आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई

 आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई


लातूर, दि. 1
9 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.

 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषणमोर्चानिदर्शनेघेरावआंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 10 मे2024 पर्यंत अंमलात राहतील. प्रत्येक व्यक्तीला हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावीअसेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु