राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रत्येक विभागाने वर्षभरात
केलेल्या
कामाची माहिती सादर करावी
-जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले
लातूर,दि.15: प्रतिवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक
दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी 24 व 25 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी
असल्याने दिनांक 26 डिसेंबर रोजी टॉऊन हॉल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात
येणार आहे. तरि सर्व विभागांनी या वर्षभरात केलेल्या कामांची संख्यात्मक माहिती ग्राहक
दिनानिमित्तच्या कार्यक्रमात स्टॉलद्वारे सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी पांडुरंग
पोले यांनी केली.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पुर्वनियोजन आढावा बैठकीत
जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, पोलीस
उपअधिक्षक (गृह) डी.डी. शिंदे, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती शिंदे, जिल्हा
अग्रणी बँक अधिकारी अरुण महाजन यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
पोले म्हणाले की, दिनांक 26 डिसेबर रोजी महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये राष्ट्रीय ग्राहक
दिनाचा कार्यक्रम होणार आहे. तरि संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या विभागाशी संबंधित
योजनांची माहिती स्टॉल मांडून नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी. त्यातुन ग्राहकांचे प्रबोधन
होऊन त्यांना योजनांबाबत सविस्तर माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पोलीस
विभागाने कायदा व सुव्यवस्था राबविण्याच्या दृष्टीने जनतेने घ्यावयची काळजीबाबत तसेच ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाच्या कायदयाची माहिती स्टॉलव्दारे देण्याची
सुचना श्री. पोले यांनी केली. तर लातूर महापालिकेने
नागरिकांना विविध करांचा भरणा कॅशलेस व्यवहाराच्या माध्यमातून कशा पध्दतीने करता येईल, याबाबतची माहिती
देण्याचे त्यांनी सांगितले.
तसेच
अन्न् व औषध प्रशासनाने फळ विक्रेते व इतर व्यवसायिकांडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये
बाबतचे मार्गदर्शन करावे. तर परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षा सप्ताहाची माहिती देऊन
वाहन परवान्यांच्या माहितीबाबत प्रबोधन करण्याची सुचना श्री. पोले यांनी केली. त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने आरोग्याच्या विविध योजनांची माहिती बरोबरच
रक्तदान मोहिम राबविण्याचे त्यांनी
सांगितले.
जिल्हा
अग्रणी बॅंक कार्यालयाने टाऊनहॉल येथे स्टॉल
मांडून त्यातून नोटाबंदीनंतर करण्यात येणाऱ्या कॅशलेस व्यवहारासाठी विविध अदयावत पर्यायांची
माहिती सविस्तरपणे ग्राहकांना देण्याची सुचना श्री. पोले यांनी केली. तर महसूल, कृषि,
सहकार, एस.टी. महामंडळे, वजन मापे, बीएसएनल, वीजवितरण, जिल्हा मध्यवर्ती बॅक, शिक्षण
विभागांनी आपल्या विभागांशी संबधित योजनांची माहिती राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात
स्टॉलव्दारे लोकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पोले यांनी केले.
ज्या
शासकीय विभांना राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त टाऊन हॉल येथील प्रदर्शनात स्टॉल लावयाचा आहे अशा विभागांनी नायब तहसिलदार सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधुन स्टॉल राखुन
ठेवावा, अशी सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती
जाधव यांनी केली.
*****
Comments
Post a Comment