जीडीसी अँड ए व सी एच एम
परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
लातूर, दि.17:- सहकार आयुक्त
व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचेकडून शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ
(जी.डी.सी. अँड ए बोर्ड ), परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र
(सी.एच.एम.) परीक्षा दिनांक 22,23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील प्रमाणे महत्वाच्या सुचना दिलेल्या
आहेत.
परीक्षार्थींना ऑनलाईन
पध्दतीने परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधीमध्ये www.mahasahakar.maharashtra.gov.in व www.sahakaryaukta.maharashtra.gov.in या संकेत
स्थळावर Link उपलब्ध् करुन देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी
दिनांक 15 फेब्रुवारी ते 16 मार्च 2020 असा आहे. ऑनलाईन अर्जभरण्यामध्ये काही
अडचणी उद्भवल्यास परीक्षार्थीनी हेल्पलाईन क्रमांक 022-40293000 (Option-4) येथे
संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment