लातूर शहर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील 307 शाळांमध्ये पालक मेळाव्याद्वारे मतदार जागृती ! · लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपक्रम लातूर , दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 235- लातूर शहर मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 307 शाळांमध्ये 26 मार्च 2024 रोजी पालक मेळावे आयोजित करण्यात आले होते. मतदार जागृतीसाठी पालक मेळावे या नाविण्यपूर्ण उपक्रमा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत पालकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली. यावेळी पालकांना मतदान करण्याबाबतचे संकल्पपत्र देवून मतदानाचे महत्व सांगण्या त आले. तसेच उपस्थित पालकांना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या पॉवर ...
Posts
Showing posts from March, 2024
अवैध पाणी उपसा रोखण्याची कार्यवाही गतिमान करावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
- Get link
- X
- Other Apps
अवैध पाणी उपसा रोखण्याची कार्यवाही गतिमान करावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा • अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथके स्थापन लातूर, दि. 26 : जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थिती होती. जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांची पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांनी ...
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती
- Get link
- X
- Other Apps
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती लातूर , दि. 26 : जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मार्च २०२४ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित जनजगागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे एच.व्ही. यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून करण्यात आले. रॅलीसाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.प्रविण ढगे, डॉ.विद्या गुरुडे, डॉ.पाठक एस.जी., जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. एस.एन.तांबारे, डॉ.मोनिका पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील, डॉ.अनंत कलमे, डॉ .हर्षवर्धन राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपनर डी.के., जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते. या रॅलीमध्ये शहरातील विविध भागातून जनजागृती करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक, बस स्थानक, गंज गोलाईम...
पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडाराचे व्यवहार 27 ते 31 मार्च दरम्यान राहणार बंद
- Get link
- X
- Other Apps
पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडाराचे व्यवहार 27 ते 31 मार्च दरम्यान राहणार बंद लातूर, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या विभागीय भंडारामधील पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने 27 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत मंडळाची गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील आवक-जावक, विक्री इत्यादी सर्व व्यवहार बंदर राहणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.
लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ
- Get link
- X
- Other Apps
लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ लातूर , दि. 2 3 : होळी अथवा रंगपंचमीला वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीमध्ये उघड्या ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लातूर महानगरपालिका क्षेत्रातील वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अनुज्ञप्ती प्रकारातील आस्थापना सुरु ठेवण्यास 24 मार्च 2024 रोजी रात्री 10.30 ते 12 वाजेपर्यंतच्या वाढीव वेळे देण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्गमित केले आहेत.
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत चेक पोस्ट, भरारी पथकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर
- Get link
- X
- Other Apps
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत चेक पोस्ट, भरारी पथकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर · चेक पोस्ट, भरारी पथकांच्या प्रमुखांची आढावा बैठक लातूर , दि. 20 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यामध्ये विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्ट आणि भरारी पथकांची जबाबदारी महत्वाची असल्याचे जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले. चेक पोस्ट, भरारी पथक प्रमुखांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. सागर बोलत होते. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी तथा लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपमुख्य कार्यकारी अ...
भरारी पथके, चेक पोस्टच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
- Get link
- X
- Other Apps
भरारी पथके, चेक पोस्टच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · आदर्श आचारसंहिता, सी-व्हिजीलबाबत आढावा · सी-व्हिजीलद्वारे प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेवून निपटारा करा लातूर , दि. 20 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके, चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. याकरिता नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज येथे केल्या. आदर्श आचारसंहिता कक्ष आणि सी व्हिजील ॲप, मतदान केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था यासह निवडणूक आयोगामार्फत कार्यान्वित विविध ॲपच्या अनुषंगाने सुरु असलेल्या...
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप
- Get link
- X
- Other Apps
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप लातूर, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळे...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीमाभागात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा संयुक्त आढावा
- Get link
- X
- Other Apps
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीमाभागात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा संयुक्त आढावा · लातूर आणि बिदर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आंतरराज्य बैठक · निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही होणार लातूर , दि. 20 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबतच लातूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा प्रशासनासोबत संयुक्तपणे कार्यवाही करून सीमाभागात निवडणूक काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आज दोन्ही जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक...
निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म,भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक कालावधीमध्ये जात , धर्म , भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध लातूर , दि. 19 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात कसल्याही प्रकारचे जात , भार्षा , धार्मिक शिबिरांचे , मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत. लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लागू केलेले हे आदेश 10 मे 2024 पर्यंत लागू राहणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. *****
आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई
- Get link
- X
- Other Apps
आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई लातूर, दि. 1 9 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण , मोर्चा , निदर्शने , घेराव , आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 10 मे , 2024 पर्यंत अंमलात राहतील. प्रत्येक व्यक्तीला हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फ...
भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज वितरण, पीएम-सुरज पोर्टलचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्यप्रणालीव्दारे लाभार्थ्यांशी साधला संवाद
- Get link
- X
- Other Apps
भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज वितरण, पीएम-सुरज पोर्टलचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्यप्रणालीव्दारे लाभार्थ्यांशी साधला संवाद * लातूर, दि.14 (जिमाका):- * प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी देशातील विविध राज्यातील 526 जिल्ह्यामधून 1 लाख लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात आले. तसेच पी.पी.ई. किट, आयुष्यमान भारत हेल्थकार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लाभार्थ्यांशी दुरदृश्यप्रणालीव्दारे संवाद साधला. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये लातूर येथील 50 लाभार्थ्यांना पी.पी.ई. किट चे वितरण करण्यात आले, 8 लाभार्थींना आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच संत रोहिदास चर्मकार व चर्मौद्योग विकास महामंडळाच्या एकुण 14 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र प्रदा...
जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर) जिल्ह्याबाहेर वाहतूकीस मनाई
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर) जिल्ह्याबाहेर वाहतूकीस मनाई * लातूर, दि.14 (जिमाका):- * लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चाऱ्यांसाठी टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबबतचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी निर्गमित केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन लातूर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्याच्या कालावधीकरिता लागू राहील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले. ****
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार § राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला § 32 प्राथमिक आरोग्य केंद्राना 17 लाख 50 हजार रुपये पुरस्कार निधी § 111 आरोग्य वर्धिनी केंद्राना 28 लाख 85 हजार रुपये पुरस्कार निधी लातूर, दि.14 (जिमाका):- रुग् णालयातील स् वच् छता व टापटीप, जैव वैद्यकीय कचरा व् यवस् थापन, संसर्ग नियंत्रणासाठी केलेले प्रयत् न, इतर समर्थन सेवा, स् वच् छता प्रचार व प्रशिक्षण सेवा आदी विविध निकषांच् या आधारे कायाकल् प पुरस् कारासाठी आरोग् य संस् थाची निवड करण् यात येते. या निकषानुसार सन 2022-2023 कायाकल् प पुरस् कार राज् यस् तरावरुन घोषित झाले. लातूर जिल्ह्यातील कासार बालकुंदा (ता. निलंगा) प्राथमिक आरोग् य केंद्र या आरोग् य संस् थेस 2 लाख रुपयांचा कायाकल् प प्रथम पुरस् कार जाहीर झाला आहे. तसेच राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हा आरोग्य स्तरावरील या गावाना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रत्येकी 50 हजार रुपये जिल् हा आरोग् ...