Posts

Showing posts from July, 2026

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील लातूर, दि. ३१ : समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एका छताखाली उपलब्ध होत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे वेळेची बचत व आर्थिक बचत असल्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अहमदपूर येथे संत सावतामाळी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे होत्या. लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, लातूर जिल्हा परिषद सभापती उत्तम माने, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगारकर, चाकूरचे तहसिलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, अहमदपूर पंचायत समिती सभापती सुरज पाटील, अहमदपूरच्या उपसभापती अयोध्या केंद्रे, चाकूरचे उपसभापती चाकूर भुजंगराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे, प्रतीक्षा गुट्टे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, उ...

अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन लातूर, दि. ३० : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहमदपूर येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड हे राहतील. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तम माने, जिल्हा परिषद सदस्य ॲड. अजिंक्य देशमुख, इंजि. प्रफुलचंद्र गुंडरे, शितल खोमणे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, प्रतीक्षा गुट्टे, भानुदास पोटे, अमर पाटील, उषा सोनकांबळे तसेच अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, चाकूर पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे, अहमदपूरचे नगरा...

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ३० : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांसाठी अर्जाचा नमुना संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असून या क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणाऱ्या प्रमाणपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. या व्यवस्थापकीय समितीवर शासनामार्फत विविध अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोशाळा किंवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशन केलेल्या दोन व्यक्ती, तसेच जिल्ह्यात मानवहितकारक व प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणारे पाच ते सहा कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या पात्र संस्था, कार्यकर्...

लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात

लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात लातूर, दि. ३०: जिल्हा रेशीम कार्यालय येथे केंद्रीय रेशीम बोर्ड अंतर्गत 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' या उपक्रमाची पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक मंगळवारी झाली. या बैठकीसाठी केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. बाबुलाल सायनी यांनी तुती लागवड व कीटक संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले की, शेतीला जोडधंदा म्हणून 'सिल्क व मिल्क' (रेशीम आणि दुग्ध व्यवसाय) केल्यास प्रति एकरी उत्पादनात मोठी वाढ होते. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी वेगळे चारा पीक घेण्याची गरज भासत नाही. रेशीम कीटकांनी खाऊन उरलेला तुतीचा पाला हा प्रथिनांचा भरपूर मोठा स्त्रोत आहे. हा पाला जनावरांना खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढते, दुधाचे फॅट चांगले बसते आणि जनावरांची तब्येतही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले...

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन लातूर, दि. ३० (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांमधील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती व्हावी, तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि कृषीमाल प्रक्रिया यांबाबत अद्ययावत ज्ञान अवगत करता यावे यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे योजना सन २०२६-२७ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत परदेशातील शेती तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा वापर राज्यातील शेतकरी स्वतःच्या शेतीमध्ये करू शकतील, तसेच संबंधित देशांतील शेतकऱ्यांशी थेट चर्चा, क्षेत्रीय भेटी व विविध कृषी संस्थांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचनेनुसार चालू वर्षात युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली असून लातूर जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचे भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. प्राप्त लक्षांकानुसार १ महिला शेतकरी, १ केंद्र किंवा राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्का...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. ३० : (जिमाका): जिल्ह्यात ३० जुलै २०२६ रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यात सर्वाधिक ३८.३ मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी ५.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे: लातूर - १४.१, औसा - ५.५, अहमदपूर - २०.१, निलंगा - ८.९, उदगीर - ३८.३, चाकूर - २४.३, रेणापूर - २३.४, देवणी - २८.९, शिरूर अनंतपाळ - २३.१ आणि जळकोट - २५.८ मिलीमीटर. ****

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ योजनेंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार या पुरस्कारांचा उद्देश महाराष्ट्रातील उत्कृष्ट निर्यातदारांना रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन त्यांच्या निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे हा आहे. राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाने सन 2024-2025 व 2025-2026 या वर्षांसाठी राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील उत्पादक निर्यातदार, व्यापारी निर्यातदार, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उत्पादन निर्यातदार, ओडीओपी तथा जीआय निर्यातदार तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांतील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण 66 पुरस्कार प्रदान करण्यात येणा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयक १ ऑगस्ट रोजी लातूर येथे विशेष कार्यशाळा

वृत्त क्र. : 528 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयक १ ऑगस्ट रोजी लातूर येथे विशेष कार्यशाळा लातूर, दि. २९ (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरलेल्या व विहीत मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ लाभ वितरीत करण्याच्या दृष्टीने, तसेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी महाआयटी पोर्टलवर नवीन वसतिगृह प्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी येत्या शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, पात्र व अडचणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण, लातूरचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ***

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मत्स्यव्यवसाय योजनांची जनजागृती; एनएफडीपी प्रमाणपत्रांचे वाटप

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मत्स्यव्यवसाय योजनांची जनजागृती; एनएफडीपी प्रमाणपत्रांचे वाटप लातूर, दि. २९ (जिमाका): राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मंगळवारी लातूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये या योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिकांना राष्ट्रीय मत्स्यव्यावसायिक डिजिटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) अंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना एनएफडीपी प्रमाणपत्रांचे अधिकृत वितरण करण्यात आले, ज्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, केसीसी (केसीसी) सुविधा, विमा संरक्षण तसेच डिजिटल ओळख प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तसेच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा मिशन (सीएमएमएसआय) अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ऑल-इन-वन’ योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. याद्वारे मत्स्यबीज उत्पादन, म...

जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज !

Image
विशेष लेख -4 जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज ! निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'राबवण्यास सुरुवात केली आहे. 25 जुलै रोजी या योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे.राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीबाबत सविस्तर सांगितले आहे. या योजनेत केवळ कर्जमाफीच नाही, तर शेतकऱ्याला तत्काळ पुन्हा उभे करण्याची मोठी ताकद आहे. पहिल्या टप्प्यातील यादीत मराठवाडा विभागातील जवळपास सहा लाखांहून अधिक शेतकरी पात्र झाले आहेत. योजनेची सर्वात जमेची बाजू: अवघ्या एका दिवसात नवीन कर्ज! एरवी कोणतीही कर्जमाफी झाली, तरी नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांचा 'कुलिंग ऑफ पिरियड' (Cooling-off Period) असतो. यासाठी बँका अनेक महिने किंवा चक्क एक वर्ष वाट पाहायला लावतात. प...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जुलै रोजी कवळखेड येथे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जुलै रोजी कवळखेड येथे आयोजन लातूर, दि. २९ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि उदगीर तालुक्यातील कवळखेद येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा ३० जुलै, २०२६ रोजी सकाळी १० वाजता जी.एस.पी.एम. कॅम्पस, बोधन नगर, जळकोट रोड, कवळखेड, ता. उदगीर, जि. लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून, त्यामध्ये बारावी, बी.फार्म, डी.फार्म, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.सी.ए., आय.टी.आय., डिप्लोमा, बी.ई. तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम (बायोडाटा) आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ल...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात 29 जुलै 2026 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यात सर्वाधिक 46.3 मिलीमीटर, तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी 3.0 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : लातूर- 5.4, औसा- 5.3, अहमदपूर 20.3, निलंगा3, उदगीर-46.3, चाकूर- 16.3, रेणापूर- 6.6, देवणी- 8.3, शिरूर अनंतपाळ- 7 आणि जळकोट- 43.2 मिलीमीटर. ****

आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य शासनाच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा व्हीएलई यांनी शेतकऱ्यांकडून या कामासाठी कसलेही शुल्क आकारू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. तसेच असे शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा तसे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. योजनेच्या पात्र यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपल...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या समाधान शिबिराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समाधान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, लातूरचे उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देविदास काळे, जिल्हा परिषद गट नेत्या आशाताई भिसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नसीम पटेल, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदा...

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन लातूर, दि. २७ (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व लातूर महानगरपालिका लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२०२७ या वर्षातील शालेय तालुकास्तर, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर क्रीडा स्पर्धांच्या आयोजन नियोजनासाठी स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार अहमदपूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे, चाकूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चापोली येथील संजीवनी विद्यालय येथे, जळकोट तालुक्याची बैठक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जळकोट येथील महात्मा फुले महाविद्यालय येथे, तर देवणी व उदगीर या दोन्ही तालुक्यांसाठी ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उदगिरी महाविद्यालय येथे बैठक पार पडणार आहे. तसेच निलंगा व शिरूर अनंतपाळ या दोन्ही तालुक्यांसाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे, औसा तालुक्यासाठी ५ ऑ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी लातूर, दि. २७ (जिमाका) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर २८ जुलै, २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी लातूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय अन्य पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेश करण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास व शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय प...

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन लातूर, दि. २७ : सन २०२६-२७ या वर्षापासून राज्य शासनाने खरीप हंगामापासून सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे आणि फार्मर आयडी उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही योजना अधिसूचित महसूल मंडळात अधिसूचित केलेल्या पिकांसाठीच लागू असणार असून, ती कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत केली जात आहे. या योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तरावर विमा संरक्षण आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी ६२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कमेसाठी शेतकऱ्यांना १ हजार २५० रुपये हप्ता भरावा लागेल. कापूस पिकासाठी ६...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: लातूर जिल्ह्यातील ५४,४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Image
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन लातूर, दि. २५: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक'वर नोंदणी करून 'आधार प्रमाणीकरण' प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील २ गावांमधील १३३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८९२ गावांमधील ५४ हजार २९३ पात्र शेतकऱ्यांची यादी शेतकरी सभासदांच्या विशिष्ट क्रमांकासहित जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५ हजार २३१, तर राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९ हजार १९५ अशा एकूण ५४ हजार ४२६ पात्र...

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.

Image
राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने शासनाने शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सक्षम करणे, आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही व...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३३ शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा, एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भोसले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लातूर जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांच्यासह संबंधित अ...

लातूर येथे २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

लातूर येथे २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर • महसूल सेवा, आरोग्य शिबीर, विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथील पार्वती मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा 'एक खिडकी प्रणाली'द्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून, यामध्ये सातबारा व फेरफार दुरुस्ती, डिजिटल सातबारा सेवा, विविध प्रकारची दाखले व प्रमाणपत्रे वितरण, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, फार्मर आयडी, महिलांचे नाव अधिकार अभिलेखात समाविष्ट करणे, पात्र निव...

महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०२६ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी; लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती

महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०२६ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी; लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या गृह (परिवहन) विभागाद्वारे १६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम, २०२६ राज्यभरात लागू करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात या नवीन नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे. नवीन नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचे किमान भाडेदर आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (आरटीए) निश्चित केले जाणार असून प्रत्यक्ष दर हे निश्चित दरापेक्षा १० टक्के कमी किंवा जास्त राहू शकतील. तसेच शाळांमधील शालेय परिवहन समितीने दर तिमाहीला पालक व वाहतूकदारांची बैठक घेऊन त्याचा अहवाल जिल्हा स्कूल बस समितीस सादर करणे बंधनकारक आहे. स्कूल बसमधील चालक, महिला सहवर्ती व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक शाळा व्यवस्थापन किंवा वाहनधारकाकडून लेखी पत्राद्वार...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात 22 जुलै 2026 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 12 मिलीमीटर, तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी 3.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : लातूर- 12, औसा- 9.8, अहमदपूर- 11.3, निलंगा- 3.8, उदगीर-9, चाकूर- 8.3, रेणापूर- 8.3, देवणी- 8.4, शिरूर अनंतपाळ- 11.03 आणि जळकोट- 8.5 मिलीमीटर. ****

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असून, इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने दिला जात असल्याने त्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवू नयेत. असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री व फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तर इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय ज्ञान कोपरा विकासासाठी २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपय...

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु; वाहनांच्या पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविले

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु; वाहनांच्या पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविले लातूर, दि. २० (जिमाका) : १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२६ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता १ जुलै, २०२६ पासून एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशा वाहनांचे पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांना एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०१९ पूर्वीच्या वाहनांना पाटी बसविण्यासाठी ३० जून, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत पाटी न बसविलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पत्ता बदलणे, कर्जबोजा चढविणे यांसारख्या सेवांवर आधीच निर्बंध लादण्यात आले होते. यापुढे एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूत...

लातूर जिल्ह्यात २२ जुलैपासून विधानसभा मतदारसंघनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

Image
लातूर, दि. २० (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये २२ जुलै, २०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतच्या तारखा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिबीराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी स्वीकारणे, विविध प्रमाणपत्रे वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभ मंजूर करणे, ई-केवायसी करणे, नवीन व दुय्यम डिजिटल शिधापत्रिका देणे, पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, फार्मर आयडी देणे, डिजिटल सातबारा वाटप करणे, विमुक्त भटक्या जाती-जमातींसाठी प्रमाणपत्रे वाटप करणे, आभा कार्ड वाटप करणे, मोजणी विषयक अर्ज स्वीकारणे व मोजणी शीट (क-प्रत) वाटप करणे तसेच आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत करणे यांसारख्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या म्हणजेच आरोग्य, कृषी, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख आणि नगरपालिका प्रशासन विभागाच्या योजनां...

नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील · अहमदपूर येथे महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे भूमीपूजन लातूर, दि. २०: सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याकरिता विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, नगराध्यक्ष ॲड. स्वप्नील व्हत्ते, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, उपविभागीय अभियंता सूरज गौंड, दिलीप देशमुख, बाबासाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना क...

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर लातूर, दि. १७ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या एकूण ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कळविले आहे. या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करताना १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरण्यात यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमानुसार शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शुक्रवार, २४ जुलै २०२६ ते बुधवार, २...

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिले जाणारे 'दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६' जाहीर करण्यात आले असून या राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत प्रामुख्याने 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन', 'श्रेष्ठ दिव्यांगजन' आणि 'श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बाल/बालिका' या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने लातूर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित दिव्यांग व्यक्तीने किंवा संस्थेने केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती पुराव्यांसह नमूद करणे आवश्यक आहे. त्यासोबत यु.डी.आय.डी. कार्ड किंवा अधिकृत दिव्यांग प्रम...

ातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 17 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सायली ठाकूर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 19 जुलै, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 2 ऑगस्ट, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, मोठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्ह...

लातूरमध्ये २१ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूरमध्ये २१ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर, दि. १७ (जिमाका) : केंद्र शासनाच्या नॅशनल करिअर सर्व्हिस प्रकल्पाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २१ जुलै, २०२६ रोजी सकाळी १० वाजता औसा रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात अनेक नामांकित आस्थापना आणि खाजगी क्षेत्रातील उद्योजक सहभागी होऊन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार असून यामध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, कोणत्याही शाखेचे पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारक, तसेच आय.टी.आय. आणि डिप्लोमा उत्तीर्ण अशा विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी आणि नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपली सर्व मूळ शैक्षण...

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लातूरमध्ये मतदार आणि बीएलओ मदत कक्षाची स्थापना

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लातूरमध्ये मतदार आणि बीएलओ मदत कक्षाची स्थापना लातूर, दि. १७ : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) – २०२६ कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या अचूकतेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन विविध नमुने भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने २३४-लातूर ग्रामीण आणि २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार व कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्यासाठी लातूर तहसील कार्यालय येथे मतदार मदत कक्ष व बीएलओ मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून ३० जुलै २०२६ पर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार असून नायब तहसीलदार (संगायो) परमेश्वर कांबळे (मो. ९४२१४००२५१) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या मतदार मदत कक्षामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी ओंकार बोबले (मो. ९१४६७१५१२३) व अर्जुन कांबळे (मो...

युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

सुधारित युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी लातूर, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर १७ व १८ जुलै, २०२६ या कालावधीत सीएसआयआर युजीसी नेट परीक्षा जून, २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, ही परीक्षा सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी लातूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय अन्य पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेश करण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास व शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (मधल्य...

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून हणमंतवाडी येथील शासकीय वसतिगृह बांधकामाची पाहणी

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून हणमंतवाडी येथील शासकीय वसतिगृह बांधकामाची पाहणी लातूर, दि. १६ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान हणमंतवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी समाज कल्याण विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हे बांधकाम पूर्णपणे दर्जेदार, विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. वसतिगृह इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी कामाचा वेग, वापरण्यात येणारे साहित्य आणि एकूण गुणवत्ता याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण शासकीय प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दर्जेदार कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या सद्यस्थितीची व प्रगतीची माहिती दिली....

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा दौरा

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा दौरा लातूर, दि. 16 जुलै : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे हे आज, 16 जुलै रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 4 वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. त्यानंतर सोईनुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथून नांदेडकडे वाहनाने प्रयाण करतील. ****

बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. १५ : तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बीज भांडवल योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी तृतीयपंथीयांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाद्वारे शाश्वत रोजगार निर्माण करणे तसेच त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास साधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, लघुउद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी हे बीज भांडवल दिले जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिका...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा

  ·           शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा   मुंबई, दि. १४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून , नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. कर्जमाफीतील या सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती , त्यानुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ' ही ऐतिहासिक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेविषयी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना...