Posts

Showing posts from March, 2023

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी 20 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  लातूर , दि. 2 9 , ( जिमाका): सन 2022-2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी कांदा विक्री केला आहे, त्या कृषि उत्पन्न बाजार समिती , खाजगी बाजार , थेट पणन अनुज्ञप्तीधारक , नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे 3 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे पणन संचालक यांनी केले आहे.   राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये , खाजगी बाजारामध्ये , थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये व जास्तीत जास्त 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन 2022-23 चा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कृषि उत्पन्न बाजार समिती , खाजगी बाजार , थेट पणन परवानाधारक , नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक , तालुका उप तथा सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था यांचे का

औद्योगिक भूखंड विकसित करण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत 30 जूनपर्यंत मुदतवाढ

  लातूर , दि. 2 9 , ( जिमाका): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रात वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे नकाशे मंजूर करून अथवा नकाशे मंजूर न करता बांधकाम पूर्ण केलेले आहे व भूखंडधारक उत्पादनात गेलेला आहे अथवा उत्पादनात जावून   सद्यस्थितीत उत्पादन बंद आहे, अशा वाटप केलेल्या सर्व प्रकारच्या भूखंडासाठी   इमारत पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्यासाठी   विशेष मुदतवाढ योजना लागू करण्यात आली आहे.   या योजनेचा लाभ घेण्यासाठी   पात्र भूखंडधारकांनी   30 जून 2023 पर्यंत महामंडळाच्या    www.midcindia.org   या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेतील सविस्तर तरतुदी महामंडळाच्या संकेतस्थळावर   23 जानेवारी 2023 च्या परिपत्रकात उपलब्ध आहे, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी कळविले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मिळणार प्रवेश

  ·        30 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन   लातूर , दि. 31 ( जिमाका):   सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद , जालना , बीड व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी   शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत परिपूर्ण प्रवेश अर्ज औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन औरंगाबाद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी केले आहे.   विद्यार्थी अनुसूचित जतातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्राची छायांकित प्रत व द्रारिद्रय रेषा अनुक्रमांक नमूद करावा. विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्याने   दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. तसेच अर्जासोबत   पालकांनी   संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड , दोन पासपोर्ट स

दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी ‘महाशरद’ उपक्रम

  ·        दिव्यांग बांधव, दानशूर व्यक्ती यांच्यात साधणार दुवा   लातूर , दि. 31 ( जिमाका):   दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 , अंतर्गत दिव्यांगत्वाचे 21 प्रकार  निश्चित करण्यात आले आहेत. या दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी ‘महाशरद’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत आहे. राज्यातील दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी आणि आवश्यक सहाय्यक उपकरणांची नोंदणी www.mahasharad.in या वेब पोर्टलवर करण्यासाठी ‘महाशरद’ अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे.   दिव्यांग बंधावानाचे जीवन सुलभ व्हावे व त्यांच्या जीवनात सुगम्यता प्राप्त व्हावी, यासाठी विविध सहाय्यक उपकरणाची आवश्यकता असते. त्यांना आवश्यक सहाय्यक उपकरणांची माहिती जाणून धेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकिय चाचणी करून घेणे गरजेचे असते. त्यानंतर सहाय्यक उपकरण निश्चित केले जाते. अशी उपकरणे गरजू सहाय्यक उपकरणे गरजू दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी समाजामधील दानशूर व्यक्ती , सामाजिक सेवाभावी संघटना इच्छुक असतात. अशा संस्था आणि दिव्यांग बांधव यांच्यातील दुवा साधण्यासाठी ‘महाशरद’ उपक्रम मह

विशेष लेख : लातूर जिल्ह्यात 300 हेक्टरवर होणार सेंद्रिय शेती

Image
परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) ·        सेंद्रिय शेतीसाठी 15 शेतकरी गटांची स्थापना ·        तीन वर्षात मिळणार प्रत्येकी दहा लाखांचे अर्थसहाय्य ·        जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी होणार मदत   जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात चाकूर तालुक्यात पंधरा शेतकरी गटांचे क्लस्टर तयार करणात आले असून नळेगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, नळेगाव या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार आहे. प्रत्येक गटाला तीन वर्षात एकूण दहा लाखांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.   शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमणात वापर होत आहे. पाण्याचा जास्त वापर, जमिनीची होणारी धूप, एकच पीक वारंवार घेणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर पुरेशा प्रमाणात होत नसल्याने जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होत आहेत, पिकांचे उत्पादन कमी होवू लागले आहे. उत्पादित शेतमालाची प्रतही खाला

पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा - सहायक आयुक्त कौशल्य विकास यांचे आवाहन

                                             पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा - सहायक आयुक्त कौशल्य विकास यांचे आवाहन   लातूर,दि.29,(जिमाका):-  भारतातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 सुरु झाला असून 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएसडीसी)  यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. 9 एप्रिलपर्यंत यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. त्याचे स्क्रिनिंग 10 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान होणार असून दिनांक 15 मे 2023 पासून मुलाखतीला सुरुवात होणार आहे. त्याचा अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, लातूर यांनी केले आहे. यामध्ये ज्यांच्याकडे तांत्रिक / व्यावसायिक उत्कृष्ट कौशल्य इत्यादीचे कुशल ज्ञान आहे अशा आयटीआय / अभियांत्रिकी वैद्यकीय / नर्सिंग/कृषी / पशुविज्ञान / फार्मसी इत्यादी पदवी / पदविकाधारक व्यावसायिक पात्रता विशिष्ट क्षेत्रात काम केले असल्यास त्याचा अनुभव असणारे याशिवा

लातूर जिल्ह्यातील 2 हजार 175 शेतकऱ्यांना मिळाले 10 कोटी रुपयांचे अनुदान

Image
·        कृषि यांत्रिकीकरण योजनेतून मिळाला लाभ ·        विविध अवजारे, यंत्रे खरेदीसाठी 50 टक्केपर्यंत अनुदान ·       महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक लातूर , दि. 2 9 ( जिमाका): वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीन धारण क्षमता, बैलाची कमी झालेली संख्या , शेती कामासाठी मजुरांची घटलेली संख्या व वाढते मजुरीचे दर , पिकांमध्ये , फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमधून 2022-23 मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार 175 शेतकऱ्यांना विविध अवजारे व यंत्रांसाठी 10 कोटी 1 लाख 19 हजार 882 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. केंद्र शासनाने वेळोवेळी अद्ययावत केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य,   राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- गळीत धान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्ये, राष्ट्रीय कृषि विकास योजना- कृषि यांत्रिकीकरण, राज्य पुरस्क

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 30 मार्चपासून ‘मिशन थायरॉईड’ सुरु होणार

                                               विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 30 मार्चपासून ‘मिशन थायरॉईड’ सुरु होणार   लातूर , दि. 2 9 ,( जिमाका):-     मिशन थायरॉईड हे अभियान दिनांक 30 मार्च, 2023 पासून हाती घेण्यात आलेले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या वरतीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात थायरॉईड निदान आणि उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी दिली. आजमितीला 1 लाख स्त्रियांमध्ये अंदाजे 2000 स्त्रियांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील ब-याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदान देखील होत नाही अशा सर्व स्त्रिया तसेच पुरुष व बालकांना देखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त स्त्री व पुरुषांना आळस, स्थूलपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा

लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील कुस्तीपटू बनला ‘कुमार महाराष्ट्र केसरी’

Image
                                              लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील कुस्तीपटू बनला ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ ·         कुस्तीपटू सोनबा लवटे याला मानाची चांदीची गदा लातूर ,  दि.  2 8 , ( जिमाका):   जिल्हा क्रीडा संकुल येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये कुस्तीचा सराव करणारा सोनबा लवटे याने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये 110 किलो वजन गटात ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविला. त्यामुळे त्याला मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कुस्तीपटू सोनबा लवटे याला जिल्हा क्रीडा संकुलातील सुरेंद्र कराड ,  चेतन जावळे ,  संतोष इगवे यांनी प्रशिक्षण दिले. ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे 26 मार्च रोजी इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात सोनबा लवटे याने पै. आर्यन पाटील याला 01-08 या गुण फरकाने पराभूत करून विजय मिळवला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते सन्मान ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर सोनबा लवटे याचे लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यांनी अभिनंदन केले. तसेच भविष्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी शु