राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार
§ राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला
§ 32 प्राथमिक आरोग्य केंद्राना 17 लाख 50 हजार रुपये पुरस्कार निधी
लातूर, दि.14 (जिमाका):- रुग्णालयातील स्वच्छता व टापटीप, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न, इतर समर्थन सेवा, स्वच्छता प्रचार व प्रशिक्षण सेवा आदी विविध निकषांच्या आधारे कायाकल्प पुरस्कारासाठी आरोग्य संस्थाची निवड करण्यात येते. या निकषानुसार सन 2022-2023 कायाकल्प पुरस्कार राज्यस्तरावरुन घोषित झाले. लातूर जिल्ह्यातील कासार बालकुंदा (ता. निलंगा) प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थेस 2 लाख रुपयांचा कायाकल्प प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी लातूर जिल्ह्याला मिळाला आहे.
जिल्हा आरोग्य स्तरावरील या गावाना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रत्येकी 50 हजार रुपये
जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील निटूर, हंडरगुळी, हाडोळती, हलगरा, शिरुर ताजबंद, लामजना, वांजरवाडा, देवर्जन, हेर, गुडसुर, अतनुर, जवळा बु. नळेगांव, नळगीर, अंधोरी, पानचिंचाली, चिंचोली ब., जवळगा पोमादेवी, बोरी, निवळी, तांदुळजा, गंगापूर, चापोली, उजनी, खरोळा, कारेपूर, भातांगळी, चिकुर्डा मातोळा, भादा, बिटंरगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची कायाकल्प प्रोत्साहनपर पुरस्काराकरीता निवड राज्यस्तरावरुन करण्यात येऊन या संस्थाना प्रत्येकी रुपये 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील मूल्यांकनकर्तामार्फत करण्यात आली होती.
लातूर जिल्ह्यातील 108 आरोग्य वर्धिनी केंद्रास प्रोत्साहनपर रुपये 25 हजार रुपये पुरस्कार
जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरुन किनी यल्लादेवी आरोग्य वर्धिनी केंद्राला एक लाख रुपयांच्या जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार , तर काजळ हिप्परगा, आरोग्य वर्धिनी केंद्र या संस्थेस जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार 50 हजार रुपये तसेच घोणशी आरोग्य वर्धिनी केंद्र या संस्थेस जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार रुपये 25 हजार जाहीर झाला आहे. तसेच लातूर जिल्हयातील 108 आरोग्य वर्धिनी केंद्रास प्रोत्साहनपर रुपये 25 हजार पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील लातूर स्त्री रुग्णालय, उदगीर सामान्य रुग्णालय, निलंगा उपजिल्हा रुग्णालय, मुरुड ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर ग्रामीण रुग्णालय, किल्लारी ग्रामीण रुग्णालय, चाकूर ग्रामीण रुग्णालय, रेणापूर ग्रामीण रुग्णालय, बाभळंगाव ग्रामीण रुग्णालय, देवणी ग्रामीण रुग्णालय या आरोग्य संस्थाची कायाकल्प प्रोत्साहनपर पुरस्काराकरीता राज्यस्तरावरुन निवड झालेली आहे. या संस्थाना प्रत्येकी एक लाख रुपये जाहीर झाला आहे.
कायाकल्प पुरस्कार सन 2022-2023 अंतर्गत राज्यात सर्वाधिक पुरस्कार निधी रुपये 58 लाख 35 हजार रुपये लातूर जिल्ह्याला जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील 32 प्राथमिक आरोग्य केंद्राना रुपये 17 लाख 35 हजार रुपये पुरस्कार निधी, 111 आरोग्य वर्धिनी केंद्राना 28 लाख 85 हजार रुपये पुरस्कार निधी व जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत रुग्णालयांना 12 लाख रुपये पुरस्कार निधी जाहीर झालेला आहे.
कायाकल्प पुरस्काराकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ. बोडके एन. डी., सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पंडगे ए.सी., अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बरुर बी. एस., ता.आ.अ. उदगीर डॉ. कापसे पी.एस., जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. रेड्डी पी.ए. यांनी कायाकल्प अभियानाच्या अनुषंगाने जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment