Posts

Showing posts from December, 2016
Image
लातूर जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी नियोजन समितीच्या माध्यामातून प्रयत्न करणार                         -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर   लातूर,दि. 30: लातूर जिल्हयाचे मानव विकास निर्देशकांत फारच खालचे स्थान आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून शिक्षण, आरोग्य व दरडोई उत्पन्न्‍ या तीन बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत करून लातूर जिल्हयाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामागार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील-कव्हेकर, आमदार सर्वश्री सुधाकर भालेराव, विनायक पाटील, ॲड. त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, मुख्यकार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, महापालिका आयुक्त रमेश पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघनाळे, जिल्हा नियोजन अधिकारी
Image
सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वयंसेवी संस्थांनी कार्य करावे                    -सामाजिक न्यायमंत्री राज कुमार बडोले          लातूर,दि. 29: सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वयसेवी संस्थांनी कार्य केल्यास तळागाळातील शेवटच्या घटकांतील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.                उजळंब ता. चाकूर येथील जन प्रतिष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. बडोले बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. अरवत, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गट विकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, उजळंबचे सरपंच संतोष बोईने, श्री. मोहन माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                श्री. बडोले पुढे म्हणाले की, स्वयंसेवी संस्थांनी सामाजीक विकास कार्याचा फक्त विचार न करता तो साध्य करण्यासाठी प्रयत्न ही केले पाहीजेत. या कामांत अनेक अडचणी येऊ शकतात परंतु त्यावर मात करुन आपल्या संस्थेचे ध्येय पुर्ण क
Image
लातूर विभागांतर्गत शिष्यवृत्तीची प्रलंबित सर्व प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत                                                     -सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले          लातूर,दि. 29: शासनकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेऊन मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिक्षणपूर्ण करत असतात. परंतू सन 2016-17 या शैक्षणिक  वर्षात लातूर विभागाच्या चारही जिल्हयात शिष्यवृत्ती व शिक्षण फी शुल्क माफी योजनांचे अर्ज मोठया प्रमाणावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. तरि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी  प्रलंबीत शिष्यवृत्ती अर्जावर  त्वरीत कार्यवाही करून जानेवारी 2017 अखेरपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय  आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.       शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित सामाजिक न्याय विभागांच्या विविध योजनांचा आढावा बैठकीत सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त एल.आय. वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनंत गव्हाणे, डीआ
जलयुक्त अंतर्गत 1 हजार 327 कामांचे फोटो सिमनिक प्रणालीवर अपलोड                    लातूर,दि.27: लातूर जिल्ह्यातील सन 2015-16 साठी डी पी डी सी अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून एकूण जिल्ह्यातील 9 यंत्रणामार्फत 202 गावातील 1 हजार 359 कामे मंजूर करण्यात आली त्या प्रमाणे सिमनिक  (simnic) प्रणालीवर 1 हजार 327 कामे अपलोड केलेली आहेत तसेच MRSAC प्रणालीवर 1097 कामांचे फोटो अपलोड केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे.               जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर झालेल्या कामाची माहिती   www.mahasim.nic.in  या संकेत स्थळावर भरण्यात आली असून लातूर जिल्ह्याचा कोड क्र. 32276 आहे. या संकेतस्थळावर सर्व कामाची माहिती तालुकानिहाय, गावनिहाय, यंत्रणानिहाय, कामनिहाय पाहता येईल तसेच सदरील कामाचे फोटो http://mrsac.maharashtra.gov.in/jalyukt या संकेतस्थळावर पाहता येईल, असे श्री. पोले यांनी सांगितले आहे.             महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग यांनी “ सर्वासाठी पाणी टंचाईयुक्त महाराष्ट्र 2019 ” अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे.
Image
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून लोकराज्य अंकाची पाहणी                     लातूर,दि.26: येथील टॉऊन हॉलच्या मैदानात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित विविध शासकीय यंत्रणांच्या योजनांची माहिती सांगणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.             यावेळी जिल्हाधिकारी श्री. पांडुरंग पोले व अन्य मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या प्रदर्शनात ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल लावण्यात आलेला होता. जिल्हाधिकारी पोले यांनी लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट देऊन लोकराज्यच्या मराठी, इंग्रजी व उर्दु अंकाची पाहणी केली. तसेच ऑक्टोंबर 2006 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषांक व चालू महिन्याचे नागपूर अधिवेशनाबाबतचे अंक माहिती कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी पोले व मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.             या प्रदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व ग्राहकांनी लोकराज्य स्टॉलला भेट देऊन विविध महिन्यांचे अंक खरेदी केले. यात  माहे डिसेंबर 2016 चा अंक अनेक ग्
Image
        व्यापारी व सेवा पुरवठादारांच्या सेवेत कमतरता                            असल्यास ग्राहकांनी तक्रारी नोंदवाव्यात                                                              -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले                     लातूर,दि.26: प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक व विक्रेता असतो. ग्राहक म्हणून व्यक्तीने आपल्या हक्कासाठी झगडलेच पाहिजे. तसेच व्यापारी व  सेवा पुरवठादारांच्या सेवाबाबत कमतरता असल्यास ग्राहकांनी त्याबाबतच्या तक्रारी तात्काळ नोंदविण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.             राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त टाऊन हॉल ग्रंथालय येथे आयोजित चर्चासत्र  व शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी पोले बोलत होते. यावेळी  माहापालिका आयुक्त रमेश पवार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक लता फड, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत लातूर जिल्हा अध्यक्ष ॲड. महेश ढवळे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष प्रदीप निटुरकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य अजय भोसरेकर, तहसिलदार संजय वारकड
Image
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन लोकांनी ‘ह्याच देही ह्याच डोळा’सोहळा पाहावा       लातूर दि.22:- मुंबईलगतच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 ला होत आहे. हा भूमीपूजन सोहळा ‘ह्याच देही ह्याच डोळा’ पाहण्याची संधी लातूर जिल्ह्यातील जास्तित जास्त जनतेनी घ्यावी. प्रमुख नद्यांचे पाणी व गडकिल्यावरची माती :-        हा सोहळा संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. क्षेत्र :-        राजभवनापासून जवळच असणा-या अरबी समुद्रातील सुमारे 16 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात भव्य स्मारक होणार असून यात शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभारला जाणार असून या पुतळ्याची उंची जगात सर्वात जास्त असणार आहे. तेजस्वी व गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब :-        आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणा-या छत्रपती शिव
Image
नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे                                         -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर          लातूर,दि.19: मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 ला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास, कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, तहसीलदार संजय वारकड आदि उपस्थित होते.                 पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, राजभवनापासून जवळच असणा-या समुद्रातील 15.96 हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची प
Image
अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटीबध्द                                        -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले        लातूर,दि.18: केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या सर्व योजनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करुन अल्पसंख्यांकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रशासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्तच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अक्षीक्षक लता फड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. पाटील, शिक्षणाधिकारी (मा) गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शेख नजरोद्दीन इस्माईल, सहाय्यक नियोजन अधिकारी श्री. राजुरवार, जैन संघटनेचे अभय शहा, आझाद युवा संघटनेचे बरकत काझी, ॲड. सय्यद शफी,महोमद्दिन अली सहाब,रजाऊलाखान, ॲड. रब्बानी बागवान, पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. डी. शिंदे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख व अल
Image
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रत्येक विभागाने वर्षभरात केलेल्या   कामाची माहिती सादर करावी                                      -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले   लातूर,दि.15: प्रतिवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी 24 व 25 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने दिनांक 26 डिसेंबर रोजी टॉऊन हॉल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. तरि सर्व विभागांनी या वर्षभरात केलेल्या कामांची संख्यात्मक माहिती ग्राहक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात स्टॉलद्वारे सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पुर्वनियोजन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, पोलीस उपअधिक्षक (गृह) डी.डी. शिंदे, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती शिंदे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अरुण महाजन यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी पोले म्हणाले की, दिनांक 26 डिसेबर रोजी महापालिकेच्या टाऊन हॉलमध्
Image
बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करावा                                          -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले  लातूर,दि. 14: जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रम क्षेत्रास (कृषी व संलग्न,शैक्षणिक गृहकर्ज व शासन पुरस्कृत योजना) वेळेत व उद्दिष्टाप्रमाणे कर्जपुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्राधान्यक्रम क्षेत्रास कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ,आरबीआयचे प्रतिनिधी मोहन सांगवीकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अरुण महाजन, नाबार्डचे डीडीएम एस.बी. पाचपिंडे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. पाटील यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पोले म्हणाले की, सन 2016-17 या आर्थिक वर्षात सप्टेबर 2016 अखेरच्या तिमाहीत बँकांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने समाधानकारक काम केलेल
Image
        जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण रॅलीचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन            लातूर,दि. 01: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर च्या वतीने 1 डिसेंबर 2016 जागतिक एड्स दिनानिमित्त लातूर शहरामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.                 रॅलीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अशोक शिंदे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, सहाय्यक संचालक हेमंतकुमार बोरसे, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद) एस. जी. नवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री. डांगे आदि उपस्थित होते.            जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य ‘ होऊया सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध’ चा नारा घेवून जनजागरण रॅलीची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर येथून मिनी मार्केट-गांधी चौक, गंजगोलाई- सराफा लाईन मार्गे- टाऊन हॉल येथे आली या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थींनी, व