बसवेश्वर
महाविद्यालयात
मराठी
भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
*प्रसार माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी
या कार्यक्रमास उपस्थित राहावे
लातूर,
दि 26:- विभागीय व जिल्हा माहिती
कार्यालय लातूर व श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित महात्मा
बसवेश्वर महाविद्यालय लातूर आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ
कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी
2020 रोजी बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.20 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख
अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवियीत्री सौ. शैलजा कारंडे, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक
श्री. यशवंत भंडारे यांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉक्टर सिद्राम डोंगरगे हे भूषवणार आहेत. तरी या कार्यक्रमास महाविद्यालयातील
विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बसवेश्वर महाविद्यालयाच्या
मराठी भाषा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर रत्नाकर बेडगे व जिल्हा माहिती अधिकारी सुनील
सोनटक्के यांनी केले आहे.
Comments
Post a Comment