समाज कल्याण विभागाच्या योजनांची ग्रामीण भागात होणार जनजागृती

 

समाज कल्याण विभागाच्या योजनांची

ग्रामीण भागात होणार जनजागृती

·        एलईडी व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार माहितीपट, चित्रफिती

·        अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालायचा उपक्रम

·        जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ

लातूर, दि. 25 (जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती जिह्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत अनुसूचित जाती उपयोजना 2022-23 अंतर्गत एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाज कल्याण विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट, चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुसिंग, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा नागरी प्रशासन अधिकारी श्री. कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यावेळी उपस्थित होते. या प्रसिद्धी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 180 गावांमध्ये तीन एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येईल. प्रत्येक एलईडी व्हॅनद्वारे दररोज किमान तीन गावांमध्ये जावून एलईडी स्क्रीनवर समाज कल्याण विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट आणि विविध योजनांच्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व व उपसाधनांचा पुरवठा करणे यासारख्या विविध योजनांची माहिती यामाध्यमातून दिली जाणार आहे.


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु