लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांबाबत आवाहन

 लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील

बेवारस वाहनांबाबत आवाहन

 

लातूर,दि.12,(जिमाका):-   लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 38 वाहने बेवारस स्थितीत आहेत. या वाहनांवर ज्या कोणाची मालकी असेल, त्यांनी 15 दिवसांत मालकविषयक कागदपत्रासंह लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे असलेली 38 वाहने भारतीय नागरी सुरक्षा संहिता 106 (102 सीआरपीसी) , 124 म.पो.का. प्रमाणरे कार्यवाही करुन ताब्यात घेण्यात आली आहेत. या वाहनांच्या रजिस्टर क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांकची माहिती लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत कोणाचीही मालकी हक्क सिध्द न झाल्यास कोणाचीही तक्रार नाही, असे गृहीत धरुन मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन