लातूर जिल्ह्यात 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

 लातूर जिल्ह्यात 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम


* 25 लाख 2 हजार बालकांचे होणार लसीकरण 

* जिल्ह्यात 1 हजार 918 बूथ, सुमारे 5 कर्मचारी नियुक्त 


लातूर, दि. 1 (जिमाका):  पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी संपूर्ण देशात राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत रविवार, 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 25 लाख 2 हजार 258 बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. ग्रामीण, शहरी व मनपा कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 


पल्स पोलिओ मोहीम झाल्यावर एक दिवसाचा खंड देवून लगेच आयपीपीआय मोहीम ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नियोजित कृतीनियोजनानुसार कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी भेटी देवून पोलिओ मोहिमेच्या दिवशी वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे. स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येतील काही बालके पोलिओ लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही मोहीम यशस्वीरित्या राबवून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मजूर वसाहतीत, वीट भट्टी, साखर कारखाने, ऊस तोडणी कामगार वसाहती, फिरस्ते कुटुंब  ज्या भागात वास्तव्यास आहेत, अशा ठिकाणांचा शोध घेवून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी मोहिमेच्या एक दिवस अगोदर मोबाईल टीमद्वारे लसीकरण केले जाणार आहे.


जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.


जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 100 टक्के यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेने आपल्या 0 ते 5 वर्षाच्या बालकांना पोलिओ लस पाजून मोहिम 100 टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.


पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन...


अपेक्षित लाभार्थी- एकूण 25 लाख 2 हजार 258.

ग्रामीण भागात-19 लाख 1 हजार 511, 

शहरी भागात- 15 हजार 747, 

लातूर मनपा कार्यक्षेत्र -45 हजार


एकूण बूथ - 1 हजार 918

ग्रामीण भागात -  1 हजार 643, 

शहरी भागासाठी - 75, 

लातूर मनपा अंतर्गत - 200


बुथवरील कर्मचारी-5 हजार 14


 ग्रामीण-  4 हजार 194, 

शहरी- 220,

लातूर मनपा- 600.


पर्यवेक्षक-386

 ग्रामीण- 329 , शहरी-17, लातूर मनपा- 40


मोबाईल टीम- 106

ग्रामीण भागासाठी- 99, 

शहरी भागासाठी- 04,

लातूर मनपा अंतर्गत-03


ट्रांझीट टीम-106

 ग्रामीण भागासाठी- 75, 

 शहरी भागासाठी- 10, 

लातूर मनपा अंतर्गत- 21 


**

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा