दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी ‘महाशरद’ उपक्रम

 ·       दिव्यांग बांधव, दानशूर व्यक्ती यांच्यात साधणार दुवा

 लातूर, दि. 31 (जिमाका): दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016, अंतर्गत दिव्यांगत्वाचे 21 प्रकार  निश्चित करण्यात आले आहेत. या दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी ‘महाशरद’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत आहे. राज्यातील दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारी वैद्यकीय चाचणी आणि आवश्यक सहाय्यक उपकरणांची नोंदणी www.mahasharad.in या वेब पोर्टलवर करण्यासाठी ‘महाशरद’ अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे.

 दिव्यांग बंधावानाचे जीवन सुलभ व्हावे व त्यांच्या जीवनात सुगम्यता प्राप्त व्हावी, यासाठी विविध सहाय्यक उपकरणाची आवश्यकता असते. त्यांना आवश्यक सहाय्यक उपकरणांची माहिती जाणून धेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकिय चाचणी करून घेणे गरजेचे असते. त्यानंतर सहाय्यक उपकरण निश्चित केले जाते. अशी उपकरणे गरजू सहाय्यक उपकरणे गरजू दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी समाजामधील दानशूर व्यक्ती, सामाजिक सेवाभावी संघटना इच्छुक असतात. अशा संस्था आणि दिव्यांग बांधव यांच्यातील दुवा साधण्यासाठी ‘महाशरद’ उपक्रम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त्‍ व विकास महामंडळाने हाती घेतला आहे. या अंतर्गत www.mahasharad.in या वेब पोर्टलवर दिव्यांग बांधवांची नोंदणी केली जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून  दिलेले व्यासपीठ हे विश्वास आधारित  (ट्रस्ट बेस्ड) असून नोंदणी  करणाऱ्या दिव्यांग बांधवाला सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था या व्यासपीठाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधू शकतील.

या पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी  संघटनांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या ‘महाशरद’ या उपक्रमासाठी मिळणाऱ्या सर्व देणग्या कलम 80 (जी) अंतर्गत आयकर सवलतीसाठी पात्र आहेत, असे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु