Posts

Showing posts from May, 2026

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप'द्वारे डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप'द्वारे डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २९ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ७ मे, २०२६ च्या शासन निर्णयानुसार, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता हयात प्रमाणपत्र (डिजीटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले डिजीटल हयात प्रमाणपत्र विहित पद्धतीने सादर करावे, असे आवाहन लातूर तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. मोबाईल किंवा सेतू केंद्रावरून सुविधा उपलब्ध लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करणे सोपे जावे यासाठी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप' विकसित करण्यात आले आहे. लाभार्थी हे प्रमाणपत्र स्वतःच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून या ॲपचा वापर करून सादर करू शकतात. तसेच ज्यांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ...

जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लातूर, दि. २९ : महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० आणि विविध शासन निर्णयामधील तरतुदींनुसार पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात लातूर, औसा-रेणापूर, निलंगा, अहमदपूर आणि उदगीर अशा पाच उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येते. नागरिकांनी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच जात प्रमाणपत्र ऑनलाईन पोर्टलवरून काढताना काही अडचणी किंवा समस्या येत असल्यास, अथवा कोणतीही फसवणूक होत असल्यास नागरिकांनी त्याबाबतची तक्रार प्रशासनाच्या ०२३८२-२२०२०० या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 20 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 20 मे, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 3 जून, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अ...

लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक

लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक लातूर, दि. २७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांचे ६ तर मुलींचे ४ वसतिगृह; औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १; अहमदपूर येथे मुलांचे २ व मुलींचे २; तर रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यात इयत्ता आठवी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर व्यावसायिक पदवी, पदविका (डिप्लोमा) प्रथम वर्षात आणि पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश अर्ज ...

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आयोजित करण्यात आली असून, या परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर शहरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये शहरातील ९ परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपासून ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी परीक्षार्थीं व्यतिरिक्त ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीं...

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, ३० मे (जिमाका): लातूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आगामी सोमवार, १ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती लातूरचे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश पवार यांनी दिली आहे. ****

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद लातूर, दि. २६ : काही दिनदर्शिकांमध्ये बुधवार, २७ मे २०२६ रोजी बकरी ईदची सुट्टी दर्शवण्यात आली असली, तरी महाराष्ट्र शासनाने बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, २८ मे २०२६ रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, २८ मे २०२६ रोजी बंद राहील. शासकीय रुग्णालयांचा बाह्यरुग्ण विभाग बुधवार, २७ मे २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील, तर गुरुवार, २८ मे रोजी सुट्टी असल्याकारणाने पूर्णपणे बंद राहणार आहे. शासकीय रुग्णालयातील ओपीडी विभाग गुरुवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी कळविले आहे. ****

लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात

लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात महालेखाकार नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय लातूरचा संयुक्त उपक्रम लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महालेखाकार आणि लातूर जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीडीसी हॉलमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर महालेखापाल कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी मैथिली जगन्नाथन, सहायक लेखाधिकारी चेतनकुमार गुप्ता आणि लेखापाल समिर मीना यांनी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना निवृत्ती वेतन प्रकरणे (पेंशन पेपर्स) अत्यंत अचूकपणे कसे सादर करावेत, याबाबत सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांचे जागेवरच निराकरण केले. या बैठकीला लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिल्हा कोषागार अधिक...

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण लातूर, दि. २३ : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जळकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील २ गावे आणि १ वाडी अशा एकूण ३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्यामुळे सुमारे ३,३१० नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी शासनाचे २ टँकर कार्यरत असून त्यांच्या दररोज एकूण ४ फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रामुख्याने जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा - वाघमारी तांडा आणि गव्हाण येथे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. टँकर व्यतिरिक्त जिल्ह्या...

युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर, दि. २३ (जिमाका): राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सृजनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुक्ष्म व लघु उपक्रमांना विशेष चालना दिली जात आहे. या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर अर्जदाराच्या जात प्रवर्ग आणि उद्योग क्षेत्रानुसार १५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते, ज्यामध्ये सेवा उद्योग, उत्पादन उद्योग तसेच कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, एकाच नाममुद्रेवर (ब्रँड) आधारित संघटित साखळी विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, कुक्कुट ...

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 11 जून रोजी प्रस्तावित; नव उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 11 जून रोजी प्रस्तावित; नव उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. 23 (जिमाका): उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी 11 जून २०२6 रोजी लातूर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी नव उद्योजकांनी लातूर जिल्हा उद्योग केंद्र लातूर येथे आपल्या नव उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले आहे. या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणे, नवउद्योजकांना आकर्षित करणे आणि गुंतवणूकदार-व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लातूर जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणे हा आहे. या परिषदेमध्ये नव उद्योजकांसोबत सामंजस्य करार होऊन त्यांना एमआययू वितरित केले जाणार आहेत. *****

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू • चारा बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान • २८ मे पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका): हवामान विभागाने यंदाच्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रामुख्याने प्रभावामुळे पावसाचे असमान वितरण, कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली असून या पार्श्वभूमीवर भविष्यात पशुखाद्य व हिरव्या चाऱ्याची गंभीर टंचाई निर्माण होवू शकते. ही संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील पशुपालकांनी आतापासूनच नियोजन करुन चारा उत्पादन वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत “वैरण विकास योजना – चारा उत्पादक कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पात्र पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर संकरीत मका व ज्वारी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करावे आ...

२२ मे रोजीचे लातूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित; 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरते बंद राहणार

२२ मे रोजीचे लातूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित; 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरते बंद राहणार लातूर, दि. २० : युआयडी पोर्टलवरील सूचनेनुसार एनएसजी क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे २१ ते २४ मे २०२६ या कालावधीत 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. या तांत्रिक कारणास्तव, शुक्रवारी म्हणजेच २२ मे २०२६ रोजी लातूर शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये, यासाठी त्या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित करण्यात आले आहे. पोर्टल बंद असल्याने २२ मे रोजी दिव्यांग बांधवांनी तपासणी शिबीरासाठी येऊ नये, असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. *****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत लातूर, दि. २० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांना या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० मे २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही जागांअभावी किंवा अन्य कारणांमुळे प्रवेश मिळवू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक असलेली रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या कालावधीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर नवीन किंवा नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचे अर्ज...

पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा लातूर, दि. २० : जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनसह पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण, पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी मोहन अभंगे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास प्राधिकरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना गती द्यावी. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. पाणी पुरवठा योजनांचे जलस्रोत कायमस्वरूपी कार्यरत राहण्यासाठी या योजनांच्या जलस्रोतांचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास...

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी

  उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर ; १८ जून रोजी मतदान , तर २२ जूनला होणार मतमोजणी   लातूर, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ पर्यंत असून उमेदवारी अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी केली जाईल , तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.   यानंतर गुरुवार , १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवार , २२ जून २०२६ रोजी मतमोजणी केली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे...

रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे

  औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद ;   रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे ' अन्न व औषध प्रशासन ' विभागाचे आवाहन   लातूर , दि. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आगामी बुधवार , २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून , या बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्णांची व नागरिकांची औषधांविना गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे . लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये , अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे . मात्र , खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णांना नियमित औषधोपचारांची आवश्यकता आहे , अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बंदच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे .   या बंदच्या कालावधीत जर एखाद्या गरजू रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाह...

खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधुमित्र पुरस्कार लातूरच्या ज्ञानेश्वर मलीले यांना जाहीर

  छत्रपती संभाजीनगर येथे   20   मे   2026   रोजी होणार पुरस्कारांचे वितरण लातूर ,   दि.   18 :   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे   2026   सालचे   ‘ मधुमित्र ’   व   ‘ मधु-सखी ’   पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले ,   छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल ,   बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहिर झाले आहे त.   याशिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे ,   पुण्याचे संजय मारणे ,   कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष सन्मानासाठी निवड केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी दिली.   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या   ‘ मधाचे गाव ’   तसेच जागतिक मधमाशी दिनाच्या   निमित्ताने योजलेला   ‘ मधु मित्र   –   मधु सखी पुरस्कार ’   तसेच मंडळाच्या विविध कार्याविषयीची सभापती साठे यांनी द...

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे आवाहन

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे आवाहन लातूर, दि. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आगामी बुधवार, २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून, या बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्णांची व नागरिकांची औषधांविना गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे. लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये, अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णांना नियमित औषधोपचारांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बंदच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे. या बंदच्या कालावधीत जर एखाद्या गरजू रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाही किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासली, तर नागर...

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ‘अमृत’ संस्थेतर्फे मोफत ड्रोन प्रशिक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ‘अमृत’ संस्थेतर्फे मोफत ड्रोन प्रशिक्षण · प्रशिक्षणानंतर अधिकृत 'ड्रोन पायलट परवाना'ही मिळणार लातूर, दि. १८ (जिमाका): आजच्या आधुनिक काळात शेती, फोटोग्राफी, सर्वेक्षण, सुरक्षा यांसह अनेक तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सामान्यतः ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत 'ड्रोन पायलट परवाना' देखील दिला जाणार आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. याच अंतर्गत संस्थेने ‘अमृत ड्रोन मिशन’ हा उपक्रम हाती घेतला असून, त्याद्वारे हे ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण सुरू करण्यात आल...

२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दोन दिवसांत निकाली

Image
२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दोन दिवसांत निकाली लातूर, दि. १५ : एका तलाठ्याच्या चुकीमुळे सातबारा उताऱ्यावर २६ वर्षांपूर्वी झालेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाला लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संवेदनशीलतेमुळे अखेर न्याय मिळाला आहे. वयोवृद्ध शेतकरी प्रभाकर प्रयाग यांचा काही वर्षांपासून रेंगाळलेला सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ दोन दिवसांत मार्गी लावला. लातूर येथील रहिवासी प्रभाकर विनायकराव प्रयाग (वय ८५) यांची खोपेगाव शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. २६ वर्षांपूर्वी वासनगाव तलावाच्या कालव्यासाठी या परिसरातील जमीन संपादित करण्यात आली होती. हा कालवा वास्तविक प्रभाकर प्रयाग यांच्या भावाच्या शेतातून गेला होता. मात्र, तत्कालीन तलाठ्याच्या नजरचुकीमुळे श्री. प्रयाग यांच्याही सातबाऱ्यावर '६ आर' जमीन संपादित झाल्याची नोंद करण्यात आली. ही चुकीची नोंद काढण्यासाठी श्री. प्रयाग मागील काही वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागत होते, मात्र हा तांत्रिक पेच सुटत नव्हता. य...

रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन

रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १५ : पश्चिम आशियाई देशांतील सद्यस्थिती आणि जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य शासनाने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यानुसार रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानुसार, राज्य शासनाने कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, जागतिक बाजारपेठेतील खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे. ही परिस्थिती विचारात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यामुळे केवळ जमिनीची सुपीकता टिकणार नाही, तर उत्पादन खर्च कमी होऊन विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना मिळेल. ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन भ...

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम · लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण

Image
सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम · लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण लातूर, दि. १५ : आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय विभागांमधील समन्वय आणि तत्परता तपासण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने लातूर येथे 'सीएनजी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन' विषयावर भव्य संयुक्त प्रात्यक्षिकाचे (मॉक ड्रील) आयोजन करण्यात आले होते. संभाव्य गॅस गळती आणि आग दुर्घटनेच्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे कार्य करतात, याचे यशस्वी सादरीकरण यावेळी करण्यात आले. या रंगीत तालमीमध्ये एका सीएनजी वाहनाला गॅस गळतीमुळे आग लागल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका अग्निशमन दल आणि पोलीस वाहतूक शाखा या यंत्रणांना त्वरित पाचारण करण्यात आले. घटनेनंतर काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीची वैद्यकीय मदत देऊन रुग...

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

लातूर , दि १४ :   भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ' विशेष सखोल पुनरिक्षण ' ( एसआयआर ) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून या मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख ३६ हजार मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.   *बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी*   महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात लातूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख ३६ हजार मतदारांच्या तपशिलाची खातरजमा २ हजार १४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत   करण्यात येणार आहे.   हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ' बूथ लेव्हल एजंट्स ' ( बीएलए ) त्यांना सहकार्य करणार आहेत.   *जनगणनेच्या कामाशी सांगड*   सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्...