“भारतीय सांकेतिक भाषेतून शिकविणार कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षक ”
“ भारतीय सांकेतिक भाषेतून शिकविणार कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षक ” लातूर,दि.27,(जिमाका):- समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातंर्गत हिंगोली, लातूर, नांदेड, व धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण 47 कर्णबधिर प्रवर्गाच्या विशेष शाळा आहेत. या सर्व विशेष शाळांमधून कर्णबधिर विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याकरिता विशेष शिक्षकांना सांकेतिक भाषेचा वापर करावा लागतो. परंतू प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या पध्दतीची सांकेतिक भाषा वापरली जात असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे सर्व शाळांमध्ये सांकेतीक भाषेची एकवाक्यता व समानता यावी दृष्टीकोनातून अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई यांच्या सहकार्याने दिनांक 26 मार्च ते 28 मार्च 2025 या कालावधीत तीन दिवशीय भारतीय सांकेतीक भाषेचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक शाळेतील एका विशेष शिक्षकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेतलेले विशेष शिक्षक आपल्या शाळेतील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण वर्गात विभागातील 50 व...