Posts

Showing posts from April, 2026

जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
  ·          महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी लातूर येथे राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात   लातूर, दि. ०१ : भूकंपाच्या संकटाने हादरलेल्या लातूर जिल्ह्याने अत्यंत जिद्दीने स्वतःला पुन्हा उभे केले आणि आपली क्षमता सिद्ध केली. तोच जिद्दीचा वारसा पुढे नेत , आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत लातूरचे नाव अग्रभागी नेऊया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया , असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले.   महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील , प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना , पोलीस अधीक्षक अमोल तांबे , लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी , पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन , काम...

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तेशुक्रवारी पोलीस मुख्यालय प्रांगणात होणारराष्ट्रध्वज वंदन     

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तेशुक्रवारी पोलीस मुख्यालय प्रांगणात होणारराष्ट्रध्वज वंदन        लातूर, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. या मुख्यशासकीय समारंभाचे आयोजन बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणावर करण्यात आलेआहे.याप्रसंगीराष्ट्रध्वज वंदन आणि भव्य संचलन (परेड) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लातूरजिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा. तसेच, सर्व निमंत्रितांनी सोहळासुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी आसनस्थ व्हावे, असे आवाहनही जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागीहोता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी १ मेरोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभआयोजित करू नयेत, असे...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन लातूर, दि. ३० (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मे महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन · २५ एप्रिलपासून बीएलओ देत आहेत घरोघरी भेट · सन २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी लातूर, दि. ३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे अनिवार्य असून, लातूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर २५ एप्रिल २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध आहेत. मॅपिंग प्रक्रियेचे स्वरूप दुबार आणि तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मतदारांची पडताळणी केली जात आहे. मतदारांनी त्यांच्याकडील मतदार ओळखपत्र दाखविल्यानंतर बीएलओ २००२ मधील मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक या आधारावर मॅपिंग करणार आहेत. ज्या मतदारांची नोंद २००२ नंतरची आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारावर केली जाईल. बीएलओंची उपलब्धता एप्रिल पासून दररो...

लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २९ (जिमाका): राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित 'नीट युजी' परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही माध्यमे ३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले ...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १ मे रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १ मे रोजी बंद राहणार लातूर, दि. २९ : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच शनिवार, २ मे २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. ****

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर लातूर, दि. २९ (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, लातूर विभागातील आगारांसाठी या उपक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लातूर विभागातील या दौऱ्याची सुरुवात २९ एप्रिल २०२६ रोजी उदगीर आगारातून होणार असून त्यानंतर ६ मे रोजी लातूर, १३ मे रोजी औसा, २० मे रोजी अहमदपूर आणि ३ जून २०२६ रोजी निलंगा आगार येथे या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत 'प्रवासी राजा दिन' आयोजित केला जाईल, ज्यामध्ये प्रवासी, विविध प्रवासी संघटना, शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी आपल्या बस सेवेसंबंधीच्या तक्रारी आणि सूचना लेखी स्वरूपात मांडू शकतील. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत 'कामगार पालक दिन' साजरा करण्यात ...

वाढत्या तापमानामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन

वाढत्या तापमानामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन लातूर, दि. २९ : सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. उष्णतेची लाट म्हणजे काय? हवामान खात्याच्या निकषानुसार, एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्या भागात 'उष्णतेची लाट' आली असे संबोधले जाते. उन्हाळ्याच्या काळात 'सन बर्न', 'हिट क्रॅम्प्स' (स्नायूंना गोळे येणे), 'हिट एक्झोर्शन' (प्रचंड थकवा) आणि 'हिट स्ट्रोक' (उष्माघात) यांसारखे आजार उद्भवू शकतात. उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला? उन्हात कष्टाची कामे करणारे मजूर व शेतकरी. वृ...

जनगणनेसाठी 'स्व-गणना' पोर्टल १ मे पासून होणार कार्यान्वित; घरबसल्या नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जनगणनेसाठी 'स्व-गणना' पोर्टल १ मे पासून होणार कार्यान्वित; घरबसल्या नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता १० मे पूर्वी करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता १० मे पूर्वी करण्याचे आवाहन लातूर, दि. २८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत २६ डिसेंबर २०२६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या असून, या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत लातूर कार्यालयाच्या लॉगिनवरून ६८१ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर (सेंट बॅक) पाठविण्यात आले आहेत. या संदर्भात संबंधित विद्यार्थ्यांना वेळोवेळी दूरध्वनीद्वारे संदेश पाठवून व थेट संपर्क साधून त्रुटी दूर करण्याबाबत सूचित करण्यात आले असून, २८ एप्रिल २०२६ रोजी देखील पुन्हा एकदा संदेश पाठवण्यात आला आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याने त्यावर कार्यालयीन स्तरावरून कार्यवाही करणे शक्य नाही, त्यामुळे या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांचे अर्...

उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेवून ‘नीट’ परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेवून ‘नीट’ परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८: लातूर जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रांवर आगामी ३ मे २०२६ रोजी नीट युजी २०२६ परीक्षा पार पडणार असून, सुमारे १६ हजार ३०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सज्जता आणि उपाययोजना ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध पावले उचलली जात आहेत. वाढत्या उष्णतेचा विचार करता प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. या पथकांकडे उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, शहरात विद्यार्थी आणि प...

नांदेड येथे ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड येथे ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन लातूर, दि. २७ : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील श्री शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर येथे भव्य ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध महामंडळांच्या कर्ज योजना, प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जातील त्रुटी कशा टाळाव्यात, यावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या विशेष सोहळ्यात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल...

लातूर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तपोलीस मुख्यालय प्रांगणात होणार राष्ट्रध्वज वंदन  

लातूर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तपोलीस मुख्यालय प्रांगणात होणार राष्ट्रध्वज वंदन   लातूर, दि. २७ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. या मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणावर करण्यात आले आहे.याप्रसंगी राष्ट्रध्वज वंदन आणि भव्य संचलन (परेड) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा. तसेच, सर्व निमंत्रितांनी सोहळा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी आसनस्थ व्हावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी १ मे रोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभ आयोजित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एखा...

लातूर येथे २ ते ११ मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर; १६ खेळांच्या प्रशिक्षणाची खेळाडूंना संधी

लातूर येथे २ ते ११ मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर; १६ खेळांच्या प्रशिक्षणाची खेळाडूंना संधी लातूर, दि. २७ (जिमाका): जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी २ ते ११ मे २०२६ या कालावधीत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे होणाऱ्या या शिबिरात क्रिकेट, खो-खो, कुस्ती, ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कराटे, स्केटिंग, योगा आणि बास्केटबॉल अशा एकूण १६ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे (भ्रमणध्वनी क्र. ८२७५२७३९१७) किंवा क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर (भ्रमणध्वनी क्र. ९४२०२९२१५५) यांच्याशी संपर्क साधावा. *****

'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; २० मे रोजी पुण्यात होणार गौरव

'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; २० मे रोजी पुण्यात होणार गौरव लातूर, दि. २७ (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ सालासाठी 'मधुमित्र' आणि 'मधुसखी' पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व या क्षेत्रातील मधपाळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून मंडळाने हा उपक्रम सुरू केला असून, यात मधमाशीपालनात दीर्घकाळ यशस्वीपणे काम करणाऱ्या मधपाळांचा सन्मान केला जातो. या पुरस्कार योजनेत प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये अशा स्वरूपाचे तीन पुरस्कार दिले जाणार असून, यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या पुरस्कारांचे अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या खादी मंडळाच्या कार्यालयात किंवा मंडळाच्या www.mskvib.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २० मे २०२६ रोजी 'जागतिक मधमाशी दिना'च्या औचित्य...

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा · तरुणांना 'शिका आणि कमवा' योजनेची संधी

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा · तरुणांना 'शिका आणि कमवा' योजनेची संधी लातूर, दि. २७ (जिमाका): येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी २९ आणि ३० एप्रिल २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत २९ एप्रिल रोजी देवणी येथील कै. रसिका महाविद्यालय आणि ३० एप्रिल रोजी जळकोट येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी १० वाजता मुलाखती पार पडणार आहेत. या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा. लि. ही कंपनी सहभागी होणार असून, त्यांच्या 'टोयोटा कौशल्या' उपक्रमांतर्गत 'शिका आणि कमवा' या तत्त्वावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या संधीसाठी १८ ते २१ वयोगटातील दहावी किंवा बारावी उत्तीर्ण, तसेच पदवी शिक्षण घेत असलेले किंवा पदवीधर उमेदवार पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम आणि पासपोर्ट फोटो या...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० : माता आणि बालकांच्या सुदृढ भविष्याचा आधार

Image
  केंद्र शासनामार्फत महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी राबविण्यात येणारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० ही अधिक व्यापक स्वरूपात राबविली जात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रसूतीदरम्यान आर्थिक पाठबळ देणे हा आहे. अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे गर्भवती महिलांना मजुरीसाठी किंवा कामावर जावे लागते , ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि बाळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ही ओढताण थांबवून महिलांना विश्रांती घेता यावी आणि त्यांना सकस आहार मिळावा , या हेतूने सरकार या योजनेद्वारे थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करते. सन २०२५-२६ आर्थिक वर्षात १० हजार ८२२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.   या सुधारित योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या अपत्यासाठी मिळणारा लाभ. पहिल्या प्रसूतीवेळी पात्र महिलेला दोन हप्त्यांमध्ये एकूण ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यामध्ये गर्भधारणेची लवकर नोंदणी आणि किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यानंतर ३ हजार रुपये , तर बाळाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्य...

लातूर जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना; ३० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    लातूर, दि. २२ : अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीसाठी जिल्ह्यातील ३ नामवंत अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींकडून सदस्यत्वासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत  प्रस्ताव मागवण्यात आले आहेत . महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या १९ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार या जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे , आता ही समिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे . या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या आणि अल्पसंख्याकांसाठी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या जिल्ह्यातील नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव सर्व पुराव्यांसह सादर करणे आवश्यक आहे . हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती , नवीन जिल्हाधिकारी कार्यालय , बार्शी रोड , लातूर या कार्यालयात दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करायचे अस...

संभाव्य ‘एल निनो’मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
    • संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा ·          भूजल पुनर्भरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार   लातूर , दि. २२ ( जिमाका) : संभाव्य ‘एल निनो’मुळे आगामी मॉन्सून काळात पडणारा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा राहणार असून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासोबतच आगामी पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी , लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव , निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके , जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता...

सर्व प्रकारच्या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
    • जिल्ह्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा , • जुने पूल , तलावांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना • विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे सादर करण्याच्या सूचना   लातूर , दि. २२ ( जिमाका) : मॉन्सून काळात उद्भवणाऱ्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच सर्व विभागांनी आपली आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती (एसओपी) अद्ययावत करावी , अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या. मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी , लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव , निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले , जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे , कार्यकारी अभियंता अमरसिंग पाटील , रोहित जगताप , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस...

'उमेद' अभियानातून लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट

Image
 

विशेष लेख : 'उमेद' अभियानातून लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट

Image
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच 'उमेद' अभियानाद्वारे लातूर जिल्ह्यामध्ये सन २०१८ पासून ग्रामीण विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. हे अभियान ग्रामीण भागातील गरीब, मागास, दिव्यांग, विधवा आणि अल्पभूधारक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी चळवळ बनली आहे. महिलांना सक्षम संस्थांच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मूळ गाभा आहे. लातूर जिल्ह्याने 'उमेद' अभियानात उल्लेखनीय कामगिर केली असून, आतापर्यंत १ लाख ९४ हजार ८९२ महिलांना २० हजार २५० स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून अभियानाशी जोडण्यात आले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात ९६३ ग्रामसंघ, ५८ प्रभागसंघ आणि १७६ उत्पादक गटांचे एक भक्कम जाळे निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीचा पाया रचला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'लखपती दीदी' या महत्त्वाकांक्षी अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, महिलांना व्यवसाय निवडण्यापासून ते उत्पादनां...

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या कार्यालयातील गुण नियंत्रण कक्षात नितीन सोनटक्के यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली असून, कोणत्याही तक्रारीसाठी अथवा माहितीसाठी त्यांच्याशी ८२७५४८७४०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. या कक्षाच्या कामकाजासाठी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) बी. बी. मुंडे (भ्रमणध्वनी क्र. ७८२१८३०९०७) आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए. एन. तिडके (भ्रमणध्वनी क्र. ९६०४८८३०८५) हे समन्वयक म्हणून कार्यरत राहतील. शेतकरी, वितरक किंवा विक्रेते यांना कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास अथवा तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी या कक्षाशी किंवा कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत करण...

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन; शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन; शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदी करताना येणाऱ्या अडचणी व गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १० असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे गुणनियंत्रण निरीक्षक नियमितपणे विक्री केंद्रांची तपासणी करत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली. खरेदी दरम्यान किंवा हंगाम संपेपर्यंत निविष्ठांच्या दर्जाबाबत संशय आल्यास शेतकरी संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण कक्षाकडे धाव घेऊ शकतात. तक्रार करताना शेतकऱ्यांनी लेखी अर्जासोबत खरेदीची पक्की पावती, सातबारा उतारा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक असून त्यावर स्वतःचा पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडेही त...

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन लातूर, दि. २० : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आगामी खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची खत टंचाई नसल्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये एकूण ७५ हजार १६७ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून, यामध्ये ३८ हजार ४४४ टन संयुक्त खते, १६ हजार ८२ टन सिंगल सुपर फॉस्फेट, ११ हजार ४३६ टन युरिया, ८ हजार ३११ टन डीएपी आणि ८९४ टन एमओपी खताचा समावेश आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनवर 'एल निनो'चा परिणाम होऊन पावसाची अनिश्चितता वर्तविली असल्याने, शेतकऱ्यांनी खतांची आगाऊ खरेदी करून साठवणूक करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. तालुकानिहाय उपलब्धतेमध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक २९३६ टन युरिया व १८२४ टन डीएपी साठा असून, अहमदपूर (युरिया १५६२, डीएपी ९४२), निलंगा (युरिया १४७३, डीएपी १३४५), औसा (युरिया १३९८, डीएपी ५७०) आणि उदगीर (युरिया ७२६, डीएपी ७३०) या ...

लातूर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २०: जिल्ह्यात दि. २१ ते २६ एप्रिल, २०२६ या कालावधीत एमबीए, एमएमएस सीईटी आणि एमएचटी सीईटी २०२६ या सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ उपकेंद्रांवर ही परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, या काळात केंद्रावर परीक्षार्थींची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. २१ ते २६ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्य...

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थिनी विना अडथळा शिक्षण घेऊ शकणार आहेत.

Image
 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

 

लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
  लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ·          रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही   लातूर , दि. १८ : लातूरकरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन होत असले तरी याठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिली.   लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे , लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील , आमदार...