विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत प्रत्येक बुधवारी स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान

                                    विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत

प्रत्येक बुधवारी स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान

लातूर, दि. 06 (जिमाका) : राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे 8 मार्च 2023 पासून दर बुधवारी स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभिया राबविले जाणार आहे. दर बुधवारी सकळी अकरा ते दुपारी एक या वेळेत शल्य चिकित्सा शास्त्र येथील बाह्यरुग्ण विभागातील ओपीडी क्रमांक चारमध्ये हे तपासणी व उपचार करण्यात येईल.

अभियानाचे राज्यस्तरीय उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.  वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सचिव डॉ. अश्विनी जोशीआयुक्त राजीव निवतकरसंचालकडॉ. दिलीप म्हैसेकरश्री. नवाले यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु