महाअवयवदान जनजागृती महारॅली संपन्न लातूर, दि.29: महाअवयवदान अभियानांतर्गत लातूर शहरात आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीस लातूरचे महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयापासून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्रीकांत गोरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक श्री. कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक शैलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, डॉ. व्ही. एस. सिरसाठ आदींची उपस्थिती होती. या रॅलीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - मिनी मार्केट - शिवाजी चौक मार्गे, क्रीडा संकुल लातूर येथे समारोप झाला. या रॅलीत देशीकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालय, न्यू व्हिजन नर्सिंग स्कूल, वेदांत नर्सिंग कॉलेज, शासकीय वैद्यकीय कॉलेज, मधील विद्यार्थ्यांची , डॉक्टर्स व कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी अवयवदान विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. रॅलीची सांगता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. गोरे यां...
Posts
Showing posts from 2017
- Get link
- X
- Other Apps
लातूर महापालिका निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे पार पाडावी - राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया लातूर, दि. 13: लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. सदरची निवडणूक प्रशासनाने निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे पार पाडावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिले. लातूर शासकीय विश्रामगृहातील सभागृहात लातूर महापालिका निवडणूक कामाच्या आढावा बैठकीत श्री. सहारिया बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक पु...
- Get link
- X
- Other Apps
“ मतदार जागृतीचा….. सेल्फी पॉईंट ” लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून या निवडणूकीसाठी एकुण 2 लाख 77 हजार 775 मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून दिनांक 19 एप्रिल 2017 रोजीच्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवून लोकशाही प्रणाली बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडूरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त रमेश पवार व प्रशासन मतदार जनजागृतीसाठी मोहिम राबवित असून या मोहिमेस मतदारांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. होय, मी मतदान करणारच, तुम्ही पण मतदान करा, व सेल्फी पॉईंट--- य...
- Get link
- X
- Other Apps
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत लातूर जिल्ह्याचा प्रगतीचा जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा लातूर दि.06:- निलंगा नगर परिषद व शिरुर अनंतपाळ नगर पंचायतीस जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी भेट देवून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाचा आढावा घेतला व प्रत्यक्ष स्थळ पहाणी करुन याबाबत देण्यात आलेले उद्दिष्ट शिघ्रगतीने मुदतीत पुर्ण करण्याबाबत संबंधित मुख्याधिकारी व पदाधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच नगर परिषद अंतर्गत प्रभाग निहाय जास्तीत जास्त कमी वेळेत हगंणदारी मुक्त होणा-या प्रभागास शासनामार्फत रुपये 10 लाख बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत. दिनांक 1 मे 2017 पासून शासनाने जी शहरे हगणंदारी मुक्त होणार नाहीत अशा शहरांना विकास निधी उपलब्ध करुन दिला जाणार नाही असे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास निधीही रोखुन धरण्यात येणार आहे व यापुढे नागरीकांना रेशनकार्डावरील धान्य व तसेच कोणत्याही शासकीय लाभ शौचालय नसल्यास दिले जाणार नाहीत जिल्हाधिकारी पोले यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ...
- Get link
- X
- Other Apps
नैसर्गीक आपत्तीमध्ये शासन शेतक-यांसोबत आहे - पालकमंत्री लातूर,दि. 19: जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतक-यासोबत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कौशल्य विकास, कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. औसा तालुक्यातील येलुरी व वरवडा या गावांमधील शेती पिकांची पाहणी प्रसंगी श्री. निलंगेकर शेतक-यांशी संवाद साधत होते. यावेळी जालना लोकसभा मतदार संघाच...
- Get link
- X
- Other Apps
जल आराखड्याद्वारे उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे -निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे लातूर,दि. 16: पाण्याची बचत ही काळाची गरज लक्षात घेवून विविध माध्यमांच्याव्दारे सुक्ष्म स्तरावरून म्हणजे गाव पातळीवरही जललेखा व जल आराखडा तयार करून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे व भविष्यात पाण्याच्या पातळीत वाढ करून पाणीपातळी कायम राहावी या करिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी केले. जलसंपदा विभाग लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिनांक 16 ते 22 मार्च 2...
- Get link
- X
- Other Apps
प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे आठ दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करावा - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत लातूर,दि. 16: जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीमूळे झालेल्या पिकांच्या व इतर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे प्रशासनाने आठ दिवसात पूर्ण करावेत व त्याचा अहवाल त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पिक नुकसानीबाबत महसूल व कृषि अधिका-यांच्या बैठकीत कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर , विभागीय कृषि सहसंचालक शिरीषकुमार जमदाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडग...
- Get link
- X
- Other Apps
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून औसा तालुक्यातील पिक नुकसानीची पाहणी लातूर,दि. 16: जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी वादळी वा-या सह पाऊस व गारपीट झाल्याने औसा व लातूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे. औसा तालुक्यातील नांदुर्गा, टाका, मासुर्डी व येल्लोरी या गावातील पिक नुकसानीची पाहणी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा कृषि विकास अधिकारी (जि. प.) बी. एस. रणदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील, औसा तहसिलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषि राज्यमंत्री श्री. खोत यांनी शेतक-यांच्या शेतातील गहू, मका, हरभरा, द्राक्ष, ऊस, ज्वारी आदि पिकांच्या झालेल्या...
- Get link
- X
- Other Apps
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात - पालकमंत्री लातूर,दि. 12: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहीजेत. तसेच या रुग्णालयात एकदा रुग्ण आल्यानंतर आरोग्य सुविधे अभावी तो रुग्ण दुस-या खाजगी रुग्णालयात जाऊ नये याकरिता रुग्णालय प्रशास नाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्...
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय भवनाची इमारत ही लोकांना न्याय देणारी इमारत झाली पाहीजे - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर,दि. 12: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची ही इमारत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारी इमारत झाली पाहीजे. याकरिता सर्व संबंधित विभागांनी व अधिका-यांनी शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय दिला पाहीजे, असे प्रतिपादन कौशल्य विकास , कामगार कल्याण, भूकंप पूनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ह्या शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला, त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत ...
- Get link
- X
- Other Apps
लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासन कटीबध्द आहे - पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर लातूर,दि. 11: लातूर शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर सिग्नलची आवश्यकता होती. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 13 चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल्स लावण्यात येणार आहेत. लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. ...
- Get link
- X
- Other Apps
शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात नियमितपणे सुसंवाद असावा - जिल्हाधिकारी लातूर,दि. 10: कृषि क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व हवामानातील बदलांची माहिती सर्वसामान्य शेतक-यांना झाल्यास त्या बदलाच्या अनुषंगाने शेतकरी आपल्या पीक पध्दतीत बदल करुन भरघोस उत्पादन घेऊ शकतात . त्याकरिता शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात नियमितपणे सुसंवाद असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले. मांजरा कृषि विज्ञान केंद्र येथे आत्मा व कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी राज्य साक्षरता प...
- Get link
- X
- Other Apps
कारखानदारांनी औद्योगीक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे - अपर जिल्हाधिकारी लातूर,दि. 9: प्रत्येकाचे जीवन हे महत्वाचे असते. त्यामुळे कारखान्यात काम करणारे कामगार व इतर लोकांच्या जीवीताला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची जबाबदारी संबंधित उद्योजकाची असते. त्यामुळे कारखानदारांनी औद्योगीक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहीजे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डी.पी.डी.सी. सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय व एन. डी.आर. एफ. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखानदारांसाठी औद्योगीक सुरक्षा आणि ऑनसाइट आपत्तीकालीन आराखडा याबाबत कार्यशाळ...