गिग वर्कर,प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी --- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
गिग वर्कर,प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर
यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी
--- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. 27 (जिमाका): ई-श्रम
पोर्टलवर केंद्र शासनाने गिग वर्कर,प्लॅटफॉर्म वर्कर ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास
सुरुवात केलेली आहे. साधारणत: गिग व प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे शेरिंग वाहन कामगार,अन्न
व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार, इ मार्केटमध्ये ऑनलाईन
काम करणारे कामगार प्रोफेशनल सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार,
ट्रॅव्हल व आदरातिथ्य करणारे,कामगार मिडिया सर्विसेस ई.सर्व प्लॅटफॉर्म गिग वर्करच्या
व्याख्येत येतात.
अमॅझोन,
फलीपकार्ट, मिंत्रा,स्नॅपडिल,अजिओ,मिशो,स्विगी,झोमॅटो अशा वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्म
वर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम eshram.gov.in वर नोंदणी करु शकतील. केंद्र सरकारकडे त्यांचा डेटा तयार होईल, म्हणून
1 एप्रिल, 2025 पासून सर्व गिग कामागारांनी ई-श्रमपोर्टलवर नोंदणी करावी. तसेच डिजिटल
मध्यस्थी म्हणून काम करणारे सर्व सेवा पुरवठादार यांची ॲग्रिगेटर म्हणून नोंदित होणे
आवश्यक आहे. तरी सर्व ॲग्रिगेटर यांनी 31 मार्च, 2025 रोजी पर्यंत register.eshram
.gov.in /#/user/platform-worker-registration या साईटवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment