सर्व सामान्य नागरीकांनी

लोकाभिमुख योजनेचा लाभ घ्यावा
                             -पालकमंत्री अमित देशमुख
*उजनीचे पाणी लातूरला येणार
*महानगरपालिकेने 100 कोटीचा अराखडा दाखल करावा
*शंभर टक्के मोफत अरोग्य सेवा देणार 

लातूर, दि.19:- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या   अन्न व नागरी पुरवठा विभागातंर्गत गंजगोलाई लातूर येथील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी त्यांनी केले. या कार्यक्रमास महापौर विक्रांत गोजमगुंडे , जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त   जी. श्रीकांत, तहसिलदार स्वप्नील पवार, माजि आमदार त्र्यंबक भिेसे ,नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की 26 जानेवारी 2020 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात 10 रुपयात शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून लातूर येथे दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी एस.टी. स्टँन्ड मध्ये व आज गंजगोलाई येथे शिवभोजन थाळी केंद्राचा शिवजयंती निमित्त शुभारंभ होत आहे. याचा मनस्वी आनंद होत असून या योजनेचा लाभ गरीब व गरजू लोकांनीच घ्यावा असे आवाहन केले.  शिवभोजन थाळी योजना ही गरीब व गरजू लोकांची उपजिवीका करण्यासाठी चालू केलेली आहे. या योजनेमुळे गरीब अबाल वृध महिला येथे 10 रुपयात जेवन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुढे बोलताना पालकमंत्री  देशमुख म्हणाले की, लातूर शहराला उजनीचे पाणी धनेगाव डॅम मार्गे लातूरला येणार आहे. प्रत्येकाच्या घरात पाणी कसे पोहचेल या संकल्पनेने वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल अशा संबंधिताना यावेळी सुचना दिल्या. लातूरच्या सार्वजनिक विकास करण्यासाठी महानगरपालिकेने 100 कोटीचा आराखडा सादर करावा अशी सुचना केली. विकास कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही याची ग्वाही दिली. लातूर शहरात प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात येणार आहे. महानगर पालिकेने शहरात नाविण्यपूर्ण बस स्टॉपची उभारणी करावी व  गंजगोलाईचे सुशोभिकरण करून शहरात सर्वात आकर्षक वास्तू म्हणून नावारुपाला येईल असे प्रयत्न करा. शहरात फेरीवाला धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे सूचना संबंधितांना दिल्या.
येथील शासकीय महाविद्यालयाचे नुकतेच विलासराव देशमुख वैद्यकीय  महाविद्यालय  असे नामकरण केले आहे. त्याचा शुभारंभ मे महिन्यात होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून इंशूरंन्स कव्हर देवून या वैद्यकीय संस्थानामार्फत शंभर टक्के मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकंत्री अमित देशमुख यांनी केली. 
 यावेळी महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी तथा महानगर पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्तावीक गंजगोलाई येथील शिवभोजन थाळी केंद्राचे चालक शेख हकीम अमीर हमजा यांनी केले. तर आभार आसीफ बागवान यांनी मानले. कार्यक्रमास गोलाई परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                  ****









Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत