जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी 13 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी

13 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

लातूर, दि. 2 (जिमाका) : भारत सरकारच्या यवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्फे ग्रामीण युवा मंडळांना स्वयंप्रेरणेने ग्रामीण भागात समाजकार्य व विकासाचे कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नेहरू युवा केंद्रामार्फत दरवर्षी जिल्हा युवा मंडळ पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार सन 2022-23 मधील जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी 13 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीतर्फे एका मंडळाची निवड जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी केली जाते. 25 हजार रुपये व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लातूर नेहरू युवा केंद्र कार्यालयासोबत सलंग्नित तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या 18 ते 29 वयोगटातील युवा मंडळांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यातील नोंदणीकृत व लातूर नेहरु युवा केंद्रासोबत संलग्नित असलेल्या, तसेच 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत आरोग्य व कुटूंब कल्याण, पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, साक्षरता, महिला सशक्तीकरण, लोककला व क्रीडा, रोजगार निर्मिती, श्रमदान, सामाजिक समस्याबद्दल मोहिम, समाज कल्याण, स्वच्छता अभियान इतर क्षेत्रात सक्रीय कार्यरत असणाऱ्या जिल्हा युवक मंडळानी आपले प्रस्ताव जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे 13 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमुन्यात सादर करावेत. अर्जाचा विहित नमुना व माहिती नेहरु युवा केंद्र कार्यालयात उपलब्ध आहे, असे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी कळविले आहे.

**** 

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित