जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून
लोकराज्य अंकाची पाहणी
लातूर,दि.26: येथील टॉऊन हॉलच्या मैदानात
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित विविध शासकीय यंत्रणांच्या योजनांची माहिती सांगणारे
प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.
पांडुरंग पोले व अन्य मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या
वतीने या प्रदर्शनात ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल लावण्यात आलेला होता. जिल्हाधिकारी
पोले यांनी लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट देऊन लोकराज्यच्या मराठी, इंग्रजी व उर्दु
अंकाची पाहणी केली. तसेच ऑक्टोंबर 2006 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषांक
व चालू महिन्याचे नागपूर अधिवेशनाबाबतचे अंक माहिती कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी पोले
व मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.
या प्रदर्शनात महाविद्यालयीन
विद्यार्थी, पालक व ग्राहकांनी लोकराज्य स्टॉलला भेट देऊन विविध महिन्यांचे अंक खरेदी
केले. यात माहे डिसेंबर 2016 चा अंक अनेक ग्राहकांकडून
खरेदी करण्यात आला.
*****
Comments
Post a Comment