Posts

Showing posts from June, 2026

बळीराजासाठी आश्वासक पाऊल...

Image
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजा पेरणीच्या कामात व्यस्त आहे. अशा मोक्याच्या वेळी राज्य सरकारने ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी दिली आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. ही केवळ एक कर्जमाफी नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा विश्वास आहे. प्रशासकीय पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालून राबवण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांना पुन्हा सन्मानाने बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या योजनेच्या नावामागील प्रेरणा, त्यातील धोरणात्मक तरतुदींची सविस्तर माहिती आपण घेऊया. महाराष्ट्र वारंवार अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असतो, ज्यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, शेती क्षेत्रात 'दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा' (Long-term Structur...

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; लातूर, दि. ०१ : कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना जाहीर केली आहे. राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून , जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही तर , विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जे शेतकरी थकबाकीदार आहेत , अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे. यापूर्वीच्या ' महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने ' चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. तसेच ज्या शेत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

Image
लातूर, दि. ०१ : कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना जाहीर केली आहे. राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून , जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही तर , विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जे शेतकरी थकबाकीदार आहेत , अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे. यापूर्वीच्या ' महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने ' चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे , त्यांच्या...

'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान'; २ जुलै रोजी लातूरमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ

'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान'; २ जुलै रोजी लातूरमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ लातूर, दि. ३०: भारत सरकारद्वारे नव्याने मंजूर करण्यात आलेला 'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान (ग्रामीण)' (व्हीबीजी-राम-जी) अधिनियम-२०२५ हा राज्यात १ जुलै २०२६ पासून सर्वत्र लागू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम' (मनरेगा) या कायद्याऐवजी आता हा नवीन अधिनियम अस्तित्वात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्यासह बचत गटाच्या महिला सदस्य, योजनेचे लाभार्थी, कामगार युवक आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्यातून मिळणारे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पोस्टर्स, बॅनर्स आणि घडीपत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले लातूर, दि. ३० : राज्य शासनाने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ अंमलबजावणी आता अंतिम टप्यात आहे. या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती बँकेच्या शाखेत द्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बॅकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची मा...

‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन’ अंमलबजावणीला १ जुलैपासून प्रारंभ

*विशेष वृत्त क्र. : 432* ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन’ अंमलबजावणीला १ जुलैपासून प्रारंभ लातूर, दि. ३० : केंद्र शासनाच्या विकसित भारत @2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आणि समृद्ध व सक्षम ग्रामीण भारताच्या निर्मितीसाठी 'विकसित भारत - रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)' अर्थात 'RAM G अधिनियम, 2025' लागू करण्यात आला असून याद्वारे अकुशल शारीरिक काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आता प्रति आर्थिक वर्ष १२५ दिवसांच्या मजुरी-रोजगाराची वैधानिक हमी मिळणार आहे. या मिशनची अंमलबजावणी आज अर्थात १ जुलै २०२६ पासून सुरु होत आहे. या योजनेसाठी जिल्हाधिकारी हे जिल्हा कार्यक्रम समन्वयक, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सह कार्यक्रम समन्वयक असणार आहेत. या अधिनियमांतर्गत हाती घेण्यात येणारे सर्व प्रकल्प हे "विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा स्टॅक"चा भाग असतील, ज्यामध्ये प्रामुख्याने जलसुरक्षा व जलसंवर्धन, मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका आधारित पायाभूत सुविधा आणि आपत्ती प्रतिबंधक कामे अशा च...

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

*वृत्त क्र. : 432* लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. ३० : जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेता, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे आणि खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहाच्या कालावधीस ३१ जुलै २०२६ पर्यंत किंवा पुरेसा पाऊस होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावे व वाड्यांमध्ये स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमांनुसार नागरी व ग्रामीण भागाकरिता शेवटचा पर्याय म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत, तर खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहणास मान्यता देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ! महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची भूमी आहे. राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि सामाजिक जीवनाची वीण ही शेती व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांवर उभी आहे. निसर्गाची अनिश्चितता, अवकाळी पाऊस, दुष्काळ, बाजारभावातील चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च अशा असंख्य संकटांचा सामना करत अन्नदाता आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो. अशा या शेतकऱ्याला केवळ सहानुभूतीची नव्हे, तर आर्थिक स्थैर्य, विश्वास आणि शासनाच्या भक्कम पाठबळाची आवश्यकता असते. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ जाहीर केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीची घोषणा नसून, शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला बळ देणारे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे आणि शेती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारे एक ऐतिहासिक पाऊल आहे. महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्व...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद

*वृत्त क्र. : 432* लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात 30 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 13 मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी 0.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 13, औसा- 7.9, अहमदपूर- 1.1, निलंगा- 3, उदगीर- 4, चाकूर- 2.8, रेणापूर- 3.3, देवणी- 6.1, शिरूर अनंतपाळ- 2.3 आणि जळकोट- 0.3 मिलीमीटर. ***

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'एचएसआरपी' प्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा १ जुलैपासून होणार दंडात्मक कारवाई

वृत्त क्र. : 431 दिनांक : 29 जून,2026 १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'एचएसआरपी' प्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा १ जुलैपासून होणार दंडात्मक कारवाई लातूर, दि. २९ : केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीनंतर, म्हणजेच १ जुलै २०२६ पासून नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांना अद्याप एचएसआरपी प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनांच्या विविध शासकीय कामांवर परिवहन विभागाने निर्बंध लादले आहेत. त्यानुसार वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे आणि परवाना नूतनीकरण यांसारखी सर्व महत्त्वाची कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतन...

विशेष लेख महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

विशेष लेख महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही अशाच प्रकारची योजना आहे. ही योजना केवळ कर्जमाफी देणारी योजना नसून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, नव्याने पतपुरवठा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिली जात आहे. 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत शेतीचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील शेती आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चातील वाढ या अनेक कारणांमुळे शेतकरी वारंवार आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत कर्ज हा शेतीचा अविभाज्य भाग बनतो. परंतु जेव्हा हे कर्ज परतफेडीच्या क्षमतेपलीकडे जाते, तेव्हा त्याचे रूप आर्थिक विवंचनेत बदलते. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने यापूर्वीही ...

वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ • मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम

वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ • मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम* मुंबई, दि. २९: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या चरणसेवेला प्रारंभ झाला आहे. त्यात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि आरोग्य जनजागृतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चरण सेवेकरिता समन्वय वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'चरण सेवा' उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. पालखी मार्गावरील सुमारे ४०० विश्रांती व मुक्काम स्थळी ...

लातूर जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरोधात तीव्र मोहीम

लातूर जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरोधात तीव्र मोहीम लातूर, दि. २९ : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत विनापरवाना लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे तीव्र मोहीम हाती घेतली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यासाठी ही कडक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. गुन्हे दाखल व दंड वसुली लातूर महानगरपालिका क्षेत्रात विनापरवाना अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आतापर्यंत १६ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून, अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल करण्यात आला आहे. प्रिंटिंग एजन्सींना कडक सूचना महानगरपालिकेची रीतसर परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे होर्डिंग किंवा बॅनर छपाई केल्यास संबंधित प्रिंटिंग एजन्सींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट नोटीस प्रशासनातर्फे बजावण्यात आली आहे. माननीय उच्च न्यायालयात दाखल जनहित ...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यात २९ जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रेणापूर तालुक्यात सर्वाधिक २९.७ मिलीमीटर, तर देवणी तालुक्यात सर्वात कमी १.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- २१.७, औसा- ६.०, अहमदपूर- १४.४, निलंगा- १.९, उदगीर- १६.२, चाकूर- २१.०, रेणापूर- २९.७, देवणी- १.२, शिरूर अनंतपाळ- १३.३ आणि जळकोट- १५.७ मिलीमीटर. **

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन

लातूर , दि. २७ : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी , असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती , दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे. योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन २०२२-२३ , २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल कर...

विशेष लेख: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

Image
  भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्यांना उपजीविका देण्याचे काम हा महत्वपूर्ण घटक करतो. म्हणूनच शेती हा घटक अन्न सुरक्षा , रोजगार आणि ग्रामीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतो.     मात्र गेल्या काही वर्षांपासून सतत होणारे हवामान बदल ,   जमीन आणि पाण्याची टंचाई ,   बियाणे आणि खतांवरील वाढता खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते जसे की ,   शेतीचे उत्पादन वाढविणे ,   हवामान बदलास अनुकूल आणि शाश्वत शेतीला चालना देणे ,   सिंचन व्यवस्था आणि जलसंधारणात सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे ,   शेतकरी गटांना बळकट करणे आणि बाजारपेठ उपलब्धतेत सुधारणा आणणे यासारखेही प्रयत्न केले जात आहेत.   मात्र आपल्या...
Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
वृत्त क्र. : 427 जिल्हा वार्षिक योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. २६ : सर्व शासकीय यंत्रणांनी विहित कालावधीमध्येच प्रशासकीय मंजुरीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक काम चांगल्या दर्जाचे, टिकाऊ व गुणवत्तापूर्ण होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यावेळी उपस्थ...

लातूरमध्ये सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित समता दिंडी, संविधान जनजागृती प्रभातफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  लातूर , दि. २६ (जिमाका): राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर येथे समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच हिरवी झेंडी दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.   राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते आणि समाजातील दुर्लक्षित , मागासवर्गीय , दिव्यांग , वृद्ध , निराधार व दुर्बल घटकांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन विशेष सहानुभूतीचा व सुधारणावादी होता. त्यांनी या घटकांच्या कल्याणा...

सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालतीसाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची तयारी बैठक

Image
  लातूर , दि. २५ : सर्वोच्च न्यायालय , नवी दिल्ली आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने ' समाधान समारोह ' या उपक्रमांतर्गत आगामी २१ ते २३ ऑगस्ट , २०२६ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांमध्ये सौहार्दपूर्ण तडजोड घडवून आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांची एक महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक गुरुवारी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात झाली. ही बैठक लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती.   बैठकीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यंकटेश गिरवलकर यांनी उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना या विशेष लोकअदालतीचे महत्त्व सांगून प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.   या प्रकारची प्रकरणे असणार तडजोडीसाठी   लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आलेली सर्व प्रकारची प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी व दिवाणी प्रकरणे या विशेष ल...