबीरामध्ये दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल,व्हीलचेअर, कैलीपर्स, कृत्रिम जयपूर पाय,
जयपूर कृत्रिम हात, कुबडया, शुज,बेल्ट, कमी ऐकू येणाऱ्यांसाठी कानाचे मशिन या सर्व
उपकरणांचा समावेश असणार आहे व ती सर्व उपकरणे लाभार्थ्यांना नि:शुल्क वाटप करण्यात
येणार आहेत.
या
शिबीरास जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर किंवा जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्याकडे नावे नोंदवावित असे जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, लातूर यांनी प्रसिधदी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment