निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म,भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध
निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म,भाषावार शिबिरांच्या आयोजनावर निर्बंध
लातूर, दि. 19 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात कसल्याही प्रकारचे जात, भार्षा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.
लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लागू केलेले हे आदेश 10 मे 2024 पर्यंत लागू राहणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment