Posts

Showing posts from August, 2026

लातूर येथे २ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सव २०२६-२७ चे आयोजन

लातूर येथे २ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सव २०२६-२७ चे आयोजन लातूर, दि. ३१ : रानभाज्यांचे मानवी आरोग्यातील महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा प्रसार करणे तसेच त्यांच्या विक्रीसाठी एक सक्षम विपणन साखळी निर्माण करणे या मुख्य उद्देशाने कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या वर्षाकरिता विशेष रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा रानभाजी महोत्सव बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत लातूर शहरातील औसा रोडवरील दत्त मंदिराशेजारील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महोत्सवामध्ये दुर्मीळ रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्ट्ये, त्यांचे औषधी गुणधर्म, आरोग्यासाठी होणारे उपयोग, रानभाज्यांच्या संवर्धन पद्धती आणि पारंपरिक पाककृती (रेसिपी) यांची सचित्र व तांत्रिक माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या व रानफळे थेट खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ...

लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध • दावे व हरकती नोंदवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध • दावे व हरकती नोंदवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन लातूर, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (एसआयआर) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार तयार करण्यात आलेली ही प्रारूप यादी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रांवर कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्याच्या https://latur.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार लातूर जिल्ह्यातील २ हजार १४७ मतदान केंद्रांवर एकूण १७ लाख ९० हजार ००८ मतदारांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये ९ लाख ४० हजार २०० पुरुष, ८ लाख ४९ हजार ७७८ महिला आणि ३० इतर मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे: • २३४-लातूर ग्रामीण: ३६३ मतदान केंद्रांवर १ लाख ५७ हजार २६८ पुरुष, १ लाख ३८ हजार ७९७ महिला व १ इतर...

वयस्कर, बोटांची ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्च‍ित - नानासाहेब चव्हाण

वयस्कर, बोटांची ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्च‍ित - नानासाहेब चव्हाण  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६  कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना लातूर, दि. 31 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहकार ‍विभागाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाताना आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जावे. योजनेच्या पोर्टलवरील संबंधित क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे कर्जखात्याची माहिती तपासल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. आधार प्रमाणीकरण करताना बोटांचा ठसा जुळत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा ...

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ · ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ · ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर लातूर, दि. २७ : राज्यात अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मागील वर्षापासून राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. या महोत्सवांतर्गत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार यावर्षीपासून देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशभरात आणि जगभरात अत्यंत उत्साहाने व विविध विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनादेखील यावर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र तीन पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. या राज्य महोत्सवांतर्गत आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे https:...

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करा : नानासाहेब चव्हाण

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करा : नानासाहेब चव्हाण लातूर, दि. 27 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती त्यांच्या कायदेशीर वारसांकडून घेऊन योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. संबंधित बँकांनी या कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार ‍विभागाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमध्ये मयत शेतकरी असल्यास, त्याच्या वारसाची माहिती घेऊन कर्जखात्याचा वारस नोंदवावा. त्यानंतर पोर्टलवरील‘Upload Deceased Accounts सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करावी. बँकेने मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हिस्से कर्जखात्यामध्ये नमूद करावेत. मयत शेतकऱ्यांऐवजी वारस खातेदाराची माहिती नुमना तक्त्यात ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी. वारसांची माहिती भरताना अनु क्रमांक. BR-ID, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, AgriStack Registry, CIF, बचत खाते क्रमांक,...

लातूर जिल्ह्यात कृषी अवजार बँक स्थापनेसाठी नोंदणीकृत संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात कृषी अवजार बँक स्थापनेसाठी नोंदणीकृत संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २५: ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (व्ही.एस.टी.एफ.) आणि सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून, तसेच लातूर जिल्हा कृषी विभाग यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील आकांक्षित व शेतकरी आत्महत्याप्रवण भागात ग्रामीण उपजीविका बळकट करण्यासाठी कृषी अवजार बँकांची स्थापना करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत औसा तालुक्यातील किल्लारी, लामजना, चलबुर्गा, अशिव, कवळी, जवळगा पोमादेवी, मंगरूळ, दापेगाव, बानेगाव, उत्का, पारधेवाडी; जळकोट तालुक्यातील चेरा, हावरगा, होकरना, शेलदरा, उमरदरा, उमारगा रेतु, येलदरा; तसेच अहमदपूर तालुक्यातील मावलगाव, अंधोरी, हगदळ, रुद्दा, सुनेगाव सेंद्री, धसवाडी, लेंदेगाव, नांदूराखुर्द, सोरा, तळेगाव आणि येस्तार या निवडक गावांमध्ये एकूण ३ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभाग, आत्मा, उमेद (एमएसआरएलएम), माविम किंवा इतर शासकीय विभागांकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी/एफपीओ), शेतकरी गट, बचतगटांचे ग...

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पदक प्राप्त खेळाडूंचा भव्य सत्कार आणि विविध उपक्रम

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पदक प्राप्त खेळाडूंचा भव्य सत्कार आणि विविध उपक्रम · पात्र खेळाडूंनी सहभागी होण्याकरिता 28 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन लातूर, दि. 25 : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती व भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. सन 2026 मधील राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत जितेगा भारत’ असून आदर, खेळ आणि या प्रमुख स्तंभावर आधारित 28 ते 30 ऑगस्ट, 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. यामध्ये 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता डिजीटल ट्रिब्युट, 29 चॅलेंज, पास द बॉल आणि स्पोर्ट बंधन या उपक्रमांचे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. तसेच 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता संडेज् ऑन सायकल व रन ॲन्ड राईड या स्पर्धांचे पुरूष व महिलासांठी खुल्या गटातून आयोजन केले आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस तथा राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्...

लातूर जिल्ह्यात ६४० 'आपले सरकार सेवाकेंद्रां'साठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

लातूर जिल्ह्यात ६४० 'आपले सरकार सेवाकेंद्रां'साठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित लातूर, दि. २५ : जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-गव्हर्नन्स विभागामार्फतजिल्ह्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' स्थापन करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यातआली आहे. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्यानिर्देशानुसार, जिल्ह्यातील तालुके, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायतक्षेत्रांमधील एकूण ६४० रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या केंद्रांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्णअसणे आवश्यक आहे. अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी) उत्तीर्णअसावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून, एमएससीआयटी किंवासीसीसीचे प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. अर्जदार संबंधित ग्रामपंचायत किंवाशहरी क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. याशिवाय उमेदवाराकडे आधारकार्ड, पॅन कार्ड,बँक खाते व आवश्यक ओळखपत्र असणे गरजेचे आहे. अर्जदारावर नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूककिंवा सायबर गुन्ह्याबाबत कोणताही ठपका किंवा दोष सिद्ध झा...

लातूर जिल्ह्यात रक्षाबंधननिमित्त स्थानिक सुट्टी

लातूर जिल्ह्यात रक्षाबंधननिमित्त स्थानिक सुट्टी लातूर दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यासाठी २०२६ मधील तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ५ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षातील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना ही स्थानिक सुट्टी लागू राहील. ****

नीट पीजी प्रवेश परीक्षा केंद्रपरिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू 

नीट पीजी प्रवेश परीक्षा केंद्रपरिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू  लातूर, दि. २५ :  राष्ट्रीय परीक्षा एजेंन्सीमार्फत आयोजितनीट पीजी प्रवेश परीक्षा २०२६ ही परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते १२.३० वाजेपर्यंत लातूरजिल्ह्यातील २ परीक्षा केंद्रावर एकसत्रामध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्यापरिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी डॉ. भारतबास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये दोन परीक्षाकेंद्राच्या १०० मीटरच्या परिसरामध्ये परीक्षेच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश जारीकरण्यात आले आहेत. परीक्षाकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाचपेक्षा जास्तव्यक्ती एकत्रितरित्य प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यातयेणर नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडूनशांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षाकेंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ,ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुद...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनानिमित्त बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनानिमित्त बंद राहणार लातूर, दि. 25 : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बुधवार, 26 ऑगस्ट, 2026 रोजी ईद-ए-मिलाद व शुक्रवार, 28 ऑगस्ट, 2026 रोजी रक्षाबंधनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. इतर दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. ***

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत लातूर, दि. २४ : जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन लातूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी, बारावी, तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व नवीन आणि नूतनीकरण करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर सर्वप्रथम आपला ओळख क्रमांक वापरून महाआयडी तयार करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आपला पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल माहिती अद्ययावत ठेवावी आणि भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह भत्ता या योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्...

लातूर जिल्हा गुंतवणूक परिषदेत सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार

लातूर जिल्हा गुंतवणूक परिषदेत सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार उद्योगांना जलद मंजुरीसह पायाभूत सुविधा पुरवण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २४ : लातूर जिल्ह्यातील उद्योगांची संख्या आणि गुंतवणूक सातत्याने वाढत असून त्याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी होत असून अनेक तरुण नवनवीन संकल्पना घेऊन उद्योग क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अशा नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदतीसाठी मैत्री कक्ष आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केले जाईल. तसेच उद्योगांसाठी आवश्यक परवानगी देण्यात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिली. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि नवउद्योजकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जुनी एमआयडीसी येथील 'एनरायज बाय सयाजी हॉटेल' येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या गुंतवणूक परिषदेस छत्रपती संभाजीनगर येथील सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) संजय भुरेवाल,...
Image
  लातूर , दि. २१ (जिमाका): छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची निवेदने स्वीकारली. यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी रस्ते , भूसंपादन , कृषी , उद्योग , भूमापन आणि आरोग्य यांसारख्या विविध विषयांवरील निवेदने सादर केली.   यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना , लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी , अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके , उपजिल्हाधिकारी संगीता टकले , अहिल्या गाठाळ , गणेश पवार , सायली ठाकूर , उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   जनसंवाद कार्यक्रमात प्राप्त झालेली निवेदने संबंधित कार्यालयांकडे पाठवली जातील. त्यावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबतची माहिती अर्जदार व विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावी. यापुढे दर एक-दोन महिन्यांनी लातूर येथे आढावा बैठक ...

गट-ड च्या ७९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

गट-ड च्या ७९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लातूर, दि. २१ (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया 20 ऑगस्टपासून ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी दिली आहे. या पदांसाठीची भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्जाची लिंक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांनी अधिष्ठाता कार्यालयातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा त्रयस्थ व्यक्तीसोबत कागदपत्रे अथवा आर्थिक व्यवहार करू नये. नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करणे किंवा बनावट नियुक्तीपत्र देणे अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी भर...

ग्रंथालय विकास योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

ग्रंथालय विकास योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन लातूर, दि. २१ (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालयांच्या इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत इतर लाभ केंद्रीय पद्धतीने दिले जात असल्याने त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत. असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री व फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये, इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपये, ज्ञान कोपरा विकासासाठी २ लाख ५० हजार रुपये आणि आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय ५०, ६०, ७५, १००, १२५ आणि १५० वर्षे पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांच्या महोत्सवी वर्षां...

सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी

सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी लातूर, दि. २१ (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून देण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ६६ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना पुणे सैनिक कल्याण विभागाच्या (डिएसडब्ल्यु) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी -66 कोर्ससाठीचे प्रवेशपत्र तसेच त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून त्यांची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्र व परिशिष्टे पूर्ण भरून सोबत आणावीत. एसएसबी प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवाराकडे पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. C...

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २७ ऑगस्टला पात्र प्रस्तावांची सोडत

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २७ ऑगस्टला पात्र प्रस्तावांची सोडत लातूर, दि. २१ (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २०२६-२७ अंतर्गत प्राप्त पात्र प्रस्तावांची सोडत २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांच्या दालनात काढण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत देशांतील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया, निर्यात, पणन, बाजारपेठेतील मागणी तसेच अद्ययावत शेती पद्धतींची माहिती मिळावी, यासाठी कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. परदेशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद, क्षेत्रीय भेटी आणि संबंधित संस्थांना भेटी यांद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता वाढविणे हा या अभ्यास दौऱ्याचा उद्देश आहे. लातूर जिल्ह्यासाठी ५ शेतकऱ्यांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, केंद्र व राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेतील विजेते तसेच इतर शेतकरी यांचा समावेश आहे. ...

‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग !

Image
‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग ! • ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा जागर • सहभागासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे आवश्यक लातूर, दि. २१: मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आज जलसंधारण दिनानिमित्त लातूर येथे ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या वॉकेथॉनला सुरुवात झाली. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती, तर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या वर्षा...

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान • जलसंधारण दिनानामित्त आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन • सहभागासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे गरजेचे लातूर, दि. २० : जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता लातूर जिल्हा परिषद प्रांगणातून या महा वॉकेथॉनला सुरुवात असून तीन किलोमीटर वॉकेथॉनमध्ये विजेत्या ठरणाऱ्या प्रथम दहा जणांचा वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, युवक-युवती, खेळाडू, महिलांनी क्यूआर कोडद्वारे नोंदणी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जल...

विभागीय आयुक्त जी. श्रीकांतयांचा लातूर येथे शुक्रवारी जनसंवाद उपक्रम;नागरिकांची निवेदने स्वीकारणार 

विभागीय आयुक्त जी. श्रीकांतयांचा लातूर येथे शुक्रवारी जनसंवाद उपक्रम;नागरिकांची निवेदने स्वीकारणार  लातूर, दि. २० : छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी.श्रीकांत हे २१ व २२ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले आहे. या जनसंवाद कार्यक्रमात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे लातूर जिल्ह्यातीलनागरिकांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारणार आहेत. तरी नागरिकांनी या उपक्रमातसहभागी होण्याचे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. **** 

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया -संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया -संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधारआहे. बदलते हवामानआणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्ष...

जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प

Image
जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेला लातूर जिल्हा. जिल्ह्यासाठी 'पाणी' हा विषय महत्त्वाचा. गेल्या काही दशकांत आपण भूजल पातळीतील घट अनुभवली. जमिनीखालील जलस्तराचा अभ्यास केल्यास प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे, जो लातूरच्या जलचळवळीला नवी दिशा देणारा ठरणारा आहे, यावर आधारित हा विशेष लेख. जलसाधनेचा महामहोत्सव माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा मूलमंत्र देऊन राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या गौरवार्थ २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होत आहे. लातूर जिल्ह्यात या दिवशी आयोजित होणारी 'महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर' ही केवळ एक रॅली नाही, ती आपल्या पाण्यासाठी केलेली एक प्रतिज्ञा आहे. "माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील ...

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे लातूर, दि. 19 (जिमाका) : शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेत व आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी लातूर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल (FFS) ई-प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना खतांची आगाऊ बुकिंग करता येणार असून, त्यामुळे रांगा व गर्दी टाळून उपलब्धतेनुसार खताची खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली. सध्या रासायनिक खतांची विक्री कृषी सेवा केंद्रांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे केली जाते. नव्या FFS प्रणालीमुळे खत बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे. अशी असेल प्रक्रिया प्रथम महाराष्ट्र राज्याची निवड करून आधारद्वारे पडताळणी करावी. आधार ओटीपी आणि ई-केवायसीद्वारे ओळख निश्चित करावी. यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) किंवा सातबारा आवश्यक असेल. यानंतर पिकाची आणि आवश्यक खताची निवड करावी. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आदी उपलब्ध खतांमधून निवड करता येईल....

‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड · जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकेथॉन लातूर, दि. १९ : : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, तरुण, विद्यार्थी, एनसीसी व एनएसएसचे स्वयंसेवक, क्रीडापटू, डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, महिला आणि सर्व स्वयंसेवी संस्थांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ ही या वॉकेथॉनची मुख्य संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा मोलाचा संदेश घेऊन सर्वजण एकत्र चालणार आहेत. ही वॉकेथॉ...

बीएच सिरिज वाहनांचा थकीत कर भरणा करावा उदगीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांचे आवाहन

बीएच सिरिज वाहनांचा थकीत कर भरणा करावा उदगीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांचे आवाहन लातूर, दि. १९ (जिमाका) : भारत (बीएच) सिरिजमध्ये नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी वाहनाचा थकीत कर विहित मुदतीत भरावा, असे आवाहन उदगीर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५१ (ब) अन्वये बीएच (भारत) सिरिजमध्ये वाहन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार बदली होणारे केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्र व राज्य सार्वजनिक उपक्रम तसेच काही शासकीय संस्थांतील कर्मचारी आणि चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांत कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांतील पात्र कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५१ (बी) (३) नुसार बीएच सिरिज वाहनांचा कर आकारला जातो. या वाहनांचा १५ वर्षांचा कर एकत्रित न भरता दोन वर्षांच्या...

अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढा खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना परिपूर्ण प्रस्ताव सादरकरण्याचे आवाहन 

अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढा खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना परिपूर्ण प्रस्ताव सादरकरण्याचे आवाहन  लातूर, दि. १९ (जिमाका) : खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्येसेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपानियुक्तीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांनी परिपूर्ण प्रस्तावतातडीने सादर करावेत, असे आवाहन पुणे येथील शिक्षण संचालनालय (योजना) चे शिक्षण उपसंचालककृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ जानेवारी २०२६ रोजी अनुकंपानियुक्तीची सुधारित योजना लागू केली आहे. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत ४ जून२०२६ रोजी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सुधारित धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांची प्रकरणेविहीत कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकनिर्देश दिले आहेत. प्रस्ताव सादर करताना दक्षता आवश्यक अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराने शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट‘क’ मधील विहीत नमुन्यात ...

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण लातूर, दि. १९ (जिमाका) : रंगरूट प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), लातूर येथे आर.सी.डब्ल्यू.ए.च्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आरसीडब्ल्यूएच्या अध्यक्षा बसमी शौकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अधिकारी व जवानांच्या कुटुंबातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. आरटीसी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, हरित क्षेत्राचा विस्तार आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी बसमी शौकत यांनी ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. ****

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’चे २१ ऑगस्ट रोजी आयोजन

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’चे २१ ऑगस्ट रोजी आयोजन • जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान लातूर, दि. १८ : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. जिल्हा परिषद प्रांगण ते नवीन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृद...

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 18 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 18 ऑगस्ट, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 1 सप्टेंबर, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्...

जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत

जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत मुंबई, दि. १७ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून त्यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभागाची जोड देत जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचे मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. याचबरोबर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २०, २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रो...

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त निलंगा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त निलंगा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम लातूर, दि. 14 (जिमाका): दरवर्षीप्रमाणे 12 ऑगस्ट रोजी जगभर आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही, एड्स संदर्भात अधिक संवेदशिल असून त्यानिमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही, एड्ससंदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग सृजनशिल असल्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृजी निर्माण व्हावी. याकरिता आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त जिलहा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर , उपजिल्हा रुग्णालय निलंगा व महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी.फार्मसी इन्स्ट्यिुट निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुट निलंगा येथे नुकतीच (१२ ऑगस्ट, 2026) रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रॅली, रेड रन स्पर्धा व प्रश्न मंजूषा स्पर्धांचे आयेाजन करण्यात आले होते. लातूर येथील जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे,डॉ. विश्वेश कुल...

ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

Image
ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन लातूर, दि. 14 (जिमाका): महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मुंबई कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एचआयव्ही, एड्स इन्टेसीफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे, विविध तपासण्या व उपचाराकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व ग्रामीण रुग्णालय मुरुडच्यावतीने आज विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा , डॉ. आनंद कलमे यांच्या नेतृत्वाखाली विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकूचे बिपीनचंद्र बोर्ड, डॉ. सचिन गोबाडे, डॉ. संदिप पुरी, डॉ. आरती भारती, डॉ. संदिप मंत्रे, डॉ. अविनाश ठो...

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा लातूर, दि. १७ (जिमाका) : लातूर येथील केंद्रीय रिजर्व पुलिस बल रंगरुट प्रशिक्षण केंद्र येथे 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती व उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व अधिकारी, जवान व प्रशिक्षणार्थी यांच्या मनात देशाप्रती अभिमान व समर्पणाची भावना दिसून आली. समारंभाचे प्रमुख पाहूणे केंद्रीय रिजर्व पुलिस बल रंगरुट प्रशिक्षण केंद्राचे उपमहानिरीक्षक, प्राचार्य अमीरुल हसन अंसारी होते. यावळी इतर राजपत्रित अधिकारी, अधिनस्त अधिकार, जवान तसेच सुमारे 1 हजार 700 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण समारंभाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला आणि उपस्थित सर्व जवांनानी एकत्रितपणे राष्ट्रगान गायले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाची आठवण करुन देतो तसेच देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्या...

विशेष लेख जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र

विशेष लेख जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र            पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.             महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्या...

लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद लातूर, दि. १७ (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हातील गुंतवणूक वाढवणे व नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्हयातील गुंतवणूकदार आणि व्यवसायीकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, लातूर जिल्हा विकासासाठी केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नवउद्योजकांसोबत व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करुन, नव उद्योजकांना एमओयु वितरीत करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नव उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं.पी-५, एम.आय.डी.सी.लातूर येथे आपल्या नव उद्योग, व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन उप आयुक्त (उद्योग व सेवा) आवाहन लातूर येथील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक उद्योग अधिकारी (मो.क्र. ७३९७८३०५८८) यांच्याशी संपर्क साधावा. ****

ाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ

Image
विशेष लेख शाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्याबाबत जनमानसात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने यंदा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमारो' अर्थात माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जलसंधारणाच्या या कार्याला सर्वसमावेशक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे अनियमित पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यांमुळे जलसुरक्षेचे आव्हान गंभीर बनले आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यासारख्या भागातील सरासरी पर्जन्यमानाची अनिश्चितत...