लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 984 दावे निकाली !

 

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 984 दावे निकाली !

लातूर, दि. 5 (जिमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने लातूर जिल्हा सत्र न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे 3 मार्च, 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 984 दावे निकाली काढण्यात आले.

मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, 138 एन.आय.ॲक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, लवाद, हिंदू विवाह कायद्यातंर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये सर्व बँकाचे वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुलीबाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विमा कंपन्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शोरन्स कंपनीकडील एका 45 लाख रुपयामध्ये तडजोड करण्यात आली. या प्रकरणात अर्जदाराचे वकील ॲड. ए. एस. बावणे आणि ॲड. जी. के. सुरवसे व प्रतिवादीचे वकील ॲड. एस.जी. डोईजोडे यांनी काम पाहिले. या पॅनलवर पॅनल लातूर प्रमुख जिल्हा न्यायाधीश-3 पंच म्हणून ॲड. एस. डी. लखादिवे यांनी काम पाहिले. तसेच इतर इन्शोरन्स कंपन्यांचे वकील यांनी राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच 2023 मध्ये कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेला दावा तडजोडीअंती निकाली काढण्यात आला. या  प्रकरणात ॲड. बी. पी. शिवलकर यांनी काम पाहिले . या पॅनलवर पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश -2 एस. टी त्रिपाठी आणि पॅनल पंच ॲड.  कल्पना एम. भुरे यांनी काम पाहिले.

तसेच या लोक अदालतीमध्ये पॅनलवर ॲड.  कल्पना एम. भुरे, ॲड.  एस. डी. लखादिवे, ॲड.  संध्या बी. जोशी, ॲड. अझरुद्दीन मनियार, ॲड.  शिवकुमार जी. क्षिरसागर, ॲड.  सुनैना (ठाकूर) बायस, ॲड.  राधा जी. वाघमारे, ॲड.  एस. व्ही. सलगरे यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले. तसेच लोकअदालत यशस्वी करण्यासाठी पक्षकार, विधीज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही.व्ही. पाटील, सर्व न्यायीक अधिकारी, जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव एस. डी. अवसेकर, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्य ॲड. अण्णाराव जी. पाटील, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष ॲड. महेश बामनकर, उपाध्यक्ष गजानन यु. चाकुरकर, सचिव ॲड.  प्रदिपसिंह टी. गंगणे, महिला सचिव हर्षला जी. जीशी व इतर पदाधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील मंडळ लातूर व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु