जल आराखड्याद्वारे उपलब्ध पाण्याचे
नियोजन करावे
-निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे
लातूर,दि. 16: पाण्याची बचत ही काळाची
गरज लक्षात घेवून विविध माध्यमांच्याव्दारे सुक्ष्म स्तरावरून म्हणजे गाव पातळीवरही
जललेखा व जल आराखडा तयार करून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे व भविष्यात पाण्याच्या पातळीत वाढ करून पाणीपातळी कायम
राहावी या करिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनंत
गव्हाणे यांनी केले.
जलसंपदा विभाग लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या
दिनांक 16 ते 22 मार्च 2017 च्या जलजागृती सप्ताह च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी श्री.
गव्हाणे बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता इ. म. चिश्ती, लातूर पाटबंधारे विभाग
क्र.2 च्या कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता के. एच. पाटील, आर. बी. श्रीरसागर तसेच उपविभागीय अभियंता पी. बी. फंड, से.नि.व जलसंपदा
विभाग लातूर अंतर्गतचे सर्व उप अभियंता , शाखा अभियंता /कर्मचारी आदि उपस्थित होते.
लातूर
जिल्हयातील मांजरा, तेरणा, रेणा, घरणी, तावरजा, मन्यार व लेंडी या नदयांच्या जलपुजनाने
कार्यक्रमाची सुरूवात केली. सर्व उपस्थितांनी जल प्रतिज्ञा घेतली. निम्न तेरणा कालवा
विभाग क्र-2 लातूर चे कार्यकारी अभियंता इ.म.चिश्ती
यांनी सन 2016 च्या जलजागृती सप्ताह कार्यक्रमाचा आढावा घेवून, या वर्षिही दिनांक 16 ते 22 मार्च 2017 या कालावधीत आयोजित जलजागृती
विषयक व्याख्याने, चर्चासत्रे, चित्ररथ, लोकजागृती कार्यक्रम, जलजागृती रॅली, चित्रकला
व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे चित्रफितव्दारे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्री. घाडगे यांनी व आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी बी.आर. वाडीकर यांनी
केले.
****
Comments
Post a Comment