जलयुक्त अंतर्गत 1 हजार 327 कामांचे फोटो
सिमनिक प्रणालीवर अपलोड
         
        लातूर,दि.27: लातूर जिल्ह्यातील सन 2015-16 साठी डी पी डी सी अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून एकूण जिल्ह्यातील 9 यंत्रणामार्फत 202 गावातील 1 हजार 359 कामे मंजूर करण्यात आली त्या प्रमाणे सिमनिक  (simnic) प्रणालीवर 1 हजार 327 कामे अपलोड केलेली आहेत तसेच MRSAC प्रणालीवर 1097 कामांचे फोटो अपलोड केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे.
              जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर झालेल्या कामाची माहिती  www.mahasim.nic.in  या संकेत स्थळावर भरण्यात आली असून लातूर जिल्ह्याचा कोड क्र. 32276 आहे. या संकेतस्थळावर सर्व कामाची माहिती तालुकानिहाय, गावनिहाय, यंत्रणानिहाय, कामनिहाय पाहता येईल तसेच सदरील कामाचे फोटो http://mrsac.maharashtra.gov.in/jalyukt या संकेतस्थळावर पाहता येईल, असे श्री. पोले यांनी सांगितले आहे.
            महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग यांनी सर्वासाठी पाणी टंचाईयुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. सदरील निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व गावामध्ये पाच वर्षामध्ये सदरील कार्यक्रम राबवून महाराष्ट्र  टंचाईमुक्त करावयाचा आहे. सदरील अभियानाचा मुख्य उद्देश पावसाचे पडणारे पाणी शिवारात आडविणे, भूगर्भागील पाणी पातळी वाढविणे, राज्यातील सिंचन क्षेत्रातवाढ करुन भूजल अधिनियमाची अमलबजावणी करणे व पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी नवीन कामे हाती घेणे व विकेंद्रतीत पाणी साठे निर्माण करणे हा उद्देश आहे. लातूर जिल्ह्यात 2015 अंतर्गत 202 गावाची निवड करण्यात आली होती. सदरील गावाची निवड करतांना पाणलोट/गतीमानता अभियानातील गावे, टंचाई घोषीत केलेली गावे, टँकरने पाणी पुरवठा होणारी गावे अ अतिशोषीत पाणलोटातील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु