‘माविम’मार्फत 24 मार्चपासून ‘नवतेजस्विनी महोत्सव’


·       महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन, विक्री

  लातूर, दि. 23 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालयामार्फत 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीत ‘नवतेजस्विनी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत औसा रोडवरील दत्त मंदिराजवळील कल्पतरू मंगल कार्यालयात महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. 24 मार्च रोजी दुपारी बारा वाजता या महोत्सवाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

 तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये बचतगटातील महिलांचा सन्मान समारंभ, शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन, महिलांचे आरोग्य व सकस आहार याविषयी, मार्गदर्शन, महिला बचतगटांचे स्टॉल, विविध खाद्य पदार्थांची मेजवानी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

 या प्रदर्शनात बचतगटातील महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले, शुद्ध हळद पावडरविविध प्रकारचे पापड,  लोणचेशेवयासांडगेकुरुडी, लाल व काळे तिखट, हडोळातीचे प्रसिद्ध काळे तिखट, घाण्याचे करडी व सूर्यफूल तेल, खोबरे तेल, खवा, पेढा, बासुंदी, पनीर व तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ, कडक ज्वारी  व बाजरीची भाकरीसोलापुरी शेंगदाणा चटणीलाडूचिवडालेमण सॉसविविध प्रकारच्या डाळी, जात्यावर तयार केलेल्या डाळी, गहूशुगर पेशंटकरिता उपयुक्त पिवळी ज्वारी, जवसाची चटणी, तीळ, दुरडी, झाडू, खराटा, फडा, रुखवताचे साहित्य, लोकरीचे पडदे, मायक्रॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरीसाड्या, स्कार्प, पडदे, विणकाम, कपड्याच्या बॅग, टिफिन बॅग, सौदर्य प्रसाधणे, परफ्यूम तसेच विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत.

 जिल्ह्यातील व लातूर शहरातील नागरीकांनी या प्रदर्शनास भेट देवून ग्रामीण महिलांनी तयार व उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु