शेतकऱ्याशी  साध्या सोप्या भाषेत
      संभाषण करुन आधार प्रमाणीकरण करावे
                                     -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे

        लातूर,दि.18:-महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी  जिल्हयातील शेतकऱ्यांशी साध्या व सोप्या भाषेत संभाषण करुन आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाबत प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी डॉ.गव्हाणे बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव ,तालुका सहाय्यक निबंधक श्रीकांत पवार उपस्थित होते.
        यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गव्हाणे म्हणाले की, शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-2019 लागू केलेली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी अल्प मुदत पिक कर्ज घेतलेल्या पिक कर्जाच्या पुर्नगठीत कर्जाचे रु. 2 लाख पर्यंतच्या कर्जास कर्ज मुक्ती देण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रशिक्षणातील केंद्र चालकांनी शेतकऱ्यांशी साध्या व सोप्या भाषेत संभाषण करुन आधार प्रमाणीकरण करावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहीजे, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी  दिले.
        प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केले. जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव यांनी प्रस्तावीक सादर करुन सदरील प्रशिक्षण हे तीन सत्रामध्ये चालणार असून आपले सरकार सेवा केंद्र चालकांना आधार प्रमाणीकरणा बाबतची माहिती विशद केली.
        यावेळी श्री.लटपटे यांनी पीपीटीचे सादरीकरण करुन आधार प्रमाणीकरण बाबत केंद्र चालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण  कार्यक्रमास जिल्हयातील तालुका सहनिबंधक अधिकारी, कर्मचारी तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे चालक मोठया संख्येने उपस्थित होते.

                                                ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु