जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर) जिल्ह्याबाहेर वाहतूकीस मनाई

 

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर)

जिल्ह्याबाहेर वाहतूकीस मनाई

 

*लातूर, दि.14 (जिमाका):-*  लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चाऱ्यांसाठी टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबबतचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी निर्गमित केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन लातूर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्याच्या कालावधीकरिता लागू राहील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु