जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण रॅलीचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन
 
         लातूर,दि. 01: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर च्या वतीने 1 डिसेंबर 2016 जागतिक एड्स दिनानिमित्त लातूर शहरामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
                रॅलीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अशोक शिंदे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, सहाय्यक संचालक हेमंतकुमार बोरसे, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद) एस. जी. नवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री. डांगे आदि उपस्थित होते.
           जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य होऊया सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध’ चा नारा घेवून जनजागरण रॅलीची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर येथून मिनी मार्केट-गांधी चौक, गंजगोलाई- सराफा लाईन मार्गे- टाऊन हॉल येथे आली या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थींनी, विविध संस्थातील अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी  बिपीन बोर्डे यांनी आभार  व्यक्त करुन रॅलीची सांगता झाली.
         रॅलीमध्ये एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी युवक तरुणामध्ये जबाबदार लैगिंक वर्तणुक व सुरक्षित लैगिंक संबंध, एचआयव्ही संसर्गाचा प्रतिबंध, सर्व एचआयव्ही संसर्गितांना औषधोपचार, नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही. कलंक भेदभाव होऊ द्यायचा नाही, एड्सने होणा-या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे, या बाबतची जनजागृती करण्यात आली.
            रॅलीमध्ये सीआरपीएफ, लातूर, दयानंद वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, न्यु व्हिजन नर्सींग स्कुल, शासकीय नर्सींग कॉलेज बाभळगाव व लातूर, देशीकेंद्र विद्यालय, शिवाजी विद्यालय, वेदांत नर्सींग कॉलेज , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यशवंत विद्यालय, सरस्वती विद्यालय, लालबहादुर विद्यालय, केशवराज विद्यालय लातूर तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसयटी अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. सदर रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


*****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा