सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वयंसेवी संस्थांनी कार्य करावे
                   -सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

         लातूर,दि. 29: सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वयसेवी संस्थांनी कार्य केल्यास तळागाळातील शेवटच्या घटकांतील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
               उजळंब ता. चाकूर येथील जन प्रतिष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. बडोले बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. अरवत, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गट विकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, उजळंबचे सरपंच संतोष बोईने, श्री. मोहन माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
               श्री. बडोले पुढे म्हणाले की, स्वयंसेवी संस्थांनी सामाजीक विकास कार्याचा फक्त विचार न करता तो साध्य करण्यासाठी प्रयत्न ही केले पाहीजेत. या कामांत अनेक अडचणी येऊ शकतात परंतु त्यावर मात करुन आपल्या संस्थेचे ध्येय पुर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहीजे, अशा सामाजीक कार्यात झटणा-या संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे श्री. बडोले यांनी सांगितले.
             मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जन प्रतिष्ठान संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेला उपक्रम चांगला आहे. तसेच संस्थेचे कार्यालय शहरी भागात न ठेवता ग्रामीण भागात सुरु केल्याने ही संस्था आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असल्याचे प्रतीत होते, असे श्री. बडोले यांनी म्हटले. जन प्रतिष्ठान संस्थेचे  सचिव श्री. कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले की, संस्थेचे काम 14 एप्रिल 2016 पासून सुरु झालेले असून संस्थेचे विविध उपक्रम हाती घेऊन कामकाज करत आहे.
           प्रारंभी सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते जन प्रतिष्ठान बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.तसेच उजळंब येथे तांडा वस्तीसुधार योजने अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ही श्री. बडोले यांच्या हस्ते झाले.


*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु