महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या क्रीडा ज्योत रॅलीचे शुक्रवारी आयोजन

 

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या

क्रीडा ज्योत रॅलीचे शुक्रवारी आयोजन

*लातूर, दि. 29 (जिमाका):* क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहेत. यानिमीत्त राज्यात स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी 30 डिसेंबर रोजी क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथेही 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा ज्योत रॅलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सुरुवात होणार असून जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप होईल. तरी जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कार्थी, खेळाडू, एकविध क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमी नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास